Legal Triangle
A Trusted Team of NOTARY Lawyers for Best Results in Legal Matters as wel Supportive Services Customers acr
03/12/2025
लाखो, करोडो रुपयांचे घर घेऊनही, शिकले सवरलेले असूनही आजही पार्किंग हा विषय समजलेला नाही अशी शेकडो उदाहरणे आहेत.
बिल्डर सर्रासपणे "agreement of allotment of stilt parking space" असा करारनामा करून बेकायदेशीर पणे "स्टील्ट" पार्किंग विकत आहेत.
एखादी पार्किंग, एखादी वस्तू विकल्यानंतर जो, घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये करार होतो, त्याला "agreement of sell" किंवा "agreement of purchase" असे म्हणतात आणि असा करार फ्लॅट धारक आणि बिल्डर यांच्यामध्ये होणे आवश्यक आहे.
आपण पार्किंग विकत घेतले असेल तर, आपला करारनामा तपासून घ्या.
बिल्डरने पार्किंग allotment करणे, तसेच त्याचा उल्लेख तुमच्या फ्लॅटच्या करारनाम्यात करणे महापालिका आणि रेराने बंधनकारक केलं आहे.
पार्किंग allotment केले याचा अर्थ पार्किंग तुम्हाला विकले असा होत नाही, त्यावर संपूर्ण अधिकार हा सोसायटीचा आहे, असतो!
*मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.*
ग्राहकांनो जागृत व्हा आपले अधिकार जाणून घ्या.
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही अशी संस्था आहे जी मोफत, कोणताही मोबदला न घेता मार्गदर्शन करते आणि ग्राहकांना स्वतः यात पुढाकार घ्यायला लावते, त्यांना सजग बनवते.*
तेव्हा आपल्याला पण अशा काही अडचणी असतील तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधा.
वाहनासाठी स्वतःच्या नुकसानीची पॉलिसी पुरेशी नाही; 'थर्ड पार्टी' विमाही आवश्यक.
स्वतःच्या नुकसानीची पॉलिसी असूनही विमा मिळत नसेल तर या पॉलिसीसाठी पैसे घेऊन विमा कंपन्या फसवणूक करीत असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.
#अखिलभारतीयग्राहकपंचायत #ग्राहक #फसवणूक, #जागरूकहोऊयात #ग्राहकआयोग, #ग्राहकपंचायत #जागरूकनागरिक #पॉलिसी #इन्शुरन्स #क्लेम #मेडीक्लेम #ग्राहकमंच
05/11/2025
🏠 नवीन फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी?
लेखिका : नोटरी ॲडव्होकेट प्रतिभा इंगळे
घर खरेदी ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गुंतवणूक असते. त्यामुळे भावनिक आनंदाबरोबरच कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची योग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही मुद्दे लक्षात घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतात.
1️⃣ मालकी हक्क व कागदपत्रे तपासा
विक्रेत्याकडे त्या मालमत्तेचा स्पष्ट मालकी हक्क (Title) आहे का हे पहा.
मागील 30 वर्षांचा मालकी इतिहास (Search Report) आणि Encumbrance Certificate (EC) तपासा.
मालमत्तेवर कोणतेही कर्ज, गहाण, न्यायालयीन प्रकरण नाही याची खात्री करा.
2️⃣ बांधकाम परवानग्या आणि मंजुरी
स्थानिक नगरपरिषद/महानगरपालिका यांची बांधकाम परवानगी (Building Permission) आणि Approved Layout Plan तपासा.
Commencement Certificate (CC) आणि Occupancy Certificate (OC) मिळाले आहेत का ते पहा.
प्रकल्प RERA मध्ये नोंदणीकृत (RERA Registration No.) आहे का हे पाहणे अत्यावश्यक आहे.
3️⃣ कर व बिलांची पडताळणी
मालमत्ता कर (Property Tax), वीज बिल, पाणी बिल, सोसायटीचे देयक इ. सर्व भरले आहेत का हे पाहा.
मागील देयकांचे थकबाकीपत्र मागा.
4️⃣ विक्री करार (Sale Agreement) काळजीपूर्वक वाचा
करारातील प्रत्येक कलम नीट समजून घ्या.
फ्लॅटचा Carpet Area, सामायिक जागेचा हक्क, देखभाल शुल्क, हस्तांतरणाची अट या बाबी स्पष्ट लिहिलेल्या असाव्यात.
आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला (Legal Opinion) घ्या.
5️⃣ नोंदणी प्रक्रिया (Registration Process)
व्यवहाराची नोंदणी उपनोंदणी कार्यालयात (Sub-Registrar Office) कायदेशीर पद्धतीने करा.
योग्य स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क (Stamp Duty & Registration Fees) भरा.
नोंदणीनंतर मालकी हस्तांतरण प्रमाणपत्र आणि Index II सुरक्षित ठेवा.
6️⃣ तांत्रिक तपासणी
बांधकामाची गुणवत्ता, वीज-पाणी जोडणी, व्हेंटिलेशन, ड्रेनेज, पार्किंग व्यवस्था इ. बाबी स्वतः पाहा.
शक्य असल्यास सिव्हिल इंजिनियरकडून इन्स्पेक्शन रिपोर्ट घ्या.
7️⃣ सोसायटी किंवा बिल्डरचे नियम
सोसायटीची स्थापना झाली आहे का, तिची नोंदणी क्रमांक (Registration No.) तपासा.
बिल्डरच्या हस्तांतरण करारातील जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत का हे पहा.
✍️ निष्कर्ष
नवीन फ्लॅट खरेदी करताना थोडी जरी अधिक काळजी घेतली तरी भविष्यातील कायदेशीर व आर्थिक अडचणी टाळता येतात. विश्वासू ॲडव्होकेटकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करूनच व्यवहार करावा — हाच या लेखाचा मथितार्थ आहे.
---
लेखिका : नोटरी ॲडव्होकेट प्रतिभा इंगळे
098235 22006
(कायदेशीर सल्लागार, मालमत्ता व्यवहार व कागदपत्र तज्ज्ञ)
23/06/2025
#म्र्य्त्युपत्र्
WILL DEED | मृत्युपत्र इच्छापत्र कोणी, कधी व का करावे | मृत्यूपत्राचे फायदे व आजची गरज
https://youtube.com/shorts/o_nR4QqMCHI?feature=shared
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Off. No. 1, Shinde Heights, Near Godambe Chouk, Rahatani
Pune
411017
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |