Maratha Magazine
Maratha Magazine is a Digital News & Magazine web portal which is Created for everyone who want to c
04/03/2025
सजा होण्या साठी आजुन किती वाट पहावी हद्द पार केली ह्या लोकांनी आणखीन ही वाट कसली पाहताय
क्रुरतेची हद्द पार नराधमाना शिक्षा कधी गुन्हा सिध्द झाल्यावर ही वाट कसली पहिली जात आहे
25/01/2025
रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने दुर्गराज रायगडावर हिरकणी बुरुज, श्रीगोंदा तलाव, आणि नाणेदरवाजा येथे संवर्धनाचे व पुनर्बांधणी कामे सुरू आहेत या ठिकाणी काल भेट देऊन पाहणी केली. हिरकणी बुरुज: संवर्धनाच्या कामादरम्यान येथे एक पाण्याचे प्राचीन टाके आढळले आहे. या टाक्याचा पूर्ण गाळ काढण्यात आला असून, सध्या बुरुजाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. श्रीगोंदा तलाव: गडाच्या श्रीगोंदा टोकावरील तलावाचे गाळ काढण्याचे आणि गळती रोखण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नाणेदरवाजा: गडाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नाणेदरवाजाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दारासाठी लागणारे मोठे दगड तयार करून त्यांना बसवण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल. महत्त्वाची सूचना: गडावर मोठ्या संख्येने पर्यटक व शिवभक्त येत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी संवर्धन, जतन, आणि पुनर्बांधणीचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी जाणे टाळावे. रायगड दुर्गसंवर्धन शिवरायांचा_गड ऐतिहासिकवारसा संवर्धनकार्य #रायगड #दुर्गसंवर्धन #शिवरायांचा_गड #ऐतिहासिकवारसा #संवर्धनकार्य
25/01/2025
सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत. सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाहीच तथापि राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श वैदयकिय महाविदयालय म्हणून छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालय लवकरच नावारुपाला आणण्याचे संर्वकष प्रयत्न केले जातील.
सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी अनेकांचे योगदान मिळाले असले तरी वैदयकिय महाविदयालय होण्यासाठी सर्वप्रथम 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी स्व.क्रांतिवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले, त्यानंतर लागणा-या विस्तीर्ण जागेचा प्रश्न राज्यशासनाशी चर्चा करुन, सोडवण्यात आल्यावर आता कृष्णानगर येथील विस्तीर्ण जागेवर वैदयकिय महाविदयालयाची उभारणी सुरु आहे. या वैदयकिय महाविदयालयात 100 विदयार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरु करुन, आज महाविदयालयाचे 4 थे वर्ष सुरु आहे. येत्या दोन वर्षात याठिकाणी पोस्टग्रॅज्युएशनची सुविधासुध्दा निर्माण होणार आहे. दरम्यानच्या काळात या महाविदयालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आला. या वैदयकिय महाविदयालयामुळे सातारच्या अर्थकारणाला बळ मिळण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचे नावामुळे सर्वाना नवीन प्रेरणा देखील सातत्याने मिळणार आहे.
वैदयकिय महाविदयालयाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण होत आलेले आहे. राज्यशासनही अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देत आहे. तथापि वैदयकिय महाविदयालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडूनही जरुर तो पाठपुरावा करुन आज रोजी 100 कोटी रुपये प्राप्त करुन घेण्यात आले असून, सदरची रक्कम महाविदयालयाकडे कालच जमा झाली आहे. केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.
या सहाय्य निधी मधुन महाविदयालयाची इमारत, निवास वसतीगृह, इत्यादी कामांसाठी उपयोगात येणार आहेत, आणखी दुस-या टप्यातील भरीव निधी देखिल येत्या सहा महिन्यामध्ये मिळवण्यात येणार आहे .
वैदयकिय महाविदयालयाचे उभारणीचे कामात असाधारण विलंब होवू नये म्हणून आमचे सातत्याने लक्ष आहे. वैदयकिय महाविदयालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
18/01/2025
ज्योती मंगल जाधव यांच्या नावे सोलापूर जिल्ह्यात 4 सातबारे ज्योती जाधव ह्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी ही प्रॉपर्टी कोणाची याला कोणी पैसे दिले याची चौकशी व्हावी !
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411038