Manthan Education

Manthan Education

Share

Manthan means 'to churn'.... A thought provoking churning process in everybody's learning.

12/01/2026

भारतीय जनमानसात स्वातंत्र्याची व नवरचनेची प्रेरणा निर्माण करणाऱ्या योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांना विनम्र प्रणाम! 🙏🙏🙏

22/12/2025

📐 २२ डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस 📐

🔢 श्रीनिवास रामानुजन : दक्षिण भारतातील साधा मुलगा ते जगप्रसिद्ध गणितज्ञ 🔢

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी सध्याच्या तामिळनाडूमधील इरोड येथे झाला. त्यांचे बालपण अतिशय संघर्षमय होते. लहानपणापासूनच त्यांना संख्यांशी विशेष जिव्हाळा होता. इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना, रामानुजन मात्र आकड्यांमध्ये रमायचे. सततच्या आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या मनात संख्यांबद्दल विलक्षण आकर्षण निर्माण झाले. लहानपणीच ते घरातील हिशोब लक्षपूर्वक पाहत आणि क्षणार्धात उत्तरे सांगत.

प्राथमिक शाळेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अवघ्या १० व्या वर्षी त्यांनी इंग्रजी, तमिळ, भूगोल आणि अंकगणित या विषयांच्या परीक्षा जिल्ह्यातील सर्वोच्च गुणांसह उत्तीर्ण केल्या. पुढे टाऊन हायर सेकेंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना औपचारिक गणिताची ओळख झाली. वयाच्या ११–१२ व्या वर्षीच त्यांनी मोठ्या विद्यार्थ्यांएवढे गणित आत्मसात केले होते. त्रिकोणमिती, भूमिती आणि अनंत मालिकांमध्ये त्यांना विशेष रस होता.

रामानुजन यांची प्रतिभा जशी विलक्षण होती, तसाच त्यांचा संघर्षही मोठा होता. गणिताव्यतिरिक्त इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे त्यांची शिष्यवृत्ती गमावली गेली आणि शिक्षण खंडित झाले. गरिबी इतकी वाढली की अनेक वेळा त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी गणित सोडले नाही. कागद-पेन नसताना जमिनीवर, पाटीवर किंवा कोळशाने भिंतीवर ते सूत्रे लिहीत.

त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण म्हणजे १५–१६ व्या वर्षी मिळालेले G.S. Carr यांचे “A Synopsis of Elementary Results in Pure and Applied Mathematics” हे पुस्तक. या पुस्तकात हजारो सूत्रे होती, पण कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. रामानुजन यांनी प्रत्येक सूत्रामागील तर्क स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्यांनी नवी प्रमेये, बर्नौली संख्या आणि इतर महत्त्वपूर्ण गणिती निष्कर्ष मांडले.

आपल्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी इंग्लंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ प्रो. जी. एच. हार्डी यांना पत्र लिहिले. हार्डी यांनी रामानुजन यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि १९१४ मध्ये त्यांना केंब्रिजला बोलावले. तेथे हार्डी आणि लिटलवूड यांच्या सहकार्याने रामानुजन यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

पुढे ते रॉयल सोसायटीचे फेलो, तसेच ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे पहिले भारतीय फेलो ठरले. दक्षिण भारतातील एका साध्या घरातून निघालेला हा मुलगा जगप्रसिद्ध गणितज्ञ झाला.

रामानुजन यांचे गणितातील योगदान -
१९१४-१९१९ या ५ वर्षांत रामानुजन यांनी २१ शोधनिबंध लिहिले.
Pi च्या अनंत मालिकेच्या सूत्राचा शोध (Infinite series of Pi)
रामानुजन थिटा फंक्शन
रामानुजन-हार्डी संख्या – १७२९ ही संख्या ही ‘रामानुजन-हार्डी संख्या’ म्हणून ओळखली जाते.
p(n) साठीची अनंत मालिका, डग्लस-रामानुजन आयडेंटिटी, हायपर जॉमेट्रिक सिरीज, कंटिन्यूड फंक्शन, हार्डी-रामानुजन राउंड नंबर असे अनेक शोध सांगता येतील.

✨ रामानुजन यांचा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की प्रतिभा, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही मर्यादा ओलांडता येते.

📘 राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त या महान भारतीय गणितज्ञाला विनम्र अभिवादन!

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Sumanthan, , C/o Kulkarni Construction Pvt. Ltd. , Vishwa Karma, Parvati, 529/3/1, Sinhgad Road, Anubandh Nagar, Dattawadi
Pune
411030