menakabooks.com

menakabooks.com

Share

Buy books of all Marathi Publishers and also ubscribe to popular magazines (Maher, Menaka and Jatra).

Menaka Classics 01/05/2022

महाराष्ट्रदिनी मुहूर्तमेढ मेनका क्लासिक्सची!
संवेदनशील कथांची, खणखणीत लेखांची आणि इरसाल विनोदाची ६२ वर्षांची साहित्यिक परंपरा असलेल्या मेनका प्रकाशनाचा नवाकोरा पॉडकास्ट ‘मेनका क्लासिक्स’ आज महाराष्ट्रदिनाच्या शुभमुहूर्तावर आम्ही सुरू करतोय. गेल्या सहा दशकांत माहेर, मेनका आणि जत्राचे अंक आपल्या सकस लिखाणानं फुलवलेल्या हजारो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या शब्दांना या पॉडकास्टमधून आवाज मिळणार आहे. या तिन्ही मासिकांत-दिवाळी अंकांत गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक उत्तम कथा, लेख, किस्से, मुलाखती या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळतील. आजच्या तरुणाईला मराठी साहित्याशी काही घेणं-देणं नाही, हा आरोप खोडून काढायचा असेल तर त्यांच्या आवडीच्या माध्यमातून आपला हा अनमोल वारसा त्यांच्यापर्यंत पोचवायला हवा. दुसरीकडं नवं काही करून बघण्यास, नवे प्रयोग करण्यास उत्सुक मंडळीही आजच्या पिढीत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळंच नाटक, चित्रपट, लेखन, संगीत, साहित्य, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या ताज्या दमाचे असंख्य नरेटर्स मेनका क्लासिक्समधल्या कथा, लेख वाचत आहेत.

मराठी साहित्यातल्या या नव्या प्रयोगाला तुम्ही सगळे रसिक श्रोते भरभरून प्रतिसाद द्याल, अशी आशा आहे. आज पहिल्या दिवशी प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे, हिदायत खान आणि प्रवीण दवणे यांच्या कथा आम्ही रिलीज केल्या आहेत. अभिनेता नचिकेत देवस्थळी, मृदगंधा दीक्षित आणि पुष्कर बोरकर यांनी त्यांच्या कमाल आवाजात या कथांचं वाचन केलं आहे. तर पॉडकास्टच्या ट्रेलरचा आवाज आहे प्रसिद्ध रेडिओ अँकर तेजश्री फुलसौंदर यांचा. मेनका क्लासिक्स हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय, जिओ सावन, गाना, अॅपल पॉडकास्ट, अॅमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट, पॉकेट कास्ट आणि यूट्यूब यापैकी कोणत्याही अॅपवर-पोर्टलवर मोफत ऐकू शकता.

तर श्रोतेहो सज्ज व्हा एका अनोख्या नॉस्टॅल्जियासाठी…गतकाळात रमून जाण्यासाठी…ऐकत रहा मेनका क्लासिक्स!

Menaka Classics Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.मेनका, माहेर आणि जत्र...

30/07/2021

'खादाड खाऊ' आणि मेनका प्रकाशन आयोजित -
विशेष पाककृती स्पर्धा - दिवाळी 2021

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune
411030