Sudarshan Choudhari

Sudarshan Choudhari

Share

सदस्य - पंचायत समिती हवेली, पुणे
संचालक- कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
मा. सरपंच - ग्रामपंचायत सोरतापवाडी

20/06/2026

भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🌸

भारताच्या लोकशाही परंपरेचा गौरव वाढवणाऱ्या, साधेपणा, संघर्ष, कर्तृत्व आणि सेवाभाव यांचे प्रेरणादायी प्रतीक असलेल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

त्यांच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगत, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

🇮🇳

19/06/2026

भाजपाचे जेष्ठ नेते व केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे वडील स्वर्गीय किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यांनी सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. एक निष्णात व नामवंत पैलवान म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. शिस्त, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी आपल्या कार्यातून पुढील पिढ्यांसाठी ठेवला आहे.

या दुःखद प्रसंगी मा. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि संपूर्ण मोहोळ परिवाराच्या दुःखात मी मनःपूर्वक सहभागी आहे.

परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणी सद्गती लाभो आणि संपूर्ण मोहोळ कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती, धैर्य व मानसिक बळ प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
॥ ॐ शांती ॥ 🙏🏻💐

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Sortapwadi
Pune
412201