Lokvarta

Lokvarta

Share

महाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्? Lokvarta marathi news Agency

14/04/2024

मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?
कवठे येमाईतील मेळाव्यात आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हेंवर टीका

कवठे येमाई : "पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?" अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांबूरकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम इंचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की , आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत ६२९ प्रश्न मांडले, मी ११०२ प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे. पोपटराव गावडे म्हणाले की,

विकासकामांसाठी विकासपुरुष आढळराव पाटील यांना निवडून आणावेच लागेल. विद्यमान खासदार आले आणि गायब झाले. मात्र आढळराव पाटील यांनी जमिनीशी असणारी नाळ केव्हाच तुटु दिली नाही. जमिनीशी नातं असणारा हा नेता आहे. मतदारसंघात भरघोस निधी त्यांनी आणला आहे.

डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, कवठे येमाई गाव आणि आढळराव यांचे वेगळे नाते आहे. त्यांच्यासाठी आपण ठामपणे मागे आहोत. ज्यांना नियी असूनही वापरता आला नाही, त्यांचे हे काम नव्हे, त्यासाठी आढळराव पाटील यांना पर्याय नाही.

अभिजित बोराटे म्हणाले, सेटवरचा माणूस सेटवर पाठवायची हीच वेळ आहे. त्यांनी केवळ निधी आणण्याचे नाटक केले, म्हणून तर त्यांच्या काळातला ८० टके निधी परत गेला; मात्र अनुभवी अशा आढळराव यांनी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यांच्यासाठी आपले मत महत्वपूर्ण आहे.

Photos from Lokvarta's post 13/04/2024

भोसरीतून आढळराव पाटील यांना लाखाचे मताधिक्य देणार - आमदार महेश लांडगे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द सर्वोत्तम असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागू या. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा चे अधिकचे मताधिक्य मिळवून कही देण्याची जबाबदारी माझी, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

वाघोली येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजर पदाधिकाऱ्यांची सा समन्वय बैठक घेतली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडरसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे, आदींसह शिरूर लोकसभेतील भावपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. खासदार अमोल कोल्हे या मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजी आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त कामे केली आहेत.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुनर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसरमधील भाजप कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे. दख्यान, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याचे वचन सर्व पदाधिकान्यांनी यावेळी दिले.

Photos from Lokvarta's post 12/04/2024

"जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणजे शिवाजी आढळराव पाटील" : अपूर्व आढळराव पाटील

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार अशी लढत होत आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विरोधात अजितदादांचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटीत अशी रंगतदार लढत होत आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचार सुरू आहे.

शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या रमजान ईद च्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातीत भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छा देताना अपूर्व आढळराव पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचेही यावेळी अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

11/04/2024

"खासदार निवडणूक आला, आणि गायब झाला..!" आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला

पुणे : गेल्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. भारतातील असा एकमेव हा लोकसभा मतदारसंघ होता. अस म्हणत महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात चढवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कवठे येमाई येथे निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

जनतेकडून आम्ही वचनं घेतली म्हणून आम्ही प्रत्येक भागात गोरगरिबांसाठी जनता दरबार भरवतो. यासाठी ठिकठिकाणी माझी कार्यालय लोकांसाठी सुरू केली आहेत. मात्र मागच्या खासदाराने तुमची आमची सर्वांची फार निराशा केली आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाला खासदारच नव्हता. आपल्या मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही. त्यामुळे भारतातील हा असा एकमेव मतदारसंघ होता की या मतदारसंघात खासदार नव्हता. असे म्हणत आढळरावांनी कोल्हे यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागची निवडणुक झाली. त्यात खासदार निवडून गेले पण त्यानंतर खासदार गायब होता. असेही आढळरावांनी सांगितले. त्यावर आढळराव पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी फक्त टिका करत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मात्र मी त्यांचं वय पाहता त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की गेट वेल सुन असे म्हणत कोल्हेंनी त्यावर पलटवार केला.

दरम्यान, निवडणुकीसाठी आता शिरूरमध्ये प्रचार शिगेला पोहचला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल कवठे येमाई येथे निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली. त्यावर महायुतीच्या पाठीशी असलेला माय बाप जनतेचा भक्कम पाठिंबा अमुल्य असल्याचे शिवाजीराव आढळरावांनी म्हटले.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Moshi Spine Road
Pune
412105