Corals

Corals

Share

Corals; Explore the unseen beauty Corals: Here we try to find out the unseen beauty.

14/01/2018

|| शिवतीर्थ रायगड अन गोनिदा ||

- एकदा ऐन हिवाळ्यात आप्पा रायगडी चित्त हरपून भटकत होते .
कोळींब तलावाच्या पुढे भवानी कड्याशी सलगी करीत. सोबत होती बाजारपेठेजवळची धनगरबाधंवाची काही कच्चीबच्ची अन लेबंडी - शेंबडी पोरं !

गवत छाती छाती एवढं वाढलेलं . साहजिकच आप्पा पुढं . अन सोबत हे औकीरकरांचे वंशांचे दिवे व पणत्या . जणु आकाशकंदिलाजवळ दिपावलीत लावलेल्या टिमटिमत्या दिव्या अन पणत्यांची रांगच भवानी कड्याकडे सरकत होती .

छातीभर वाढलेल्या हिरव्याधम्मक गवतात आप्पांना अचानक मागुन एक साद ऐकु आली .
केसांचे टारलं झालेल्या एका झिप-या पोरींनी आप्पांना विस्मयाने घातलेली ती साद होती .

" आप्पा !
हे कसं काय ? तुम्ही गवतातुन चालत अहात , अन मागं तुमच्या पायांचा मागही ऊरत नाही . हे कसं घडवता वं तुमीं ? "

आप्पा झिपरीच्या केंसावरून हात फिरवत मऊ लोण्याच्या गोळ्यागत ऊत्तरले .

" बाळे !
अगं ह्या गवतालाही इथं ताठ माझें ऊभं रहायचा अधिकार आहे. कारण हे गवत शिवरायांच्या राजधानीवरील गवत आहे . सह्याद्रीच्या ह्या शिवतीर्थावरील जगदिश्वराच्या पायातला हा घमघमता दवणाच जणु ! ती गवतकाडी , तो निसर्ग अन अनोळखी वनचर असा पायदळी तुडवणे ठिक नव्हे .

तुम्ही पोरं असं धसाधसा रानटीपणानं चालता की , जणु गडावर रणगाडाच चालला आहे. सगळ्या तृणांची अगदी नासधुस करीत अहात.

अगं !! असं नाजुकसं चालावं कि , आपल्या चालण्यानं भवंतालीच्या पाचोळ्यालाही ऊपसर्ग होऊ नये . निसर्गदेवतेलाही मान आहे . गवतकाडीलाही ईथे ऊभे असण्याचा अभिमान आहे . कारण हि गवतकाडी शिवतीर्थ रायगडावरील आहे. "

कां कमळावरी भ्रमर
पाय ठेवति हळुवार |
कुचुंबैल केसर
ईया शंका ||

_________ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज.

अर्थ : " भ्रमर कमळावर पाय ठेवतात खरे , पण ते केसरांनाही जाणवत नाही . तसेच भटकंती करताना निसर्गाशी वागावे.

श्रांत , सुश्राव्य अन ध्यानस्थ निसर्गदेवाशी चित्तशुद्धीने मैत्र जोडल्याविना तो अनाहुत ' वनचर ' ह्रद्यस्थ ऊपजणार नाही .

साभार : कहाणीमागची कहाणी .
- दुर्गमहर्षी गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर.

Want your business to be the top-listed Travel Agency in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


M G Road
Pune
411001