Savitri Forum,Pune.

Savitri Forum,Pune.

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Savitri Forum,Pune., Legal Service, Savitri Forum , c/o T-10 Hemkunj , Florida Estate, , Mundhwa, , Keshvnagar, , Pune 411036, Pune.

22/01/2026

सावित्री फोरम च्या सख्यांचे हळदी कुंकू, "कल्याण ज्वेलर्स, कर्वे रोड" येथे उत्साहात साजरे झाले.
या निमित्ताने सौ. श्रेया वैद्य यांनी रत्ने व खडे या बद्दलची उपयुक्त माहिती दिली.
या व्यवसायात त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे. आपले लाडके सुपरस्टार अमिताभ बच्चन जी यांनी सुद्धा सौ. श्रेयाजींचा सल्ला घेतला आहे.
(सौ. श्रेया वैद्य यांचा मोबाईल नंबर- 80876 14516.)
श्री. सुमित यांनी कल्याण ज्वेलर्स च्या भिशी सह अनेक योजनांची माहिती दिली.
गप्पा आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

25/06/2025

सावित्री फोरम तर्फे घेण्यात येणारा "विद्यानिधी" या शैक्षणिक मदतीच्या कार्यक्रमासाठी अजूनही देणगीचा ओघ सुरूच आहे.
आपण केलेले चांगले काम लोकांपर्यंत पोचायला वेळ. लागतो, पण एकदा आपल्या कामाचा सच्चेपणा,त्यासाठी घेत असलेली मेहनत हे लोकांपर्यंत पोचले की त्यांचा आपल्यावरचा विश्वास दृढ होत जातो.
2017-18 सालापासून सुरु केलेल्या या शैक्षणिक मदतीला आता ईतका भरभरून प्रतिसाद मिळतोय की आम्ही अजूनही ज्यांना खरंच गरज आहे अशा प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलींना उद्या मदत देऊ शकतोय..
तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास हिच आमच्या या चांगल्या कामाची खरी पावती आहे.
तुम्हा सर्वांचे खरंच खूप आभारी आहोत, ऋणी आहोत.
तसेच
यावर्षी "सावित्री फोरम" तर्फे दिला जाणारा "सावित्री" पुरस्कार आपल्या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्याला सैनिकांसाठी सियाचिन येथे ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करणाऱ्या सौ.सुमेधाताई योगेश चिथडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
भारतातली नाही तर जगातली समुद्र सपाटी पासून सगळ्यात उंच असणारी रणभूमी म्हणजे सियाचिन.
ज्या ठिकाणी तापमान उन्हाळ्यात - 35 डिग्री तर हिवाळ्यात - 60 डिग्री इतके कमी असते. अशा ठिकाणी आपल्या सैनिक बांधवांसाठी ऑक्सिजन प्लॅन्ट उभे करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे.
अशा या अशक्य गोष्टीचा ध्यास घेऊन तो तडीस नेणाऱ्या "सावित्री" ला यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच त्यांच्याच शब्दात त्यांचे मनोगत,अनुभव ऐकण्यासाठी नक्की या.
26 जून, 5 वाजता, पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरीयम, घोले रोड येथे.
😊कार्यक्रम विनामूल्य आहे. 😊

29/05/2025

🙏 _आवाहन_🙏

*सावित्री फोरम* चा एक स्तुत्य उपक्रम...
👩🏻‍🎓 *_विद्यानिधी योजना_*👩🏻‍🎓

नमस्कार..
*"सावित्री फोरम"* ही महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव देणारी अशी संस्था.
गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून त्याला मूर्त स्वरूप देण्यात ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
सामजिक भान ठेऊन सामजिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सांस्कृतिक असे अनेक कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेमार्फत घेतअसतो.
आपल्या समाजात अजूनही मुलींना किंवा महिलांना दुय्यम वागणूक किंवा स्थान दिले जाते ही शोकांतिका आहे.
*सावित्री फोरम* च्या. _विद्यानिधी_ या उपक्रमाअंतर्गत ज्या हुशार आहेत परंतु पैशा अभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा मुलींना शिक्षणापासून वंचित न राहता पुढे शिकता यावे यासाठी नेहमीच मदतीचा हात देते. अशा मुलींचा एक वर्षाचा शाळेचा पूर्ण खर्च धनादेशाच्या स्वरूपात शाळेकडे
सुपूर्द करण्यात येतो.
यावेळी आपल्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते.
यासाठी सावित्री फोरम तर मदत करतेच पण आपल्यासारखे अनेक दानशूर व्यक्ती सुद्धा आम्हाला या कामी भरभरून मदत करतात.
आपल्या सारख्या अनेक दानशूर /देणगीदार लोकांच्या मदतीने आतापर्यंत अनेक मुलींना याप्रकारे शैक्षणिक साहाय्य करता आले आणि त्यामुळे त्यांना वीना आर्थिक अडचण शिक्षण घेता येत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.
जास्तीत जास्त मुलींना याचा फायदा व्हावा यासाठी
आपणही आम्हाला या चांगल्या कामासाठी हातभार लावावा आणि आपल्याला शक्य तेवढी मदत करावी ही विनंती.कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे *विद्यानिधी* उपक्रमाचे धनुष्य पेलणे आम्हाला अजून सहज आणि सोपे होईल.
हा कार्यक्रम दिनांक 26 जून रोजी 5 वाजता जवाहरलाल ऑडोटोरीयम, घोले रोड येथे होणार आहे.
धन्यवाद.
*सौ. संयोगिता कुदळे,*
*सेक्रेटरी,*
*सावित्री फोरम, पुणे.*

अधिक माहितीसाठी संपर्क.
9921030001
9890795108
9764231911

Bank Details...
Savitri Forum
State Bank Of India.
East Street, Pune.
AC no...35295878794.
IFS Code...
SBIN0003861

Want your practice to be the top-listed Law Practice in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Savitri Forum , C/o T-10 Hemkunj , Florida Estate, , Mundhwa, , Keshvnagar, , Pune 411036
Pune
411036.