Pune Rheumatology Center

Pune Rheumatology Center

Share

Dedicated to raising awareness of rheumatic diseases. PRINCIPLES OF CARE
Dr Patil’s practice is based on keeping professional knowledge and skills up to date.

13/05/2026

आम्हाला अलीकडेच एका रुग्णाने अपॉइंटमेंट बुक करण्यापूर्वी विशिष्ट प्रश्न विचारला:

“पुणे रुमॅटॉलॉजी सेंटरमध्ये RA / आमवातावर स्टिरॉइड्सशिवाय उपचार होऊ शकतो का?”
होय, अनेक रुग्णांमध्ये हे शक्य आहे.

संधीवाताचे निदान ऐकल्यावर अनेक रुग्णांच्या मनात सर्वात मोठी भीती असते:
“मला आयुष्यभर स्टिरॉइड्स घ्यावे लागतील का?”
आधुनिक RA उपचारांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे.

लवकर निदान आणि योग्य रुमॅटॉलॉजी केअर मिळाल्यास, आज अनेक रुग्णांना आधुनिक उपचार पद्धतीने DMARDs (disease modifying anti rheumatic drugs - जसे की मेथोट्रेक्सेट - जे आजाराला पुढे जाण्यापासून थांबवते) आणि नवीन टार्गेटेड थेरपीजद्वारे (biologics) दीर्घकाळ स्टिरॉइड्सशिवाय व्यवस्थित नियंत्रित करता येते.

स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर टाळण्याने होणारे फायदे:
✔ वजन वाढणे आणि चेहरा सुजणे (moon face) कमी होते
✔ शुगर आणि ब्लड प्रेशर चांगले नियंत्रणात राहते
✔ ऑस्टिओपोरोसिस आणि हाडे मोडण्याचा धोका कमी होतो
✔ इन्फेक्शनचा धोका कमी होतो
✔ दीर्घकालीन सुरक्षितता वाढते

मात्र, काही परिस्थितींमध्ये स्टिरॉइड्स अजूनही आवश्यक असतात:

• तीव्र आजाराचा फ्लेअर (अचानक वाढ)
• खूप झपाट्याने वाढत चाललेला संधिवात
• फुफ्फुस किंवा डोळ्यांचा सहभाग
• DMARDs काम करायला सुरुवात होईपर्यंत – ब्रिज थेरपी म्हणून

स्टिरॉइड्स ही “वाईट औषधे” नाहीत. योग्य पद्धतीने वापरल्यास ती अत्यंत प्रभावी आणि कधीकधी जीव वाचवणारी ठरू शकतात. समस्या असते ती अनावश्यक किंवा दीर्घकाळ डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय वापरल्याने.

स्टिरॉइड्स कधीही स्वतःहून अचानक बंद करू नका. नेहमी आपल्या रुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

पुणे रुमॅटॉलॉजी सेंटरमध्ये, आमचे ध्येय आहे – जेव्हा वैद्यकीयदृष्ट्या शक्य असेल तेव्हा प्रत्येक रुग्णावर स्टिरॉइड्सशिवाय उपचार करणे. आम्ही स्टिरॉइड्सचा वापर कमीत कमी करण्याचा किंवा पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतो, पण ते रुग्णासाठी त्या स्टेजला सुरक्षित आणि योग्य असेल तरच.

लवकर निदान आणि DMARDs (मेथोट्रेक्सेट सारखी) किंवा बायोलॉजिक्सचा वापर केल्यास स्टिरॉइड-मुक्त उपचार खूप जास्त प्रमाणात शक्य होतो.

जर तुम्हाला सतत सांधेदुखी आणि सकाळी उठल्यानंतर आखडल्यासारखे जाणवत असेल, तर लवकर रुमॅटॉलॉजिस्टला भेटा.

13/04/2026

रूमेटॉइड आर्थराइटिस एक बीमारी है, कलंक नहीं

वह अपनी 6 महीने की बच्ची को गोद में लेकर क्लिनिक में आई।
आंखों में आंसू थे… आवाज में खामोशी।

मैंने उसे तुरंत पहचान लिया।
वह मेरी एक मरीज की बेटी थी, जिनको कई सालों से रूमेटॉइड आर्थराइटिस था और हाथों में साफ दिखाई देने वाली विकृति थी।

उनकी बेटी की डिलीवरी के सिर्फ 2 महीने बाद ही हाथों के छोटे जोड़ों में दर्द और सूजन शुरू हो गई थी।
इससे पहले उसे कभी जोड़ों की कोई समस्या नहीं रही थी।
मुझे पूरा यकीन है, अगर उसे पहले कभी तकलीफ होती, तो उसकी मां उसे बहुत पहले ही दिखा देती।

