Sahyadri Books
Sahyadri Books is online bookstore selling books about Sahyadri, its history nature and travel.
07/01/2026
महाराष्ट्रातील विरगळ
युध्दात, कधी साहसी कृत्यात प्राण गमावलेल्यांना वीर म्हटले जाते. अशा वीरांची स्मारके गावकऱ्यांकडून अथवा कुटुंबियांकडून आदरपूर्वक उभी केली गेली. त्यांना वीरगळ म्हटले जाते. वीरगळांची संख्या आपल्या येथील खेडोपाडी लक्षणीय प्रमाणांत आढळते. सती गेलेल्या मृत स्त्रियांची स्मारकेही आढळतात. वीरगळ हे ही आपला इतिहास समजून घेण्याचे साधन होऊ शकते.
श्री. सदाशिव टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील विरगळ या अनोख्या ग्रंथरूपी दालनातून इतिहासाच्या साधनांमध्ये मोलाची भर टाकली आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. गूंथर सांथायमर यांनी सर्वप्रथम संस्कृतीच्या या प्रकारच्या अपारंपरिक ऐतिहासिक साधनांकडे लक्ष वेधले होते. श्री. टेटविलकर यांनी त्यांची वाट पुसत आपल्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून साकारलेला हा ग्रंथ ज्ञानपूर्ती आणि माहितीच्या डोहात पुढचे पाऊल टाकणारा आहे.
To purchase this book link in comment-
30/12/2025
वनस्पती रचनाशास्त्र
वनस्पती रचनाशास्त्र तथा plant morphology ही आधुनिक वनस्पतीशास्त्राची सर्वाधिक जुनी शाखा आहे. तिचा उगम वेदांमध्ये, विशेषतः अर्थवेदात आढळतो. ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल याच्या लिखाणातही प्राथमिक रचनाशास्त्र आढळून येते. रचनाशास्त्राच्या दोन शाखा आहेत बाह्यरचनाशास्त्र (External morphology ) आणि अंतरारचनाशास्त्र (Internal morphology or anatomy). त्यापैकी वर्गीकरणशास्त्रासाठी आणि सामान्य माणसांना आवश्यक आणि महत्त्वाची शाखा आहे बाह्यरचनाशास्त्र. श्री. द. महाजन तथा बापू यांनी रचनाशास्त्राचे हे पुस्तक लिहून मराठीत वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्यांची, वनस्पतीप्रेमींची फार मोठी सोय केलेली आहे.
To purchase this book link in comment-
25/12/2025
वॉरन हॅस्टिंग्ज
हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल असलेला वॉरन हॅस्टिंग्ज हा माणूस अतिशय प्रामाणिक, चारित्र्यवान प्रशासक होता. गव्हर्नर असताना त्याने बंगालच्या राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. त्याला भारतीयांविषयी खास आपुलकी होती. त्याने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करवून घेतले आणि त्याला छान प्रस्तावना लिहिली. एका झुंजार राज्यकर्त्याची आणि कुशल प्रशासकाची ही कहाणी लेखक अरविंद जोग यांनी मराठी वाचकांसमोर आणली आहे.
To purchase this book link in comment-
22/12/2025
निसर्गक्षण
निसर्ग अभ्यासक राम मोने यांनी कोणत्याही मदतीशिवाय कासवांच्या नवजात पिल्लांचे किनाऱ्यावर प्रकट होणे, गरुडाच्या पिल्लाने अथांग आकाशात प्रथमच भरारी घेणे अशा वेगवेगळ्या निसर्गक्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न निसर्गक्षण या पुस्तकात केला आहे.
To purchase this book link in comment-
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Dahanukar Colony, Kothrud
Pune
411038