Management Consulting
We are "Business Doctors" based in Dubai UAE. We help clients in improving efficiency; consider strategic alternatives to achieve growth.
13/07/2024
*तुमचा व्यवसाय, उद्योग, सेवा जगभरच्या निवडक लोकांपर्यंत कसा काय पोहचेल?*
*विश्व पांथस्थ च्या माध्यमातून*
विश्व पांथस्थ मासिकात जाहिरात का करावी
अनिवासी भारतीय जवळपास ४८ पेक्षा जास्त देशांत स्थलांतरित झाले आहे. जवळपास २ करोड पेक्षा जास्त भारतीय या देशांत वास्तव्य करत आहेत. त्यापैकी मराठी अनिवासी साधारण २० लाख असतील. हे मराठी व अनिवासी भारतीय भारतातील अनेक वस्तूंची व सेवांची खरेदी करतात. त्याचे मूल्य दरवर्षी साधारण एक हजार करोड रुपयांपेक्षा जास्त असते. एनआरआय ची मुख्य गुंतवणूक अथवा खर्च रिअल इस्टेट, ट्रॅव्हल टुरिसम, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, रेस्टॉरंट व हॉटेल, फूड, कपडेलत्ते, एजुकेशन, रिटेल सेक्टर, एफएमसीजी, सामाजिक व धार्मिक संस्थांना दान, या प्रमुख सेक्टर मध्ये होते. त्यामुळे या सेक्टर मध्ये कार्यरत सगळ्या कंपन्यांनी, व्यक्तींनी, संस्थांनी मराठी अथवा भारतीय एनआरआय पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मासिकाबद्दल थोडक्यात
विश्व पांथस्थ हे अनिवासी भारतीयांसाठी २०१५ मध्ये सुरु केलेले RNI रजिस्टर्ड एकमेव मासिक आहे. आजपर्यंत या मासिकाचे छापील अंक युएई, बहरैन, सौदी अरेबिया, कुवैत, ओमान, भूतान, आफ्रिका, युरोप, रशिया, सिंगापूर, बँकॉक, मलेशिया, फार ईस्ट, अमेरिका या अनेक ठिकाणी पोहचले आहे. छापील अंक पाठवण्याचा खर्च जास्त येतो म्हणून डिजिटल स्वरूपात या मासिकाचा डिजिटल अंक सोशल मीडिया मधून अनेक सामाजिक मंडळे, बिझनेस फोरम, अनेक सामाजिक संस्था, हजारो व्यक्तींपर्यन्त पोहचतो. मासिकाची वेबसाईट आहे, एक मोबाईल ऍप आहे, त्याठिकाणी देखील जाहिरात प्रसिद्ध केली जाते. भारतात अनेक राज्यात हे छापील अंक तसेच डिजिटल अंक वितरित केले जातात. यातील असंख्य अंक फ्री दिले जातात. अनेक वाचनालये, अनेक कॉन्फरन्स या ठिकाणी हे अंक वितरित करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र राज्य सरकारने तसेच माजी मुख्यमंत्री यांनी मासिकासाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत व या उपक्रमाचा गौरव केला आहे.
विश्व पांथस्थ हे केवळ मासिक नाही, हा एक उपक्रम आहे. मासिक हे माध्यम आहे. आपले सहकार्य व सहभाग या उपक्रमाला एक नवीन ऊर्जा देईल. या माध्यमातूम तुमचा व्यवसाय उद्योग भरभराटीला आला तर आम्हाला त्याचा खूप आनंद होईल.
व्यवसाय वाढीची मोठी संधी
तुम्ही तुमच्या वरील क्षेत्रातील प्रोजेक्ट्स, प्रॉडक्ट्स, सर्विसेस याची जाहिरात विश्व पांथस्थ मध्ये करू शकता. वरील उल्लेख केल्याप्रमाणे या अनिवासी भारतीयांपर्यंत पोहचण्यासाठी विश्व पांथस्थ एक योग्य साधन आहे. अत्यंत किफायतशीर दरामध्ये विश्व पांथस्थ मध्ये जाहिरात देऊन आपल्या व्यवसायाची, प्रॉडक्ट्स, सेवा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा. आपला बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला याचा खूप उपयोग होऊ शकतो.
मासिकासाठी जाहिरातीचे दर (एका जाहिरातीसाठी दर रुपयात, सर्व जाहिराती रंगीत)
कव्हर पेज दोन - रुपये २०,००० कव्हर पेज तीन - रुपये २०,०००
बॅक पेज - रुपये २५,००० पूर्ण पान - रुपये १५,०००
अर्धे पान - रुपये १०,०००
ऍडव्हर्टोरिअल म्हणजे जाहिरातवजा बातमी अथवा लेख स्वीकारला जाईल. त्यासाठी मुलाखत घेणे, लेख अथवा विस्तृत जाहिरात तयार करणे, यासाठी मदत केली जाईल. त्याच्या शुल्काबाबत संपादकांबरोबर चर्चा करावी. सामाजिक उपक्रम अथवा संस्था यांना अधिक सवलत देण्यात येईल.
जाहिरात ३० दिवस अगोदर बुक केली व पूर्ण पेमेंट केले तर जाहिरात दरावर २०% वीस टक्के ते ३०% तीस टक्के पर्यंत सूट देण्यात येईल. जाहिरात सॉफ्ट कॉपी हाय रेसोलुशन मध्ये पीडीएफ व सीडीआर फाईल मध्ये द्यावी लागेल.
जाहिरात तयार नसेल तर जाहिरात तयार करण्यासाठी म्हणजे डिसाईन करण्यासाठी देखील मदत करण्यात येईल, डिसाईन चार्जेस वेगळे आकारले जातील. जाहिरातीचे संपूर्ण शुल्क जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी द्यावे लागेल.
जाहिरातीसाठी व अधिक माहिती साठी संपर्क -
ई-मेल – [email protected] |
मोबाईल व्हाट्सएप +91 9860678844 |
www.panthastha.com
धन्यवाद !
- *संपादक, विश्व पांथस्थ*
Vishwa Panthastha Vishwa Panthastha | Panthastha
*आरबीआय चे भारत सरकारला दोन लाख दहा हजार करोड रुपयाचे डिव्हिडंड पेमेंट*
आरबीआय पैसे कमावते? प्रचंड नफा कमावणे हा आरबीआयचा उद्देश आहे? कसे काय? आरबीआय हि सेंट्रल बँक आहे. इतर बँकांचे नियमन करणे, रिव्हर्स रेपो, बँकांना कर्ज देणे व इंटरेस्ट रेट बाबत निर्णय घेणे, फिस्कल व मॉनेटरी पॉलिसी याबाबत निर्णय घेणे, परदेशी चलनाचा व्यवहार करणे ज्यायोगे रुपया स्थिर राहील किंवा रुपयाची डॉलर व इतर करन्सी च्या तुलनेत मुल्य वाढेल, करन्सी प्रिंट करणे, अशा काही गोष्टी आरबीआय च्या अखत्यारीत येतात.
अशा या सेंट्रल बँकेला या वर्षी प्रचंड नफा झाला. कारण?
१. या वर्षी संपूर्ण वर्ष बाकी बँकांनी आरबीआय कडून कर्ज घेतले. साधारण ६.५ % ने. त्या कर्जाचे व्याज हे आरबीआय चे उत्पन्न. बँक आरबीआय कडून कर्ज का घेतात? कारण आरबीआय नियमानुसार काही रक्कम अनामत ठेवी बँकांना आरबीआय कडे ठेवण्यास भाग पाडते. म्हणजे बँकांकडे असलेला इतरांना कर्ज देण्यास मुक्त असलेला निधी कमी पडतो. मग आरबीआय पुन्हा बँकांना त्यांच्याच निधीतून कर्ज देते. असा हा खेळ आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना महाग कर्ज मिळते. आरबीआय ने पॉलिसी बदलली तर बँक सामान्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. पण आरबीआय असे करत नाही. या व्याजामुळे आरबीआय ला प्रचंड आर्थिक फायदा होतो व सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड तोटा. मग आरबीआय त्यांच्या हाय इंटरेस्ट रेट पॉलिसी चे विविध प्रकारे समर्थन करते.
२. आरबीआय कडे असलेला विदेशी मुद्रा साठा याचे पुनर्मूल्यांकन केले असता त्यात जो फरक येतो, त्यामुळे आरबीआय ला फायदा होतो. थोडक्यात रुपयाची घसरण झाली तर आरबीआय ला आर्थिक लाभ होतो. पर्यायाने भारत सरकारला प्रचंड मोठा डिव्हिडंड मिळतो. या डिव्हिडंड मुळे फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट कमी होते. पण आरबीआय ने योग्य प्रकारे विदेशी मुद्रेचे नियमन केले तर भारतीय रुपया वधारू शकतो, रुपया वधारला तर आयात मूल्य कमी होते, त्यामुळे महागाई कमी होण्यास प्रचंड मदत होऊ शकते. आपली अर्थव्यवस्था आजही आयातीभिमुख म्हणजे निर्याती पेक्षा आयात जास्त अशीच आहे व त्यात येत्या पाच दहा वर्षात काही बदल होण्याची शक्यता नाही. मग रुपया का वधारू देत नाही आरबीआय? इतकी प्रचंड परकीय चलनाची गंगाजळी का साठवण ठेवते, ज्यामुळे खरे बघता रुपया घसरतो, वधारत नाही.
३. करन्सी प्रिंट केली तर त्या मूल्यावर आरबीआय फीस घेते, हे त्यांचे उत्पन्न. मग करा नोटबंदी, करा बाद नोटा, छापा नव्या नोटा आणि मिळवा उत्पन्न. काय हा प्रकार? आणि नोटबंदी २०१६ मध्ये झाली, आता २०२३-२४ मध्ये आरबीआयने अशा किती नोटा छापल्या ज्यावर आरबीआयने इतकी फीस कमावली?
४. अजूनही बरेच मुद्दे आहेत, जे आरबीआयच्या सरकार धार्जिण्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला बाधा पोहचेल अशा निर्णयांवर व सो कोल्ड रेगुलेशन वर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते.
मुळातच आरबीआय चे परफॉर्मन्स अनालिसिस कुणी करत नाही. सरकार खुश कारण दोन लाख करोडपेक्षा जास्त डिव्हिडंड आरबीआय ने सरकारला दिला. जगात अनेक सेंट्रल बॅंक्स अशा आहेत कि त्या तोट्यात चालू आहेत, कारण प्रचंड प्रॉफिट कमावणे हा सेंट्रल बँकेचा हेतूच नाही. लोकधार्जिणे चलन व व्याजदराबाबत निर्णय घेणे, भारतीय चलन वधारेल असे निर्णय घेणे हा आरबीआय चा हेतू असावा.
याकरता आरबीआय ला स्वायत्तता असणे आवश्यक आहे. नेमकी तीच स्वायत्तता दशकापूर्वी कडून घेतली. सत्ताबदल होईल ना होईल, पण जेव्हा रुपया वधारेल, वित्तीय व व्यापारी तूट कमी होईल, सर्व व्याजदर कमी होतील, महागाई कमी होईल, होऊसहोल्ड सेविंग्स वाढतील, देशांतर्गत गुंतवणूक वाढेल, रोजगार वाढेल, सर्वसामान्यांचे व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे रामराज्य येईल, तो खरा सुदिन.
- डॉ संदीप कडवे
२३ मे २०२४. पुणे.
dr@in3bet .com
लेखक आर्थिक, उद्द्योग व सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411057
Opening Hours
| Monday | 9:30am - 4:30pm |
| Tuesday | 9:30am - 4:30pm |
| Wednesday | 9:30am - 4:30pm |
| Thursday | 9:30am - 4:30pm |
| Saturday | 9:30am - 4:30pm |
| Sunday | 9:30am - 4:30pm |