Hadapsar Sports Foundation
Kabaddi
29/03/2024
नवचैतन्य मित्र मंडळ शिवजयंती उत्सव 2024 सर्व संयोजकांचे मनःपुर्वक आभार!
परिसरातील सर्व जाती,धर्मातील नागरिक महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत असलेल्या छ.शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा मिरवणूक सोहळ्यामध्ये सर्व पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांची शिस्त,व एकजुटीने केलेली जय्यत तैयारी दिसून आली
विशेष म्हणजे नवचैतन्य मित्र मंडळाच्या वतीने हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री.चेतन (दादा )तुपे पाटील यांचे हस्ते क्रीडा क्षेत्रातील"शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार"हा मानाचा आणि प्रतिभावंत राज्यस्तरीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.रशिद मौला शेख यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच पुण्याचे माजी उपमहापौर मा.श्री.निलेश दादा मगर,स्वीकृत नगरसेवक श्री.दत्तात्रय (बुवा)तुपे युवा उद्योजक श्री.उन्मेश मगर, छ. धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.विकास तुपे,श्री.गणेश सुरेश ससाणे(सचिव)श्री.अजित शिंदे, भानुदास माकर श्री.गणेश ढवळे श्री.श्रीराम लोखंडे या सर्वांच्या वतीने श्री.रशिद शेख यांना शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
26/01/2024
भोर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने एकलव्य क्रीडा संस्था आळंदे (भोर) आयोजित खुला गट मातीवरील कबड्डी स्पर्धेमध्ये हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला...!!🏆🥇♥️
25/10/2023
आज विजयादशमीनिमित्त हडपसर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साधना विद्यालय हडपसर येथील कबड्डीच्या क्रीडांगणाचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सर्जेराव बाप्पू सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. पुरुष व महिला खेळाडूंना कबड्डी खेळाचा गणवेश फाउंडेशनचे हितचिंतक,मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक देशी चिकनचे मालक श्री. इस्माईल मौला शेख यांच्याकडून देण्यात आले.फाउंडेशनचे खजिनदार श्री. राजकुमार माने सर(राष्ट्रपती पदक विजेते) यांनी श्री.इस्माईल शेख यांचे फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त केले.खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सर्व आजी, माजी खेळाडू,प्रशिक्षक,मार्गदर्शक, पदाधिकारी,हितचिंतक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू,NIS कबड्डी प्रशिक्षक श्री.रशिद शेख सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून विजयादशमीच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. *वंदन त्या मातीला जिने आम्हाला एक कबड्डी खेळाडू म्हणूनओळख दिली.☘️🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Sadhana Vidyalaya, Hadapsar
Pune
411028
Opening Hours
| Monday | 5:30pm - 9:30pm |
| Tuesday | 5:30pm - 9:30pm |
| Wednesday | 5:30pm - 9:30pm |
| Thursday | 5:30pm - 9:30pm |
| Friday | 5:30pm - 9:30pm |
| Saturday | 5:30pm - 9:30pm |