लेकिन उसकी तकलीफ सिर्फ बीमारी तक सीमित नहीं थी।
घर में सब कुछ बदल गया था।
उसके पति ने उससे बात करना लगभग बंद कर दिया था।
ससुराल वाले उससे दूरी बनाने लगे थे।
उन्हें लगता था कि यह बीमारी उसे शादी से पहले से थी…
और यह बात उनसे छुपाई गई।
कुछ लोगों ने तो यह भी कह दिया कि यह उसे अपनी मां से “विरासत” में मिली है।

एक रिश्तेदार ने तो साफ कहा,
“तुमने गर्भावस्था में ठीक से ध्यान नहीं रखा होगा… इसलिए हुआ होगा।”

कुछ ही हफ्तों में उसे मायके भेज दिया गया।
दर्द की वजह से नहीं…
गलत धारणाओं की वजह से।

रूमेटॉइड आर्थराइटिस कभी-कभी डिलीवरी के बाद अचानक शुरू हो सकता है।
यह शरीर में होने वाले हार्मोनल बदलावों से जुड़ा होता है।
यह न पहले से पता चलता है,
न इसे रोका जा सकता है,
और न ही यह किसी की गलती होती है।

लेकिन असली सवाल यह है:
👉 समस्या बीमारी है?
👉 या उसके बारे में हमारी सोच?

संदेश
रूमेटॉइड आर्थराइटिस एक मेडिकल बीमारी है, कोई कमी या गलती नहीं।
👉 यह गर्भावस्था में हुई “गलतियों” की वजह से नहीं होता
👉 यह हमेशा विरासत में नहीं मिलता
👉 समय पर इलाज से मरीज सामान्य जीवन जी सकते हैं

कभी-कभी बीमारी सिर्फ जोड़ों को प्रभावित करती है…
लेकिन गलत सोच पूरी जिंदगी को प्रभावित कर देती है।

13/01/2026

औषधांच्या भीतीमुळे चुकलेला योग्य उपचाराचा मार्ग

३८ वर्षांचा एक पुरुष पायांना सूज येत असल्याने क्लिनिकमध्ये आला. त्याला वाटत होते की ही सूज सांधेदुखीमुळे, म्हणजेच Arthritis मुळे आहे.
तपासणी करताच लक्षात आले की ही सांधेदुखी नव्हती. पायात पाणी साचल्यामुळे आलेली सूज होती, ज्याला pitting edema म्हणतात. हे Nephrotic syndrome (किडनीतून प्रोटीन लीक होणे) चे लक्षण होते.

नंतर केलेल्या kidney biopsy मध्ये Membranous Glomerulopathy (MGN) NELL1 positive असे निदान झाले. अलीकडील संशोधनानुसार NELL1-positive MGN ही पारंपरिक / indigenous औषधांच्या सेवनाशी संबंधित आढळत आहे.

सविस्तर विचारल्यावर एक महत्त्वाची माहिती समोर आली. मागील एक महिन्यापासून तो धुळीच्या ऍलर्जीसाठी कोणत्या तरी अनधिकृत वैद्याकडून आयुर्वेदिक औषधे घेत होता.

त्याने ही औषधे का घेतली?

कारण त्याला वाटत होते की आधुनिक म्हणजेच modern medicines (ॲलोपॅथी) किडनीसाठी घातक असतात.

पण प्रत्यक्षात उलट घडले.

ती आयुर्वेदिक औषधे बंद केल्यानंतर, केवळ supportive treatment दिल्यावर त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली. इतर सर्व तपासण्या नॉर्मल होत्या.

हा विषय आयुर्वेदिक किंवा पारंपरिक उपचारांच्या विरोधात नाही. पण “natural” म्हणजे नेहमीच सुरक्षित असे नसते, आणि “modern” म्हणजे हानिकारक असेही नसते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

डॉक्टर म्हणून आम्हाला अनेक वेळा असे दिसते की ज्या औषधांची योग्य चाचणी, प्रमाणीकरण किंवा निरीक्षण केलेले नसते, ती किडनी, लिव्हर किंवा रक्त पेशींवर गंभीर परिणाम करू शकतात.

कधीकधी आजार वाढण्याचे कारण औषध नसते. तर योग्य उपचार घ्यायला अडथळा आणणारी भीती असते.

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune Rheumatology Center, Ground Floor, Flat Number 1, Sheetal Apartment, Opposite Mahaveer Jain Vidyalaya, Sathe Path, BMCC College Road Deccan
Pune
411004

Opening Hours

Monday 9:30am - 1pm
Tuesday 9:30am - 1pm
Wednesday 9:30am - 1pm
Thursday 9:30am - 1pm
Friday 9:30am - 1pm
Saturday 9:30am - 4am