Safe Climbing Initiative
http://www.safeclimbinginitiative.org/index.html Safe Climbing Initiative
(SCI)
What is SCI? Our accomplishments? Decision is yours.
01/07/2024
आनंदाची बातमी..
काल, 30 जून 2024 रोजी, नाशिक येथे झालेल्या 'सह्याद्री मित्र संमेलन २०२४' मध्ये, आपल्या Safe Climbing Initiative (SCI) या संस्थेला 'विशेष उल्लेखनीय कामगिरी - संस्था विभाग' हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
____________________________
सह्याद्रीच्या कातळकड्यावरील प्रस्तरारोहण मार्गांवर वा कधी कुठे अनभिज्ञ कातळकड्यांवर प्रस्तरारोहण - चढाई करताना कठीण ठिकाणी बोल्टींग करणं तसं जिकिरीचं आणि महाकठीण काम.
पण गेल्या २० हून अधिक वर्षांपासून, याच खूप जुन्या आरोहण मार्गांवरील बोल्टींग केलेल्या परंतू कालपरत्वे धोकादायक झालेल्या ठिकाणी रि-बोल्टींग करून जुन्या, धोकादायक बोल्टींगला नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या विशेष बोल्टस् ने रिप्लेस करणे आणि तो आरोहण मार्ग पुढच्या पिढीतील आरोहकांना अधिक सुरक्षित करून देणे, हे कामही वाटतं तितकं सोपं नाही.
या कामातनं सुरक्षितता हा पैलू अधिक प्रबळ करण्याचं काम करणाऱ्या "Safe Climbing Initiative" या पुण्यातील संस्थेस "विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या अधिक माहितीसाठी या माहितीपटात अधिक माहिती बघू शकता -
https://youtu.be/-qpCxNd64M8?si=49pm3lzrunv4WK2Y
तसेच खालील वेबसाईट वरही अधिक माहिती बघता येईल -
https://www.safeclimbinginitiative.org/
याचबरोबर श्री. आनंद पाळंदे यांना सहयाद्री रत्न आणि प्रियांका मोहिते यांना सह्याद्री युवा रत्न या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी श्री. उमेश झिरपे होते. इतर पुरस्कार वितरण, गिरिभ्रमण आणि सुरक्षितता यांविषयक चर्चासत्रे आणि सादरीकरणे यांसारख्या विविध कार्यक्रमांनी सह्याद्री मित्र संमेलनाची सांगता झाली.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Address
Pune