Maharashtra State Faculty Development Academy
Transforming higher educational landscape through continuous professional development of teachers in Maharashtra State
29/05/2026
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील १३ विद्यापीठांचे अधिकारी एकत्र आले आणि एक महत्त्वाचा संकल्प केला...
"आरक्षण फक्त कागदावर नाही, ते प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचलेच पाहिजे!"
सहभागींच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा
🎥 https://www.youtube.com/watch?v=8NUTpOOvX9k
हा व्हिडिओ एकदा नक्की शेअर करा! 🔁
#आरक्ष #महाराष्ट्र #उच्चशिक्षण #महाराष्ट्र
#उच्चशिक्षण #आरक्षण_धोरण
25/05/2026
महाराष्ट्र राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीस शासन मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक होते, त्याच दिशेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पदभरतीमध्ये आरक्षण धोरण अचूकपणे राबविता यावे यासाठी मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दि. २५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील उपकुलसचिव व सहाय्यक कुलसचिव (मागास वर्ग कक्ष) यांच्यासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले होते. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कार्यकारी संचालक, MSFDA पुणे तथा संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. देवळाणकर यांनी आवर्जून नमूद केले की, आरक्षण धोरण अचूकपणे राबविले तरच समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षणात न्याय मिळेल आणि NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासन बळकट असणे आवश्यक आहे.
डॉ. प्रकाश बच्छाव (विभागीय सहसंचालक, कोल्हापूर), श्री. संदीप पाटील (सहाय्यक महसूल अधिकारी, मागास वर्ग कक्ष, नाशिक), श्री. इक्बाल दरवाजकर (सहाय्यक महसूल अधिकारी, मागास वर्ग कक्ष, पुणे), डॉ. दिलीप भरड (माजी कुलसचिव, य.च.म.मु. विद्यापीठ, नाशिक), डॉ. अर्चना बोऱ्हाडे (सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे) व डॉ. सुयश दुसाने (प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे) या तज्ञ साधन व्यक्तींनी बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी, सामाजिक आरक्षणासोबत महिला व दिव्यांग यांचे समांतर आरक्षण अचूकपणे कसे राबवावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि सहभागी अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
हा ऐतिहासिक उपक्रम मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या दूरदृष्टी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून साकार झाला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व मौलिक असे ठरणार आहे असे समारोप प्रसंगी डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.
📍 दि. २५ मे २०२६ | महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे
Maharashtra DGIPR Chandrakant Patil CMOMaharashtra Shailendra K Deolankar
#महाराष्ट्र
#उच्चशिक्षण
#आरक्षण_धोरण
#ऐतिहासिक_प्रशिक्षण
#पदभरती
23/05/2026
🚨 प्रत्येक शिक्षकाने हे बघायलाच हवे! 🚨
“NEP 2020 is not just a policy — it is a paradigm shift.”
— श्री. अनिल राव
शिक्षणाची व्याख्या बदलतेय. अध्यापनाची पद्धत बदलतेय.
आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत — आपले प्राध्यापक! 🙌
MSFDA कसे राज्यभर हे परिवर्तन घडवतेय?
श्री. अनिल राव सर यांच्या या सखोल मुलाखतीत जाणून घ्या.
▶️ Watch Now: https://youtube.com/watch?v=ZXq-5L76UXA&feature=shared
🌐 www.msfda.ac.in
21/05/2026
EDURISE Faculty Induction Program 2026 | Day 14 /28
आजचा दिवस होता विचारांना चालना देणारा!
डॉ. सी. एम. चितळे यांनी आज "Problem-Based & Case-Based Learning"
या विषयावर एक अत्यंत प्रेरणादायी सत्र घेतले!
खरे प्रश्न. खऱ्या परिस्थिती. खरे शिकणे.
आमच्या प्राध्यापकांनी अनुभवले की —
✅ वर्गखोली कशी जिवंत करायची
✅ विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार कसा रुजवायचा
✅ समस्या सोडवण्याची क्षमता कशी विकसित करायची
✅ सहभागाने शिकणे कसे घडवायचे
कारण सर्वात उत्तम धडा तो असतो —जो फक्त शिकवला जात नाही, तो अनुभवला जातो! 💡
#प्राध्यापक_विकास #समस्याआधारितशिक्षण #शिक्षणक्रांती
Maharashtra DGIPR
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune