Digital Prabhat PUNE

Digital Prabhat PUNE

Share

'Dainik Prabhat' Pune's Marathi Daily News Paper

Official Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va3rspz3rZZTSvqANJ3K

06/06/2026

क्षणात होत्याचं नव्हतं! वादळी पावसाने शिरूरमधील केळीची बाग जमीनदोस्त

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त झालं.काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने अडीच एकरांवरील केळीच्या बागेचा अक्षरशः चुराडा केला. वाऱ्याच्या तडाख्याने उभं असलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं. या पिकासाठी शेतकऱ्यांनी तब्बल चार ते पाच लाख रुपये खर्च केले होते. मात्र निसर्गाच्या एका फटक्यात सर्व काही हातातून निसटलं. आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, घर चालवायचं कसं, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर अद्याप कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही. कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोनही 'नॉट रिचेबल' लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.निसर्गाच्या संकटाने आधीच खचलेल्या या शेतकऱ्याला आता प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

#मांडवगणफराटा #अवकाळी #मान्सून #शेती #केळीबाग #शेतीनुकसान #शेतकरी #शिरूर

05/06/2026

पुलावरील रस्त्याचा गॅप मोजायला गेला अन् मोबाईल खाली पडला...

बिहारमधील मंगलपुर पुलातील पडलेली भेग दाखवताना एका तरुणाला अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला. व्हिडिओ शूट करताना तो भेगेची रुंदी दाखवत होता, मात्र त्याच वेळी त्याच्या खिशातून मोबाईल निसटून खाली पडला आणि पुलाखाली गेला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

05/06/2026

पुण्यात ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ...

05/06/2026

तुफान पाऊस! निमगाव केतकी पंचक्रोशीत पावसाची दमदार हजेरी...

05/06/2026

बारामतीत पहिल्याचं पावसात दाणादाण! सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडे कोसळली, रस्त्यांना तळ्याचे स्वरूप

05/06/2026

वृक्षलागवडीत पुणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार? मनसेचा गंभीर आरोप

#जागतिकपर्यावरणदिन #पुणे #पुणेमहानगरपालिका #भ्रष्टाचार #वृक्षलागवड #मनसे #राजठाकरे

05/06/2026

"पर्यावरण वाचवण्यासाठी सोशलमिडीयावर नव्हे मातीत उतरा!"

04/06/2026

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन...

#अनंतरावथोपटे

04/06/2026

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत ! न्यायालयाकडून ६ दिवसांची पोलीस कोठडी

#निलेशघायवळ #सचिनघायवळ

04/06/2026

बारामती : गळ्यात कांद्याची माळ, युगेंद्र पवार बैलगाडी घेऊन बारामतीच्या रस्त्यावर...

#युगेंद्रपवार #बारामती #महागाई #पेट्रोलडिझेलदरवाढ #महायुती #भाजप #मविआ

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


304 Narayan Peth
Pune
411030