Wellness Consulting by Dr. Vrushali Raut
We create "Happy Workplaces" by providing
- Well-being solutions
- Assessments
- Counselings
- Tr Our mission is to create happy workplaces for every Indian.
21/03/2025
उद्या शनिवार, २२ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ ला होणार्या या दीड तासाच्या ग्रुप सेशनच्या रजिस्ट्रेशन व फी संबधित माहितीसाठी 9822509226 यावर सकाळी ९ ते सायंकाळी ८ च्या दरम्यान संपर्क करा.
#मराठी #मन
16/09/2024
२००८ ला राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करताना एक भारतीय सैन्यात असलेला अधिकारी व त्याचे कुटुंब सहप्रवासी होते, प्रवास दिल्लीपर्यंत असल्याने बऱ्याच गप्पा झाल्यात. तो अधिकारी पंजाबी होता आणि मी मराठी आहे हे समजल्यावर त्याने लगेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सुरवात केली. भारतीय सैन्यात महाराजांचे स्थान किती आदराचे आहे हे तो ज्या पद्धतीने सांगत होता त्यावरून मला खूप छान वाटले.
अमराठी सैनिक युद्धात लढायची हिंमत यावी यासाठी महाराजांचे नाव घेतात. व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलशाली शत्रूशी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या guerilla warfare ज्याला मराठीत गनिमी कावा म्हणतात त्याचा वापर करून अमेरिकेला सळो कि पळो करून सोडले.
दुर्दैवाने ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले व लढले त्या महाराष्ट्रातील जनता मनाने एवढी कमकुवत झाली आहे.
विद्यार्थी आत्महत्येचा बाबतीत महाराष्ट्र्र भारतात एक नंबरवर आहे. अपघात, खून, बलात्कार, विचित्र प्रकारच्या हिंसक घटना वाढते याचे प्रमाण बघता महाराष्ट्र राज्यातील रोजचा दिवस नेटफ्लिक्स वरच्या एखाद्या विचित्र वेब सिरीज सारखा वाटतो. बुद्धिवंतांचे शहर पुणे आता कोयता गॅंग व ड्रग साठी बातम्यात राहत.
स्त्रियांसाठी सुरक्षित समजले जाणारे मुंबई शहर आता कोणासाठीही सुरक्षित नाही.
जिथे स्त्री शिक्षणाची सुरवात झाली असा महाराष्ट्रातील मुली-स्त्रिया या रील्स बनविणे व सासू सुनेचे सिरिअल्स बघण्यात मग्न आहेत.वेगवेगळ्या सामाजिक सुधारणांची सुरवात जिथून झाली त्या महाराष्ट्रातील तरुणाई मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या विळख्यात असून ती दिशाहीन झाली आहे.
"लढणारा महाराष्ट्र्र" हा "रडणारा महाराष्ट्र" का झाला असावा ?
छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य त्यांच्या आईने घडविले. त्यांची आई मजबूत नसती तर काय झाले असते? परकीयांच्या अन्यायात पिचलेला महाराष्ट्राला चैतन्य देण्याचे काम एका बाईने केले. जिजाबाईंचे चरित्र वाचल्यावर त्या काळाच्या किती पुढे होत्या हे कळत. अर्थात त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जसे घडविले व त्यांच्या जोडीदाराने, शहाजी महाराजांनी त्यांना दिलेली मोलाची साथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदीप्यमान आयुष्य घडवायला कारणीभूत ठरले.
जिजाबाई या जसे व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे तसेच पालकत्वाचे देखील आहे. "स्वाभिमानाने जगणे" ही आयुष्यातील मूलभूत गरज आहे व त्यासाठी हवे तेवढे कष्ट करण्याची तयारी हवी. छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी सकट अनेक भाषा अवगत होत्या. बुद्धी व ताकत एकत्र असण्याचे दुर्मिळ उदाहरण ते होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबासारख्या शत्रूशी २७ वर्ष लढणारी राणी ताराबाई ही देखील एक स्त्री होती. जिजाबाई किंवा राणी ताराबाई रडत राहिल्या असत्या व लढल्या नसत्या तर काय झाले असते?
अठरा पगड जातींना सोबत घेऊन महाराष्ट्रात उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्याचा दरारा हा पुढे देखील कायम राहिला. महाराष्ट्र्र हा अनेक सुधारणांचा व औदयोगिक क्रांतीचा केंद्र राहिला आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक सुबत्ता, सुरक्षित सामाजिक जीवन व विविध कला, खेळ यांचे मानबिंदू म्हणून मिरविणाऱ्या महाराष्ट्राची सध्याची अवस्था दयनीय आहे.
