Trek Wake Click
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Trek Wake Click, Pune.
07/01/2025
नवीन वर्षाची सुरुवात प्राजक्ता आणि मृण्मयी बरोबर कोथरूडच्या टेकडी पासून झाली आणि तेव्हाच ठरवले की ट्रेकिंग परत सुरु करायचे.. मग गडाची शोधा शोध सुरू झाली. जवळ थोडा सोपा पण नवीन 😀 आणि गड सापडला.. घनगड
घनगड पुण्याच्या पश्चिम दिशेला, चांदणी चौक पासून 73 किलोमीटर वर आहे. पायथ्याचे गाव.. एकोले.
ताम्हाणी नंतर निव्हे गाव येते. त्या नंतर एक फाटा फुटतो तो पिंपरी- आहेरवाडी - बार्पे -भांबुर्डे - एकोले.
एक दहा किलोमीटर सोडल्यास बाकी रस्ता एकदम सुंदर आहे.
सकाळी 5.40 ला निघालो आणि 7.40 ला पायथ्याला पोहचलो.
सकाळचे वातावरण प्रसन्न वाटत असले तरी गारवा होता. ग्रामपंचायतीच्या पार्किंग पासून एक मळलेली वाट घनगड च्या दिशेने घेऊन जाते. 10 ते 15 मिनिटात आपण घनेश्वर महादेवाच्या मंदिरात पोहोचतो. शंकराची पिंड, नंदि अशी छोटेखानी रचना, पत्र्याचे छप्पर. बाजूलाच वीरगळ आहे.
वीरगळ म्हणजे ज्ञात अज्ञात वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.
इथून पुढे थोडी जंगलाची वाट सुरु होते. 10-15 मिनिटानी आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत.
मंदिरापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो. तिथे जवळ एक प्रचंड शिळा वरच्या कातळातून निसटून नैसर्गीक कमान तयार झाली आहे. तिथून परत मागे येऊन प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे.शिडीच्या संपताना डाव्या बाजूने पुढे गडाची वाट जाते.
कातळात कोरलेल्या पायर्यानी आपण पुढे जातो. इथेच कातळात टेहळणी साठी गुहा आहे. पुढे 12-15 पायर्या चढून आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून बालेकिल्ला मध्ये प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. वर 2-3 वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. बुरुजा मध्ये तोफे साठी झरोके आहेत. किल्ल्यावरून सुधागड, आणि तैलबैलाची भिंत हा विहंगम परिसर दिसतो.
इतिहास
* किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंताकडून अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता.
* छ. शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या ढमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले, त्याचबरोबर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला (१६४७). पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला (१६६५).
* महाराजांच्या नंतर किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसतो. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) काही काळासाठी या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता. १७०० मध्ये हा किल्ला शंकराजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता; परंतु छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला.
* १७१३ मध्ये याचा ताबा परत मराठ्यांनी घेतलेला दिसतो. पंतसचिवांच्या हुकमानुसार कान्होजी आंग्रे यांनी कोरीगड, राजमाची तुंग, तिकोना, लोहगड यांबरोबर घनगड जिंकून घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मध्यस्थीने छ. शाहू महाराज व आंग्रे यांच्यात झालेल्या तहात हा किल्ला छ. शाहू महाराजांकडे आला.
* भाऊसाहेबांच्या तोतया प्रकरणात सुखनिधान या कनोजी ब्राह्मण तोतयास या किल्ल्यावर काही काळ कैदेत ठेवण्यात आले होते. तसेच तोतयाला मदत करणारा धोंडो गोपाळ केळकर यालाही येथे कैदेत ठेवल्याचे उल्लेख मिळतात.
* बारभाई प्रकरणात राघोबा दादांना मदत करणाऱ्या सखाराम हरी गुप्ते यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते (१७७७).
* फितुरी उघड झाल्याने गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, परंतु १७७९ मध्ये किल्ल्यावरच सखाराम हरी गुप्तेंचा कैदेतच मृत्यू झाला. सखाराम हरी गुप्तेंची पत्नी त्यांना भेटायला किल्ल्यावर येण्यास निघालेली असताना तिला वाटेत तेलबैला जवळील घाटात गुप्ते यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या बातमीने बसलेल्या धक्क्यामुळे तिचे त्या घाटातच निधन झाले, तेव्हापासून त्या घाटाला ‘सवाष्णी घाट’ अथवा ‘सतीचा घाट’ म्हणून ओळखले जाते.
* पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात होता. बाळाजी कुंजीर यांच्याकडून कर्नल प्रॅाथर याने हा किल्ला कोणतीही लढाई न करता जिंकून घेतला (१७ मार्च १८१८).
01/06/2021
*१ जून दुर्गमहर्षी गोपाल निलकंठ दांडेकर यांची पुण्यतिथी हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो* त्यांच्या स्मरणा निमित्त त्यांनीच लिहिलेला एक अप्रतिम लेख.
*गोनीदांचे दुर्गप्रेमींना पत्र*
गडे हो !
अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपलं महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं.
तिथं असतो भर्राट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला !
ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश !
आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली होती. प्राणापलीकडे जपली होती. रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञापत्र तर तुम्हास ठावकीच आहेत. त्यात म्हटलं आहे.
'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झालीयावरी राज्य असे कोणास म्हणावे ? याकरीता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परीहार केले. हे राज्यतर तीर्थरूप थोरले कैलासस्वामींनी गडांवरूनच निर्माण केले.'
*आज्ञापत्रात आणिक म्हटलं*
'गडकोट विरहीत जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. या करीता ज्यास राज्य पाहीजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहूना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे चित्तास आणून कोणाचे भरवशांवर न राहता त्याचे संरक्षण करणे.'
आसे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय, त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्नं तुमच्या मनी उपजेल. त्याच एकच उत्तर आहे, आज दुर्गांऐवजी मतदारसंघ बांधले जातात. त्यांची उपेक्षा करणार
23/05/2021
प्रवास
भटकंती का करावी?प्रत्येक भटका हेच सांगेल कि शरीर स्वास्थ,तंदुरुस्ती, इतिहास वैगैरे,पण मला असे वाटते कि आपले नेहमीचे एखादे आयुष्य चालू असते तर ते आयुष्य जरा बाजूला ठेऊन एका वेगळ्या विश्वात आयुष्यात आपण जायला पाहिजे जेणे करून आपल्याला कळेल कि नेहमी वापरात असलेल्या गोष्टी सोडून आपण जगू शकतो कि नाही किंवा त्या गोष्टी शिवाय सुद्धा जगण्यात एक मजा आहे मग एक गोष्ट लक्षात येते कि आपण किती गोष्टींच्या आहारी गेलो आहोत का खरंच त्यांची आवश्यक ता आहे का? हे सर्व प्रश्न बाहेर गेल्यावर येतात -पडतात
एखाद्या ठिकाणा मागची भावना इतिहास संदर्भ परिणाम आणि त्याचा सध्याच्या परिस्थिती शी असलेली नाळ ह्या सगळ्याचा विचार करणे
विविध ठिकाणे बघण्याचे,त्या ठिकाणी पोहोचन्याचे कष्ट खूप अनुभव देऊन जातात.
नेहमीची ठिकाणे पाहण्या ऐवजी आडवाटेवर् ची ठिकाणे पाहायला पाहिजे.नेहमीच्या ठिकाणा वरती आता माणसाचे संस्कार झाले आहेत.व्यवसाय,पैसे,भेदभाव,द्वेष हे सगळे दिसते आणि हे खूप त्रासदायक आहे.त्यापेक्षा आड वाटे वरची ठिकाणे खूप सुख आणि आनंद देऊन जातात.
अश्या आडवाटेवरच्या प्रवासातील सोबती कायम स्मरणात राहतात किंवा खरे सोबती लक्षात येतात. माझ्या बाबतीत तेच सोबती आयुष्याच्या प्रवासात पण माझ्या सोबत आहेत.
ही आडवाटेवरची भटकंती एक ऊर्जा देऊन जाते आणि ती पुन्हा पुन्हा अनुभवांशी वाटते.
अभिजित जोगळेकर
17/08/2019
Bhodanadishwarswamy temple in bangalore
12/08/2019
Ooty colours
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Website
Address
Pune
411033