psyched_with_mugdha

psyched_with_mugdha

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from psyched_with_mugdha, Psychologist, Pune.

13/11/2025

ही फक्त तिची नव्हे, दोघांची प्रवासकथा आहे.
थोडं समजून घ्या, थोडं ऐका, थोडं जवळ राहा…
असं केलंत की मिरॅकल घडल्याशिवाय राहणार नाही! 💫

✨साधे सोपे उपाय:
• तिच्या भावना समजून घ्या, दोष देऊ नका.
• “कधी होणार?” विचारण्याऐवजी, “कशी आहेस?” असं विचारा.
• छोट्या कृतीतूनच मोठं आधार निर्माण होतं.
• भावनिक उपचार हेच खऱ्या मिरॅकलचं बीज असतं.

#मनधागाधागा


(fertility journey, emotional healing, infertility support, couple counselling, relationship growth, marriage therapy, women support, hope and faith, mental health awareness, miracle happens, psychological support, mindful relationships, REBT therapy, inner strength)

11/11/2025

मन धागा धागा च्या आजच्या एपिसोड मधे बघुयात ह्यावर काय करता येईल..
#मनधागाधागा

06/11/2025

सतत रडणं ही फक्त त्रासदायक सिच्युएशन नसते – तो एक सिग्नल असतो. भूक, थकवा, भीती, किंवा फक्त “माझं ऐकून घ्या!” असं सांगायचं असतं त्यांना.पालक म्हणून रडण्यामागचं खरं कारण समजणं, हेच पहिलं पाऊल असतं समजूतदार संगोपनाचं. 💛👶
(Child crying, parenting, child development, emotional parenting, behavior issues, RECBT, child psychology, understanding child behavior, mindful parenting, tantrums, parent-child bonding)
#मराठीपालक

03/11/2025

आपण काम करतो, देतो… पण ‘आपली किंमत’ बोलायला थांबतो.
मौन सोडा… कारण आपला आवाज हीच तुमची ओळख आहे.
1. भीती = कमजोरी नाही, ती न बोलल्याची सवय आहे.
“पगार मागायचा म्हणजे लोभीपणा” — हा विचार चुकीचा आहे.
हक्क मागणं म्हणजे ‘स्वार्थ’ नाही, ती आत्मसन्मानाची सुरुवात आहे.
2. तुमचं काम तुमची ओळख आहे… पण आवाज तुमची किंमत ठरवतो.
“Boss समोर बोलायला घाबरते” असं मन म्हणतं…
पण लक्षात ठेवा, मौन हे कौशल्य नाही.
3. बोलायचं ठरतं… पण मनातच विषय बदलतो.
आपण इतरांसाठी धाडस करतो, मग स्वतःसाठी का नाही?
तुमचं ‘होईल का?’ हे ‘होईलच’ मध्ये बदला.
4. सुरुवात करा… साध्या एका वाक्याने.
“सर, मला थोडं बोलायचं होतं…” — एवढं म्हणा.
हळूहळू आत्मविश्वास वाढेल, आणि भीती कमी होईल.
तुमच्या शांततेच्या मागे तुमची किंमत हरवू देऊ नका.
(salary conversation, workplace fear, boss dynamics, self-worth, employee silence, communication courage, assertiveness, work anxiety, performance pressure, CBT therapy, RECBT, आत्मसन्मान, office life, self-doubt, fear of asking, working women, job stress, emotional awareness)

02/11/2025

वाद होऊ शकतो, पण नातं संपू नये.
मन: धागा धागा – भांडणांनंतरचं अंतर कमी करायला. ❤️
Husband and wife, couple goals, marathi couple, mr and mrs, married couple, fights, conversation, healthy relationship

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune