Yewale Foundation
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yewale Foundation, Social service, Pune.
03/01/2026
आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिन्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते. आज या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.
01/01/2026
येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस येवले अमृततुल्य च्या प्रोसेस कॉर्डिनेटर मा.माहेश्वरी वाघमारे यांनी 500 रुपयाचा धनादेश येवले फांऊडेशनच्या सामाजिक कार्यासाठी सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे.धन्यवाद!
22/12/2025
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ भव्य उत्साहात संपन्न
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास येवले ग्रुपचे डायरेक्टर नवनाथ येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन SwiftNLift Media Group यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे हे कार्यक्रम एक उत्तम उदाहरण ठरले.
या राज्यस्तरीय सोहळ्यात जवळजवळ १२५ गुरुजन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे नवनाथ येवले यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित करत, “शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार आहेत,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला.
09/12/2025
आपणास शुभेच्छापत्र देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपण Mr. मोहब्बत wali चाय आपल्या या व्यवसायामुळे येवले ग्रुपच्या व्हिजनला स्फुर्ती मिळाली आहे. आपल्या कार्याचा व व्यवसायाचा आम्हांस आनंद व अभिमान आहे. आमच्या येवले ग्रुपच्या बेरोजगार मुक्त जग या व्हिजनच्या वाटचालीस आपण मोलाचे सहकार्य केल्या बद्दल आपणास कृतज्ञपुर्वक व आदरपूर्वक हे शुभेच्छापत्र देण्यात येत आहे. आपल्या भावी वाटचालीस मनः पुर्वक शुभेच्छा ! धन्यवाद !
20/10/2025
येवले फाउंडेशन तर्फे आस्करवाडीतील गरजू कुटुंबांना दिवाळी निमित्त मोफत किराणा वाटप
'आपल्या येवले अमृततुल्य' संचलित येवले फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामध्ये येवले फाउंडेशनच्या स्थापनेपासून गरजू कुटुंबांना दर महिन्याला मोफत किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. या परंपरेला पुढे नेत आज दिवाळीच्या शुभ प्रसंगीही फाउंडेशनतर्फे गरजू कुटुंबांना मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना सणाच्या काळात दिलासा मिळाला असून गावातील नागरिकांनी येवले फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. 🎆🎇🪔
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Pune
Opening Hours
| Monday | 9am - 6am |
| Tuesday | 9am - 6am |
| Wednesday | 9am - 6am |
| Thursday | 9am - 6am |
| Friday | 9am - 6am |
| Saturday | 9am - 6am |
| Sunday | 9am - 6am |