Shilp Creation
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shilp Creation, Home decor, Pune.
24/03/2026
"उत्तर दिशेचे स्वामी, धनाचे रक्षक आणि यक्षांचे अधिराज - भगवान कुबेर देवता." या चित्रात साठवलेली आहे ती केवळ संपत्ती नाही, तर समृद्धी आणि आशीर्वादाची ऊर्जा! उत्तर दिशेकडून येणाऱ्या सकारात्मकतेचे प्रतीक.जिथे कुबेराचा वास असतो, तिथे समृद्धीची कमतरता नसते.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही संधी आणि यशाची दिशा मानली जाते. त्याच दिशेचे रक्षण करणाऱ्या कुबेर देवतेचे हे एक विशेष चित्रण. तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा ओघ अखंड वाहत राहो! 💰🙏
आजचं खरेदी साठी संपर्क साधा!
#कुबेरदेवता
# वास्तुशास्त्र
"गती आणि शक्तीचे साक्षात रूप: वायू देवता."
"जो अदृश्य असूनही अस्तित्वाचा आधार आहे, जो शांत आहे पण वादळाचे सामर्थ्य राखतो... वायव्य दिशेचे रक्षक 'वायू देवता' यांच्या दिव्य रूपाचे दर्शन."
"ज्यांच्या स्पर्शाने सृष्टी प्रवाही राहते, त्या प्राणवायूचे साक्षात रूप. वायव्य कोपऱ्याचे रक्षक आणि गतीचे अधिपती - पवनदेव. कलेच्या माध्यमातून मांडलेला एक दैवी प्रवास."
#वायूदेवता
11/03/2026
अष्टदिक्पालांमधील गूढ व्यक्तिमत्व - नैऋत्य देव.
•ज्यांचे वाहन 'शव' (नर-वाहन) आहे, हे वाहन केवळ मृत्यूचे प्रतीक नसून, ते 'तामसी वृत्ती' आणि 'अहंकारा' वरील विजयाचे प्रतीक मानले जाते.
• हे प्रतीक आपल्याला शिकवते की मृत्यू अटळ आहे आणि जीवनातील जडत्व संपवूनच स्थिरता प्राप्त होते.
• नैऋत्य देवता त्यांना राक्षसांचे पती किंवा नैऋत्य दिशेचे रक्षक मानले जाते. ही दिशा 'पृथ्वी तत्त्वा'शी संबंधित असल्याने ती स्थिरतेचे प्रतीक आहे.
•विनाशातूनच नवीन निर्मिती होते, हा सृष्टीचा नियम नैऋत्य देवता दर्शवतात.
#नैऋत्यदिशा #वास्तुशास्त्र #मराठाशैलीचित्र
"महाराज"
Shart / kurta Beaches
Size 2 in x 2in
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune