Health First Network

Health First Network

Share

This interactive community page provides the health and major (corona) epidemic disease information

05/05/2021

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.

हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे.
चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.

वेगाने चालण्याचे फायदे -

1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13) वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14) चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16) दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
17) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18) झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22) नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23) हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25) मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28) चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29) दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

28/04/2021

सूर्यनमस्कार : आरोग्य चमत्कार!!!

सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब....

एका सुर्यनमस्काराने सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.

संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, बांधेसूद , सुडौल झालेले नक्कीच दिसाल.…

३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट....…

३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास बघा बरं : -

वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज ,
टेनिस= २३२ कॅलरीज,
बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज,
फुट बॉल=२९८ कॅलरीज,
जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज,
धावणे= ४१४ कॅलरीज,

#सूर्यनमस्कार= #४१७कॅलरीज.

वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?

‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत....’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अति उत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत तेरा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते,
तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा आहे. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते....

सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

सूर्यनमस्कार: -
योगाद्वारे सूर्या प्रति कृतज्ञता

‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्याला एक योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा.

ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.....

लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता सामान्य झाले आहेत. हे असे आजार आहेत की ज्यामुळे काही आजरांचा जन्म होतो. अशा परिस्थितीत असा एक आसन असणे आवश्यक आहे म्हणजेच हा आजार टाळण्यासाठी योग सर्वांसाठी तितकाच फायदेशीर आहे. म्हणजेच, एकाच योगनं अनेक आजार पळवून लावता येऊ शकतात.सूर्यनमस्कार असाच एक योग आहे.

जो काही आसनांचा निचरा आहे. सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या आरोग्यास बरेच फायदे होतील. सूर्यनमस्कार म्हणजे 10 योगासनांचा योग आहे. हा योग सर्वोत्तम कार्डियो मानला जातो.

हेच कारण आहे की, हृदयापासून डोक्यापर्यंत आणि मनापासून पोटापर्यंत सर्वात चांगलं आसन आहे. शरीर डिटॉक्स करून ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासाठी या योगचे अनेक फायदे आहेत.

सूर्यनमस्कार करण्याचे शारिरीक आणि मानसिक फायदे
निरोगी शरीर आणि एक आनंददायक भावना
सूर्यनमस्कार केल्यानं केवळ शरीरचं निरोगी होत नाही तर यामुळे मेंदूही खूप थंड राहतो आणि एक सुखद पूर्तता होते. सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन वाढतं. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुद्धा वेगानं होतं. हेच कारण आहे की मेंदू देखील अॅक्टिव्ह राहतं.

चांगले पचन प्रदान करते
सूर्यनमस्कार केल्यानं शरीरासोबतच पोटाजवळही बराच तणाव वाढतो. हा तणाव पोटाची पचनक्रिया चांगलं करण्यासाठी असतो. पचन तंत्र सुधारल्यावर शरीरातल्या अर्ध्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोटात जळजळ होणे किंवा ढेकर येणं या आणि अशा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र सूर्यनमस्कार केल्यानं या सर्व समस्या कायमच्या दूर होतात. सकाळी रिकामी पोटी सूर्यनमस्कार कमीत कमी दहा वेळा जरूर करा.

पोटाची चरबी वितळेल आणि वजन कमी होईल
सूर्यनमस्कार केल्यानं पोटावर सर्वात जास्त इफेक्ट पडतो आणि हे कारण आहे की, पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास सुरूवात होते. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात. पूर्ण शरीरातील वजन सहज कमी होण्यास सुरूवात होते.

मासिक पाळीशी संबधित समस्या दूर होतात
सूर्यनमस्कार महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या हे आसन दूर करतं. एवढंच नाही तर मेनोपॉजच्या वेळी होणारा त्रास आणि मानसिक समस्या देखील दूर करतात. मासिक पाळी नियमित करणं, अतिरक्तस्राव किंवा कमी रक्तस्राव योग्य करण्यासोबतच डिलीवरीच्या वेळी होणारे त्रास किंवा वेदना कमी करते.

शरीर डिटॉक्स करण्यास होते मदत
सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साइड आणि अन्य विषारी तत्त्व सुद्धा बाहेर येतात. सूर्यनमस्कार श्वासोच्छ्वास देखील सुधारित करते आणि फुफ्फुसांना बळकट करते.

स्मरणशक्ती चांगली होते आणि थायरॉईड ठीक होतं
सूर्यनमस्काराने स्मरणशक्ती देखील सुधारते. सूर्यनमस्काराचा परिणाम नर्व्हस सिस्टमवर पडतो आणि हे केल्यानं मेंदूमधून चांगल्या हार्मोन्सचे स्राव वाढतो. यामुळे केवळ तणावचं दूर होतं नाही तर यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. इतकेच नाही तर खासकरून थॉयरायड ग्लँडची क्रिया सुद्धा सुधारते.

शरीर लवचिक होतं
सूर्यनमस्कार फुल बॉडी एक्सरसाइज आहे. ही सर्वात चांगली कार्डिओ एक्सरसाइज मानली जाते. याच कारणामुळे सूर्यनमस्कार केल्यानं पूर्ण शरीर फ्लेक्सेबल होतं.

Source: WhatsApp Message
Courtesy: Creator of the contents
Note: For information only

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411014