Goel Prakashan

Goel Prakashan

Share

Publisher and Wholesaler of Regional Language Books

10/10/2025

किताब का सारांश और खरीदने का लिंक नीचे दिया गया है

ऑर्डर के लिए कॉल या व्हाट्सएप नीचे दिए नंबर पर करे
+919284793579

Amazon
https://amzn.to/48ukxXz

बातें जो कह देते तो आज़ाद हो जाते।
बातें जो सुन लेते तो संवाद हो जाते।
बातें जो जी लेते तो आबाद हो जाते।

‘दिल की अनकही बातें’ उन तमाम जज़्बातों का ख़ज़ाना है, जो हमारे दिल की गहराइयों में दबी रह जाती हैं। उनके साथ-साथ, हमारे ज़मीर का एक हिस्सा भी कहीं खो जाता है। हम अधूरे रह जाते हैं—और चाहकर भी पूरी तरह जीवन नहीं जी पाते। सामाजिक मनोवैज्ञानिक और लाइफ़ कोच मनीष श्रीवास्तव ने पिछले दो दशकों में हज़ारों लोगों के अनुभवों, संघर्षों और आत्म-संवाद को सुना, समझा, और उन्हें कविताओं व किस्सों के माध्यम से संजोया है। यह पुस्तक 12 अध्यायों में विभाजित है—हर अध्याय एक दरवाज़ा खोलता है, जो हमें यादों के गलियारों से होते हुए उस जीवन-मोड़ तक ले जाता है, जहाँ कुछ अधूरा छूट गया था। फिर यादें ताज़ा होती हैं, अनकही बातें साझा होती हैं, और घावों को एक आंतरिक शक्ति में परिवर्तित करने की राह मिल जाती है। अंदर आइए—शायद आपकी भी कोई अनकही बात, आज आपको आज़ाद करना चाहती हो।

01/10/2025

खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.to/3Kuvi28

एका भयानक सूडचक्रात अडकलेला शापित चिरंजीव अश्वत्थाम्याने आपल्या क्रोर्यात आपल्या मामाला, चिरंजीव कृपाचार्यांना अत्यंत दुराग्रहाने सामील करुन घेतले. प्राचीन भारतातील थोर प्रजाहितदक्ष बळीराजा, महाभारतकार व्यासमुनी चिरंजीव वज्र हनुमानाच्या सेवावृत्तीने संतुष्ट होऊन रामाने त्याला बह्मविद्या दिली. तसेच असा वर दिला, की जोवर रामकथा अस्तित्वात आहे, तोवर तू अमर राहशील!
लंकाधिपती रावणाचा धाकटा भाऊ विभीषण, आणि जमदग्नी ऋषी आणि इक्ष्वाकू राजाची कन्या रेणुका ह्यांचा पुत्र परशुराम...
हे सातजण सप्तचिरंजीव म्हणून ओळखले जातात. या सप्तचिरंजीवांची ही अत्यंत बोधक व रंजक अशी ही कहाणी आहे.

19/09/2025

खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1

Amazon:
https://amzn.to/4mqey9g

जे. कृष्णमूर्ती यांचे संपूर्ण आयुष्य आणि त्यांची शिकवण यांनी २०व्या शतकाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे. अर्वाचीन काळातील मानवी चेतनेवर त्यांच्या शिकवणूकीचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीत अतिशय दुर्मिळ अशी करुणा व विचारांची स्पष्टता आहे. इतकेच नव्हे तर, समोरच्याची वेदना-तडफड बरे करण्याची शक्ती त्यात निश्चितपणे आहे. मुख्य म्हणजे त्यातील शब्द व विचार कमालीचे प्रवाही आहेत. या दैनंदिनी-चिंतनिकेतून जे. कृष्णमूर्तीची शिकवण किती प्रगल्भ व परिपक्क आहे, याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल !

कृष्णमूतींची शिकवण परिपूर्ण असून, ती मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते. शारीरिक स्तरांपासून खोल माणसाच्या अंतर्यामापर्यंत समग्र मानवी जीवनाचा यात अंतर्भाव होतो. रोजच्या जीवनातील समस्यांना सामोरे जायला, ही शिकवणच आपल्याला सर्वतोपरी सहाय्यभूत ठरणार आहे. कृष्णमूर्ती विचारधारेच्या दिव्यत्त्वाच्या प्रकाशात जीवनाचे अंतरबाह्य विकसन परिवर्तन सहज घडू शकते.

कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीच्या आरशात आपण जे आहे ते परावर्तित होताना सहज पाहू शकतो! यातही ही शिकवणूक आपल्या आतील प्रत्यक्ष जीवन-वास्तवाच्या आकलनास निश्चितपणे सहाय्यभूत ठरते, ठरू शकते ही शिकवणूक आपण प्रत्यक्ष जगलो तर एक क्षितिजरहित अवस्था आपल्याला प्राप्त होईल आणि ती कालातीत व कोणत्याही मर्यादशिवाय असेल, असा कृष्णमूर्तीचा सांगावा आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने जे. कृष्णमूर्तीची शिकवण तुम्ही दैनंदिनीच्या-चिंतनिकेच्या स्वरुपात अनभवू शकाल ! अर्थात त्यासाठी ग्रंथासोबत एकत्रित संवाद करीत प्रवास करणे महत्त्वाचे आहे. जे. कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीचे सारच एक नव्या मांडणीत संकलित-संपादित करण्याचा अल्पसा-नम्न प्रयत्न या पुस्तकाल करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथाचे सारे श्रेय जे. कृष्णमूर्तीचेच आहे, मी फक्त निमित्तमात्र !

Emotional Intelligence (Marathi) 26/06/2025

खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.in/d/dEGUQOx

‘स्व’ भावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ज्या विद्यार्थ्यामध्ये वा व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता सुदृढ असते, तो जीवनात यशस्वी व समाधानी असतो. त्यांच्यात आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वतंत्रता, स्वनियंत्रण, मैत्री, जागरुकता, प्रशंसा, मानसिक शांतता, इच्छा, समाधान अशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. आनंदी व गुणवत्तायुक्त जीवन जगण्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता तयार करणे नितांत गरजेचे असते.

Emotional Intelligence (Marathi) ‘स्व’भावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्य.....

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Jay Towers, 162, Budhwar Peth, Besides Balaji Temple
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm