Krishna Enterprises

Krishna Enterprises

Share

HEALTH, BEAUTY & BUSINESS. We are Faculty at Free Enterprises Business. No matter who you are or your background, Our opportunity is for all ages.

15/01/2021

🎯 शरीरातील मेटाबॉलिजम कमी झाल्यास दिसतात ही लक्षणे..

मेटाबॉलिजम म्हणजे 'चयापचय' होय. ही एक रासायनिक प्रक्रिया असून यामध्ये सेवन केलेल्या अन्नपदार्थांचे उर्जेत रूपांतर होते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत असते. तसेच शरीरात पेशी तयार होतात. तसेच शरीरातील विषारी घटकांचेदेखील नियंत्रण केले जाते. परंतु, मेटाबॉलिजम कमी झाल्यास शरीरावर अनेक परिणाम होतात, हे परिणाम कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत परिणाम

♦ #पोटाचा घेर
मेटाबॉलिजम रेट कमी होतो तेव्हा पोटाचा घेर वाढू लागतो. यामुळे वजन कमी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. अचानक वजन वाढल्यास मेटाबॉलिजम रेट तपासून घ्यावा.

♦ #भूक
सकाळी नाश्त्यावेळ भूक लागत नसेल, सकाळी काहीही न खातासुद्धा दुपारच्या जेवणापर्यंत सहज रहात असाल तर मेटाबॉलिजम रेट स्लो झाला आहे. हे लक्षाल घ्या.

♦ #अंगदुखी
सतत मांसपेशी आणि शरीरात वेदना होत असतील तर थायरॉईड ग्रंथी योग्य काम करत नाहीत, अशी शक्यता असू शकते. थायरॉयड ग्लँड योग्य प्रकारे काम करत नसल्यानेही मेटाबॉलिजम कमी होते. त्यामुळे अंगदुखीकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांकडे जा.

♦ #थकवा
मेटाबॉलिजम रेट स्लो झाल्याने सतत थकवा जाणवतो. उत्साह वाटत नाही, शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होत नाही.

• निरोगी जीवनाची गुरुकिल्ली •

𝙵𝚘𝚛 𝚖𝚘𝚛𝚎 𝙸𝚗𝚏𝚘 𝚟𝚒𝚜𝚒𝚝 𝚞𝚜 𝚊𝚝
https://www.facebook.com/keplonline

ᴋʀɪꜱʜɴᴀ ᴇɴᴛᴇʀᴘʀɪꜱᴇꜱ
&

🌴☘🍃🌿🌾🌿🍃🍀🌴

13/01/2021

▪️निरोगी जीवनाची गुरुकिल्ली

बद्धकोष्ठतेचा त्रास आहे? मग खास तुमच्यासाठी..

हल्ली अनेकांना काही अशा सवयी लागल्या आहेत. ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो. या आजाराबद्दल बोलावं तर सामान्य बद्धकोष्ठतेपासून ते गंभीर बद्धकोष्ठता यामध्ये समाविष्ट आहे. यावर मात करण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.

● लिंबू पाणी : बद्धकोष्ठता झाली आहे तर एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि पिऊन घ्या. हे आपल्या शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो.

● दूध आणि दही : साध्या दही सह प्रोबायोटिक्स मिळेल,म्हणून आपण दिवसातून एक ते दोन कप दही जरूर खावं. या शिवाय जर आपण खूप अस्वस्थ आहात तर एक ग्लास दुधात एक ते दोन चमचे तूप मिसळून रात्री प्यायल्यानं फायदा मिळेल.

● आयुर्वेदिक औषध : झोपण्याच्या पूर्वी दोन ते तीन त्रिफळा गोळी गरम पाण्यासह घ्या. त्रिफळा हरड,बेहेडा आणि आवळा ने बनलेला असतो .त्रिफळा रात्रीच आपले काम सुरू करतो.

● अन्नामध्ये फायबर : एक दिवसात एका स्त्रीला सरासरी 25 ग्रॅम फायबरची गरज असते. तर पुरुषाला 30 ते 35 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. आपल्या पचन प्रणालीला सुरळीत करण्यासाठी दररोजच्या गरजेनुसार योग्य फायबर घ्यायला हवे.

▪️Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

𝙵𝚘𝚛 𝚖𝚘𝚛𝚎 𝙸𝚗𝚏𝚘 𝚟𝚒𝚜𝚒𝚝 𝚞𝚜 𝚊𝚝
https://www.facebook.com/keplonline

ᴋʀɪꜱʜɴᴀ ᴇɴᴛᴇʀᴘʀɪꜱᴇꜱ
&

🌴☘🍃🌿🌾🌿🍃🍀🌴

30/12/2020

#गृध्रसी (कुलंग/कटी स्नायुशुल/Sciatica)

कमरेच्या संधीपासुन कंबरेसहित, पाठ, मांडी, पोटऱ्याचा मागचा भागामध्ये स्तब्धता आणि सुई टोचल्यासारख्या वेदना होतात. ह्या वातरोगास आयुर्वेदात 'गृध्रसी' असे म्हणतात. आधुनिक शास्रात ह्याला 'सायाटिका'असे संबोधलं जात. गिधाड ह्या पक्ष्याच्या चालीसारखी अवस्था जेव्हा रुग्णाची होते, तेव्हा त्यास गृध्रसी असे म्हणतात. ह्या आजारात कमरेपासुन ते पायाच्या तळव्यांपर्यंत मागच्या बाजुने असह्य वेदना होतात. रुग्ण जागचा उठुही शकत नाही.

#कारणे :

अधिक वाताचा आहार सेवन करणे, अत्याधिक प्रवास करणे, वाकुन काम करणे, कमरेला आघात होणे इ.

#लक्षणे :

कमरेपासुन पायापर्यंत मागच्या बाजुने निर्माण होणाऱ्या असह्य वेदना, काही प्रसंगी पायाला मुंग्या अथवा पाय जड पडल्यासारखे वाटतात.

#चिकित्साउपक्रम :

१) कंबर अथवा कमरेशी संबधीत कोणत्याही दुखण्यात पारीजातकाचा काढा अतिशय अनुभवसिद्ध आहे. आठ ते दहा पाने घेऊन त्यांना चांगले बारिक वाटुन घ्यावेत. त्यात दोन कप शुद्ध पाणी टाकुन मंद आचेवर अर्धा कप शिल्लक राहिल असे उकळावे. रोज दोनदा उपाशीपोटी घ्यावा. दुखणे तात्काळ कमी होते.

२) एरंडबीजाचा गर ८ ते १० घेऊन त्यास बारीक चुर्ण करुन घ्यावे. त्यात एक कप दुध आणी दोन कप पाणी टाकुन मंद आचेवर दुध शिल्लक राहिल ह्या बेताने उकळुन, नंतर त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर व आवश्यकते इतकी साखर अथवा गुळ टाकुन रोज संध्याकाळी जेवणानंतर घेतल्याने सकाळी पोट साफ होऊन सर्व प्रकारच्या वातरोगांपासुन आराम मिळतो.

३) दुखऱ्या भागावर पायापासुन वर कमरेपर्यंत महानारायण तेलाने किंवा प्रसारिणी तेलाने हलक्या हाताने मालीश करुन जाठ मिठाने किंवा गरम पाण्याने शेकल्यास वेदनेपासुन आराम मिळतो.

४) कोणत्याही वातव्याधीत रुग्णाचे पोट साफ राहाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मिठाचा अल्प वापर, मसाला बंद, दाळी बंद अशी पथ्ये आवश्यक आहेत. गंधर्वहरितकीचुर्ण किंवा एरंडतेल हे उत्तम वाताचे अनुलोमन करते, म्हणुन ह्याचा वापर करु शकतो.

५) सोबत महारास्नादीकाढा, दशमुलारिष्ट, अश्वगंधारिष्ट, वातगजांकुश रस, समिरपन्नग रस इत्यादी आयुर्वेदाच्या विविध कल्पांचा वैद्याच्या सल्ल्याने यथोचित वापर करावा.

𝙵𝚘𝚛 𝚖𝚘𝚛𝚎 𝙸𝚗𝚏𝚘𝚛𝚖𝚊𝚝𝚒𝚘𝚗 𝚟𝚒𝚜𝚒𝚝 𝚞𝚜 𝚊𝚝
https://www.facebook.com/keplonline

ᴋʀɪꜱʜɴᴀ ᴇɴᴛᴇʀᴘʀɪꜱᴇꜱ
&

🌳🌴☘🍃🌿🌾🌿🍃🍀🌴🌳

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune