Mandake Fincorp

Mandake Fincorp

Share

We are financial services providers of Mutual funds/SIP , Pension plans, Tax saving Products & Life/

10/04/2025

"बाबा, हे टीव्ही वर असलेले ट्रम्प आजोबा ना?" कुठल्यातरी यू ट्यूब व्हिडिओमध्ये बघितलेली व्यक्ती बातम्यांमध्ये दिसल्यावर माझ्या 5 वर्षाच्या मुलानी विचारले....

सध्या घराघरात जगात चालू असणाऱ्या व्यापार युद्धाच्या बातम्यांच्या चर्चा सुरू आहेत. दिवसागणिक चढणारे आणि कोसळणारे शेअर बाजार याबद्दल सोशल मीडियामुळे लोकांना बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे...

कोणी म्हणतो चीनला याचा फटका बसणार, कोणी म्हणतो युरोपचे काय होणार? तर कोणी म्हणतो भारताचे काय होईल? पण हे व्यापार युद्ध नक्की आहे तरी काय?

दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला आली. भांडवलशाही देश असल्याने साहजिकपणे अमेरिकेने जगभर भांडवलशाहीचा पुरस्कार केला. सुरुवातीला नाईलाजाने काही देशांनी याला अनुमती दिली परंतु मुक्त व्यापार धोरणामुळे आधी जपान आणि नंतर चीन,भारत, कोरिया सारख्या देशांच्या अर्थव्यवस्था नावारूपाला येऊ लागल्या; चीन सारख्या देशाने तर गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेला थेट आव्हान दिले...

आता जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान टिकवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच अमेरिकेने बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर आयात कर वाढवण्याची भाषा केली. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेबाहेर गेलेले उद्योगधंदे अमेरिकेत पुन्हा आणणे हे जरी उद्दिष्ट असले तरी यामुळे अमेरिकेतच मोठी भाव वाढ आणि महागाई पाहायला मिळणार आहे. यामुळे अमेरिका आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली. भारतासारख्या देशाला चीन आणि अमेरिकेच्या या व्यापार युद्धात झळ जरूर बसेल परंतु चीनवरील वस्तूंवर कर वाढवल्याने निर्माण झालेल्या पोकळीमध्ये भारताला बाजारपेठ काबीज करण्याची नवीन संधी देखील उपलब्ध होईल.

अमेरिकेच्या अशा या बेभरवशाच्या भूमिकाबदलामुळे युरोपमधील मित्र देश तसेच ऑस्ट्रेलिया सारखे काही देश हे चांगलेच दुखावले गेले त्यामुळे नवीन उदयाला येणारी एक जबाबदार आर्थिक महाशक्ती म्हणून भारताला जगात स्थान बळकटी करण्यासाठी निश्चितच संधी उपलब्ध झाली आहे. आता भारत या संधीचा कसा उपयोग करेल हे येणारा काळच ठरवेल...

लेखक:
प्रीतम मांडके

27/03/2025

Photos from Mandake Fincorp's post 02/03/2025

Another feather in the cap for Mandake Fincorp 🙏🙏
Accepting this award from HDFC ERGO Health Insurance🙏🙏

We are thankful for the continued trust and support of our customers and well-wishers...

Want your business to be the top-listed Finance Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


A 538 Ideal Park
Pune
411046