SitWalker
100,000 feet cut off in India EVERY YEAR! Mission: Save the Diabetic foot". Heals ulcers faster!
07/04/2024
"Infotech: Challenges of the 21st Century" ह्या विषयावर शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात मला व्याख्यान द्यायचे होते. डॉ रंजन गरगेंनी (Ranjan Garge) माझ्यावर विश्वास ठेवून एका सत्राचे वक्ते म्हणून माझे नाव सुचवले होते व तसे आमंत्रणही मिळाले. माझे वय तेव्हा जेमतेम ३३. तीन-चार दिवसांपासून माझी घालमेल सुरु होती. कारण व्याख्यानाची पकड सापडतच नव्हती. कुठलंही व्याख्यान द्यायचं म्हणलं कि कित्येक जण मनातल्या मनात उजळणी करून घेतात - समोर श्रोते, बाजूचे श्रोते, पहिल्या रांगेत कोण असणार आहे, विषय काय, इ. म्हणजे ऐन वेळेवर फजिती होत नाही. (तरीही होतेच कधीकधी, पण ही उजळणी झालेली असली तर सावरायला देखील मदत होते.) तर ती उजळणी काही होत नव्हती. खिचडी जमत नव्हती. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर फार टेक्नॉलॉजी पाजळून काही उपयॊग होणार नव्हता. (तसे विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा त्या काळी फारवेगळे ,नसावेत, पण... ). शेवटी २२ तारखेला लक्षात आलं की विषय "चॅलेंजेस" हा आहे, तंत्रज्ञान नाही! मग तसा विषय बनवायचा असं धाकधुकीतून ठरवलं. मग त्यातल्या त्यात ग्रामीण भागातुन येणाऱ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बदलत्या तांत्रिकतेमुळे येणारे आवाहने (२००० साली) व त्यात सुद्धा मुलींना येणारी आवाहने, असा फुलवत नेऊ अशी मनाशी खूणगाठ बांधली. झालं. कार्यक्रमाच्या दिवशी, ठरल्या वेळी "पाहुणे" स्थानापन्न झाले. पाहुण्यांचा अतिरंजित (!) परिचय, पुष्पहार वगैरे सोपस्कार पार पडले व काही कळायच्या आत मी पोडियम वर व सगळं सभागृह अपेक्षेने माझ्याकडे टक लावुन बघताना दिसलं. माईकचा अंदाज घेण्यासाठी घसा खाकरून पहिला बाऊन्स घेतला अन् एकदम वात पेटली! आता त्यातलं काहीच आठवत नाही, पण "तंत्रज्ञान-बदलाचे सामाजिक अंगाने होणारे परिणाम" असा विषय फुलवत नेला. (दिलेल्या वेळेपेक्षा ३०-३५ मिनिटे जास्त बोललो पण प्रतिसाद फारच छान होता त्यामुळे कोणीच काही म्हणाले नाही. शेवटी मीच थांबलो.) तंत्रज्ञानाला घाबरू नये, त्यातून फक्त माहिती मिळते, ज्ञान आपलं आपल्यालाच अर्जित करावे लागतं, प्राध्यापकांनी त्यातला ज्ञानाचा भाग तेवढा शिकवायचा असतो, माहितीसाठ्यावर मोठे होण्याचे दिवस सारले. वगैरे बोललो होतो. विषयाच्या अनुषंगाने फोटो मॉर्फींग वगैरे नुसतेच सुरू झालेले प्रकार (इमेल / कंप्युटर वर. मोबाईल येवढे बोकाळले नव्हते व त्यावर चित्र यायला अजून बराच उशीर होता) तसेच LG वर (BTव पुढचे अजून यायचे होते) पण चर्चा सुरू झाली होती. त्यायोगे पावित्रा कसा घ्यावा व (विशेषतः मुलींनी) चर्चेत सहभागी कसं व्हावं ह्यावर शेवटी बोललो होतो. एकुणात श्रोतुवर्गाला आवडलेलं जाणवत होतं. माझं व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तरे झाली व नंतर सत्र समाप्त झाल्यावर सुद्धा १२-१५ जणींचा घोळका (त्यात ३-४ कॉलेजकुमार देखील सामील) अगदी गाडीला किक मारे पर्यंत संवादत होता. त्यांच्या नजरेतील भाव फारच बोलके होते. ते भावच वक्त्याचं खरं मानधन असतात.
(२४ वर्षे झालीत, कदाचित तपशील इकडं तिकडं झाला असेल पण हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग होता. काल फोटो सापडला, म्हणून आठवणींना उजाळा!)माझं नांव असलेलं पहिलं मानचिन्ह...! (म्हणून ह्या प्लेकला विशेष स्थान. नंतर सुद्धा काही मिळालीयेत, पण... )
Gratitude to Dr. Garge for the opportunity to create a lifetime memory. 🙂🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
BHAU Institute, COEP Campus, Near COEP Boat Club, Shivajinagar
Pune
411005
Opening Hours
| Monday | 9am - 7pm |
| Tuesday | 9am - 7pm |
| Wednesday | 9am - 7pm |
| Thursday | 9am - 7pm |
| Friday | 9am - 7pm |
| Saturday | 9am - 7pm |