Adv. Minal Shah
Every Type of Marriage consultation is provided here.
हिंदू विवाह कायदा
भारतीय राज्यघटनेच्या ४४ व्या कलमानुसार, जैन, बुद्ध, शीख ह्या हिंदू धर्मातून जन्मलेल्या आधुनिक शाखांना सुद्धा यात समाविष्ट केलेले आहे.
अटी
विवाहाच्या अटी विभाग ५ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत त्या अश्या: "दोघांनाही पती/पत्नी नसेल तरच दोन हिंदू विवाह बद्ध होऊ शकतात" असे नमूद करून हा कायदा सूचकपणे बहुपत्नीकत्वाला प्रतिबंध करतो.
विवाह योग्य वय - वधूचे १८ आणि वरचे २१ असेल तरच ते विवाहास पत्र ठरतात.[२][३] हा कायदा काही विशिष्ट अमान्य नात्यातील विवाहाला प्रतिबंधित करते.पालकत्व विवाह कायद्याचा विभाग ६ विवाहातील संरक्षक बाबींची माहिती देतो. विवाहात जिथे वधूचे पालकत्व घेणार्याची गरज लागते तिथे खालील लोकांचा पालक म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो - वडील, आई, वडिलांची आई, वडिलांचे वडील, सख्खा भाऊ, चुलत भाऊ.[४] १९७८ साली बाल-विवाह प्रतिरोधक कायदा संमत झाल्या नंतर पालकत्वाचा कायदा रद्द करण्यात आला.
विधी
हिंदू विवाह कायद्याच्या ७ व्या कलमामध्ये विवाहाच्या विधी आणि प्रथांची नोंद घेतली गेली आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहबध्द होणाऱ्या दोन्हींही व्यक्तींपैंकी एकाच्या समुदायाच्या विधी-परंपरा आणि साजरीकरणाच्या पध्दतींनुसार केला जावा. ह्या विधींमध्ये सप्तपदीसारख्या विधींचा सहभाग होतो. सप्तपदी मध्ये विवाहबध्द होणाऱ्या दोघांनींही पवित्र अग्निच्या साक्षीने सात पावले एकत्र चालणे अपेक्षीत आहे. विवाहाचा विधी तेव्हाच पुर्ण झाला असे मानले जाते जेव्हा सातवे पाऊल पुर्ण होते.[५]
घटस्फ़ोट
पती आणि पत्नी यांपैकी कोणीही घटस्फ़ोटासाठी अर्ज करु शकतो, घटस्फ़ोट अनेक कारणांनी घेतला जाऊ शकतो, त्यातील काही मुख्य म्हणजे, व्यभिचार, क्रुरता, दोन किंवा जास्त वर्षांपर्यंत एकमेकांपासून वेगळे रहाणे, जोडीदारांपैंकी एकाचे किंवा दोघांचेही धर्मांतर, मानसिक असामान्यता, दीर्घकालीन आजार आणि कोड असणे ही आहेत. पत्नी घटस्फ़ोटासाठी अर्ज करु शकते जर तिच्या पतीने ह्या लग्नानंतर आणि दोघांत लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दुसरे लग्न केले किंवा पती बलात्कार, समलिंगी संभोगी किंवा प्राणांशी लैंगिक क्रिया करण्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार म्हणून सिध्द झाला असेल तर. या व्यतरिक्तही जर जोडीदारांपैंकी कोणालाही जर असे वाटत असेल की विवाह संपवण्याची गरज आहे आणि आता त्यांना विवाहात रहाणे कठीण होत आहे शिवाय जर ते सिध्द करु शकले तर त्यांना घटस्फ़ोटाकडे जाता येते.[६] विवाहानंतर एक वर्षांपर्यंत घटस्फ़ोटाचा अर्ज करता येत नाही.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Website
Address
Pune