एकेमकांमध्ये भांडण्याची व पाय ओढण्याची वृत्ती, इंग्रजीच्या दूर राहणे, काळासोबत बदल न करणे, सतत इतिहासात रमणे यामुळे मराठी जनता नोकरी व व्यवसाय यामध्ये मागे जात आहे. अश्या वेळी स्त्रियांकडून खंबीरपणाची अपेक्षा असताना त्याच भावनिकरित्या गडबडलेल्या आहेत. कोणत्याही युद्धात सर्वात मोठे शस्त्र हे हिंमत असते, आपल्या पूर्वजांनी लढून, त्याग करून, प्रसंगी मरण पत्करून महाराष्ट्राला उभे केले आहे. याला तशीच ठेवायची जबाबदारी आपली आहे. अश्यावेळी हिंमत हारून कसे चालेल ?
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनही आपण जर निराशेत जात असू तर महाराज आपल्याला कळलेच नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.
#शिवाजीमहाराज #शिवराय #मराठी #महाराष्ट्र
#छत्रपती #छत्रपतीसंभाजीमहाराज #जिजाऊ
#मानसिक #मन
10/09/2024
National Crime Records Bureau (NCRB) च्या अहवालानुसार आत्महत्येच्या बाबतीत भारत जगात एक नंबरवर आहे.
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एका अहवालात भारतातील विद्यार्थी वर्गात आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असून महाराष्ट्र्र राज्य यात आघाडीवर आहे.
हा पोस्ट जो कोणी वाचत असेल त्यांना किंवा त्यांच्या आजूबाजूला कोणालाही खालील लक्षण आढळली तर लगेच त्यावर मदत घ्या.
हा आत्मघाताचा क्षण टाळता येतो.
आयुष्य एकदाच मिळत त्यामुळे काहीही झाल तरी तुम्ही त्या संकटातून बाहेर पडू शकता. आशा ठेवा व मदत मागायला लाजू नका.
#मराठी #महाराष्ट्र #आत्महत्या #डिप्रेशन #निराशा #आशा
09/09/2024
प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत🥰
प्रेमात देवदास झालेल्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.
देवदास अपयशी प्रेमासाठी स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेतात किंवा जिच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीला जीवानिशी मारतात. दोन्ही प्रकारात हिंसा आहे, प्रेम नाही.
प्रेम ही सकारात्मक भावना आहे असे आपण मानतो पण ती अनेक पुरुषांचे आयुष्य उध्वस्त करत आहे हे देखील सत्य आहे. सध्या प्रेम व लग्न या दोन्ही गोष्टींचा फटका पुरुषांना जास्त बसतो असा माझा डेटा सांगतो.
समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुण वर्गात पुरुषांचे प्रमाण खूप जास्त आहे, ब्रेकअप झाला म्हणून समुपदेशनासाठी येणाऱ्या मुली फार कमी आहेत. माझ्याकडे येणाऱ्या मुलींचे मेसेज हे फार गमतीशीर असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरची व्यक्ती एका विषयातील अभ्यासक असून तिला काहीतरी कळत असावे असे त्या मला अजिबात जाणवू देत नाही, माझा ज्ञानाचा अहंकार तिथे लगेच उतरतो. अश्या मुलींना प्रश्न असा असतो कि हा अमुक बॉयफ्रेंड आहे पण त्याला आयटी/सरकारी जॉब नसल्याने त्याला मी होकार देत नाही आणि यावर त्यांना माझं मत फुकटात हवं असत.😄
कामाला जाताना मेट्रोत शाळेतील मुलं-मुली जोडपं म्हणून वावरतात त्यावेळेस मी समजून जावं कि या पारोचा पूर्ण अभ्यास व काम हा देवदास करणार. पुढे हेच सत्र कॉलेज मध्ये सुरु राहत. मुलांकडून काम करून घेणे, सर्व गरजा पूर्ण करून घेणे (यात शारीरिक सुख पण येत) व पुढे नोकरीच्या ठिकाणी चांगलं ऑपशन मिळालं की याला पण धक्का मारून पुढे निघून जाणे हे ठरलेले आहे. कामाच्या ठिकाणी काम न करता बाकी सगळं करून लग्न मात्र व्यवस्थित पद्धतीने केलं जात. वेश्या बिचाऱ्या मजबुरीने या धंद्यात येतात. सर्व शिकून देखील इंस्टाग्राम वर शर्टाची बटण उघडे टाकून अश्या मुली कोणती क्रांती करतात यावर संशोधन व्हायला हवे.
एवढं वापरून फेकून दिल्यावर देवदास काय करतो तर तो डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःचा अभ्यास, करिअर बरबाद करून घेतो. या जुन्या आठवणीत रमलेला देवदास वर्तमानकाळातील बहुमूल्य वेळ वाया घालवितो.
अनेक मुली लग्न झाल्यावर किंवा ब्रेक अप झाल्यावर देखील आधीच्या बॉयफ्रेंडच्या संपर्कात राहतात, या मुली स्वतःचे आयुष्य चांगले जगत असून या मुलांशी संबंध ठेवतात, त्यांना भावनिक रित्या ब्लॅकमेल करत असतात. नात्यातील दोन संवेदनशील पुरुषांचे अश्या पद्धतीने जीव जाताना बघितले आहेत त्यामुळे स्त्रिया आयुष्य बरबाद करू शकतात याची खात्री आहे.
