Rohit Rajendra Pawar

Rohit Rajendra Pawar

Share

MLA from Karjat-Jamkhed

13/07/2026

पंढरपुरला जाताना अपघाती निधन झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना – २०२५’ अंतर्गत ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील वर्षी घेतला परंतु वडगाव, ता. खटाव (जि. सातारा) येथील श्री. जयराम स्वामी मठाच्या दिंडीतील दशरथ माने यांच्यासह मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे या अन्य दोन अशा एकूण तीन वारकऱ्यांची पुण्यतिथी जवळ आली तरी अद्याप त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही. ही अक्षम्य दिरंगाई असून या वारकऱ्यांसह आज जेजुरीजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांनाही शासनाने तातडीने मदत द्यावी. मा. बावनकुळे साहेब आपण यामध्ये व्यक्तीशः लक्ष घालावं, ही विनंती!

Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule

12/07/2026

नाव ‘शेखर सुमन’ असलं तरी चुकीच्या गोष्टीवरही त्यांच्याकडून ‘स्तुतीसुमन’ ऐकण्याची अपेक्षा सत्ताधारी कशी करु शकतात?

‘देशातील सर्वोत्तम आणि विश्वासू ड्रायक्लिनर’, स्थापना – २०१४’, अशा तिखट शब्दांत आपल्या शोच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर सडकून हल्ला चढवल्यामुळंच अभिनेते शेखर सुमन यांच्याशी संबंधित चित्रपट निर्माता आणि त्यांच्या कंपनीवर ED ने छापे मारले, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी सोडलेल्या वस्तूनिष्ठ टीकेच्या बाणाने सत्ताधारी चांगलेच घायाळ झालेले दिसतायत. घोटाळेबाजांना पक्षात घेऊन पवित्र करायचं आणि वस्तूस्थिती मांडणाऱ्या कलाकारांच्या मागं ED ची पिडा लावायची, ही कसली लोकशाही? ही तर अघोषित आणीबाणी आहे.

Even though his name is Shekhar Suman, how can those in power expect him to shower praise on things that are plainly wrong?
"The country's best and most trusted dry cleaner. Established – 2014." It is precisely because actor Shekhar Suman launched such a blistering attack on the ruling party through his show, in words as sharp as these, that the ED has raided the film producer associated with him and his company. This is as clear as sunlight.
The ruling establishment has clearly been left badly wounded by the arrow of fact-based criticism that Shekhar Suman let fly. Take the scamsters into your party and sanctify them — and set the affliction of the ED loose on artists who simply state the facts. What kind of democracy is this? This is nothing but an undeclared Emergency.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Srujan House, Ganeshdatta Co-Operative, SHRUJAN HOUSE, Plot No 10A, HSG Society, Sahakar Nagar, Parvati
Pune
411009