Marathi MBA
business व्यवस्थापन विषयी माहिती मराठीमध्?
आपला धंदा online का न्यायला पाहिजे – १
लहान उद्योग्धन्द्यांना मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करणे नेहेमीच कठीण जाते. साधनसामग्रीच्या बळावर बाजारात स्वतःचा हिस्सा वाढवण्यात सर्वजण मश्गुल असतात . साहजिकच ज्याच्याकडे जास्त साधनसामग्री तो जास्त हिस्सा घेऊन जातो. हा अत्तापार्यान्ताचा कल इंटरनेट च्या आगमनानंतर बदलला आहे. आता एखादी छोटी कंपनी देखील इंटरनेटच्या मदतीने मार्केटिंग वर विशेष खर्च न करता बाजाराचा मोठा हिस्सा घेऊन जाऊ शकते.
तुमच्या सध्याच्या मार्केटिंग बजेटच्या अंशतः खर्चात तुमच्या मालाची दूरच्या ग्राहकांपर्यंत जाहिरात करण्याचे काम करणारे काही platform इंटरनेटवर उपलब्धा आहेत. तुम्हाला अर्थात हे माहिती पाहिजे कि कसे आणि कुठे मार्केटिंग करायचे. तुमच्या हाती मार्केटिंग वर खर्च करायला विशेष पैसे नसले तरीहि तुम्ही बाजारात एक क्रमांकाचा ब्रांड बनू शकता.
उद्योग्धन्द्यांसमोर नेहेमीच हा यक्ष प्रश्न असतो कि मर्यादित साधनमाग्रीमध्ये आपले प्रत्येक विभागासमोरील उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे आणि बाजारात जोरात मुसंडी मारून पुढे कसे जायचे. . print media आणि त्याची वाटपाची पद्धत यांचा नेहेमीच मर्यादित साधनसामग्रीवर ताण येतो. पुन्हा तुमच्या ठरवलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा आहेत. मोठ्या वर्तमानपत्रातील जाहिराती अतिशय महागही असतात आणि त्यांचा प्रभाव त्या दिवस्पुरातच मर्यादित असतो. त्यामुळे अशा जाहिरात मोहिमेचा योग्य परिणाम झाला नाही तर तो त्या उद्योजकासाठी कायमचा तोट्याचा विषय असतो .
पण इंटरनेटमुळे हे कायमचेच बदलले आहे आणि चांगल्यासाठीच. आता मार्केटिंग हे सर्वाना समान संधीचे क्षेत्र झाले आहे. ज्याच्याकडे चांगले product आहे आणि जो त्याच्या ग्राहकवर्गासाठी योग्य तो संदेश तयार करू शकतो तो हि स्पर्धा जिंकू शकतो.
हे गृहीत धरू कि तत्वतः हे बहुतेकांना माहित आहे. पण online पर्केतिंग मध्ये नेमके काय करायचे हे किती लोकांना माहित आहे .
या online मार्केटिंग च्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर त्या खेळाचे नियम आणि तंत्र शिकले पाहिजे.आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतके मोठे संभाव्य त्या दारा पलीकडे लपले आहे.
अजूनही online मार्केटिंग वर भर द्यायचा कि नाही याबाबत काही संदेह असेल तर खालील प्रश्नांची स्वतःसाठी उत्तरे द्या.
• online marketing चालू करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे ?
• कोणत्या संकल्पनांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे?
• आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी कोणती तंत्र आणि tools वापरली पाहिजे?
• या कामात मला कोणाची मदत होऊ शकते? चांगली online मार्केटिंग करण्यासाठी कोण मला योग्य सल्ला देऊ शकतो?
• मला स्वतःला या विषयात गती येण्यासाठी आणि त्याचा वापर करून व्यवसायात यश मिळवण्यासाठी मी कोणते नवीन कौशल्य आणि सवयी अंगी बाणावल्या पाहिजे.
26/01/2022
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Karve Nagar
Pune
411051