तुम्ही म्हणाल की देवदासला कळत नाही का ?
खरी ग्यानबाची मेख इथेच आहे. अनेक देवदासांचा अहंकार अश्या प्रेमाने सुखावतो, स्वतःची ओळख पुरेशी झालेली नसताना प्रेमात पडणे हे हॉर्मोन्सचा खेळ असून त्यात शारीरिक आकर्षण जास्त असत. देवदासला कसे खेळावयाचे हे पारोला माहीत असत, ती देवदासाचा अहंकार कुरवाळत असते, त्याच्या प्रगतीशी तिला काही घेणंदेणं नसत. किती पुरुष माझ्यावर मरतात/हा माझ्या प्रेमात देवदास कसा झाला हे या मुलींना मिरवायला आवडत. माझं लग्न झाल्यावर किंवा ब्रेक-अप झाल्यावर देखील हा अजूनही मला follow करतो याने त्यांचा अहंकार सुखावतो, यात त्या पुरुषाचे किती हाल होतात याच्याशी यांना काही सोयरसुतक नसत. पुरुषाला आपले आयुष्य बरबाद होतय याची जाणीव होत असली तरी आपला गेम होतोय हे त्याला कळत नाही किंवा कळेपर्यंत खूप उशीर झाला असतो. या अनारोग्यादायी नात्यात जाणाऱ्या मुलांच्या/पुरुषांच्या व्यक्तिमत्वात अनेक दोष असतात, घरची ओढ कमी असते, काही स्वभावाने साधे असतात, अनेकांना मानसिक त्रास असतात त्यामुळे मुलींकडून मिळालेली स्वीकृती त्यांना तात्पुरता आनंद देते.
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या पुस्तकावर आधारित देवदास सिनेमात हिरो देवदास हा जमीनदाराचा मुलगा असून पारो ही सामाजिक दृष्ट्या काही पायऱ्या खाली असते. हा अहंकारी जमीनदार त्याच्याच तोलामोलाच्या मुलीच्या का प्रेमात पडत नाही? देवदासचा आधुनिक अवतार असलेला अनुराग कश्यपचा देवं डी मध्ये देखील श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी असेच प्रकरण आहे. ज्या नात्यात आपल्यात चांगला बदल होईल, प्रगती होईल असे नाते अहंकार सुखावत नाही तर ते आपल्याला आव्हान देत म्हणून ज्या नात्यात प्रगती होते ते नातं खरं प्रेम असत. असे नाते दोघांचीही प्रगती करत.
अनेक वेळा आयुष्यातील आव्हान पेलता येत नाही म्हणून प्रेम हा सुटकेचा मार्ग म्हणून वापरलं जात. वाढत्या वयात अनेक ताण असतात त्यावेळेस "नात्यात असणं" हा तात्पुरता विरंगुळा असतो जे अनेकांच्या लक्षात येत नाही.
२५ पर्यंत शरीर व मेंदू पूर्णपणे विकसित नसतो त्यामुळे या वयात शारीरिक संबंध ठेवणं हे अत्यंत धोकादायक ठरत. २५ नंतर सारासार विचारबुद्धी विकसित होते त्यामुळे किमान तोपर्यंत शारीरिक नियंत्रण ठेवणं पुढे नात्यात व करिअर मध्ये कामात येत. माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या प्रत्येक देवदासला मी हेच समजावून सांगत असते.
ज्या मुली हुशार असतात, ज्यांची आयुष्यात ध्येय असतात त्या अश्या मार्गाला जात नाहीत. त्या स्वतः प्रगती करतात व सोबत जोडीदाराला पुढे जायला मदत करतात.
ज्यांना आयुष्यात काहीच नसत त्यांना देवदासची पारो व्हायचे ध्येय असते.
देवदास सिनेमातील पात्राला डिप्रेशन असून म्हणून तो व्यसनाच्या आहारी जातो हे आपल्याला आता कळत मात्र हे पात्र साकारताना अभिनेते दिलीप कुमार याना खरच डिप्रेशन येऊन ते त्या काळी लंडन मध्ये उपचारासाठी गेले होते.
केवळ पात्र साकारल्याने एवढा त्रास तर खरंच जे देवदास होत असतील त्यांना काय त्रास होत असेल कल्पना करा.
एवढा त्रास करून घेणाऱ्या मुलांना/पुरुषांना एवढेच सांगणे आहे की ज्याच्यासाठी आयुष्य बरबाद होत आहे ते प्रेम असू शकत नाही.
चांगलं नातं तुमची वाट बघत आहे, जरा धीर धरा मात्र असे नाते सापडल्यास त्या व्यक्तिला सोडू नका. 😊
#नाती #प्रेम #ब्रेकअप #आयुष्य #मराठी #व्यसन #यश #आशा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Pune
411029
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |