Suhrud Classical Music
Classical music school, workshops, concerts
09/07/2026
Choosing the right music class isn’t just about your child’s age. It's about their interest, aptitude, and learning journey. 🎶
Every child learns differently, and the right guidance can make all the difference.
Get in touch with Neha Katdare Deshpande to understand which program is the best fit for your child and help them begin their musical journey with confidence. ✨
📞 9284674139
19/06/2026
गुरू म्हणून विद्यार्थ्यांना गाणं शिकवताना माझं लक्ष कधीच फक्त सूर, ताल किंवा स्पर्धांवर नसतं. माझी इच्छा एवढीच असते की त्यांनी संगीताशी मैत्री करावी. कारण संगीत शिकण्यापूर्वी ते अनुभवावं लागतं. त्याच्या प्रेमात पडावं लागतं.
काही महिन्यांपूर्वी चौथीतली ‘पूर्ती ‘गायन शिकण्यासाठी आली. नवखी होती. पण तिच्या डोळ्यांत एक उत्सुकता होती. काहीतरी शिकायचं, स्वतःला व्यक्त करायचं, अशी एक निरागस धडपड होती. थोड्याच दिवसांत तिने एका गायन स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा व्यक्त केली. अनुभव नव्हता. तयारीसाठी वेळही फार नव्हता.
पण ती रोज रियाज करत राहिली. आज तिला त्या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. हे लिहिताना मला त्या पारितोषिकापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद आहे...
त्या छोट्याशा मुलीने स्वतःच्या भीतीवर मात केली. लोकांसमोर उभं राहण्याचं धाडस केलं. आणि प्रयत्न करण्याची हिंमत दाखवली.
बाकी बक्षिसं, क्रमांक, टाळ्या... या सगळ्या गोष्टी नंतरच्या. गुरूसाठी खरी कमाई म्हणजे शिष्याने स्वतःची एक पायरी ओलांडणं.
आज माझं मन त्या आनंदाने भरून आलं आहे. तिच्या पुढच्या संगीतप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 🌼🎶
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Pune