Janhvi Foundation

Janhvi Foundation

Share

Janhvi Foundation is a non-profit, non-governmental organization dedicated to improving and upgrading quality of life .

Photos from Janhvi Foundation's post 08/05/2026

जान्हवी फौंडेशनतर्फे फुटपाथ व रस्त्यावर राहणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत दर गुरुवारी मुलांना मूलभूत शिक्षण, अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन व शैक्षणिक प्रेरणा देण्यात येणार आहे. यावेळी जान्हवी फौंडेशनच्या कर्मचारी रेखा बोरकर मॅडम यांनी मुलांना प्रेमाने व आपुलकीने शिक्षण देत मार्गदर्शन केले. हा उपक्रम वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Photos from Janhvi Foundation's post 13/11/2025

बेघरांसाठी उबदार हात – श्री. राजेंद्र आडेसरा यांची जनसहभागातून दिलेली उबदार देणगी

थंडीच्या दिवसांत बेघर नागरिकांना उबदार आसरा मिळावा, या सामाजिक जाणिवेतून श्री. राजेंद्र कुमार आडेसरा (रा. ३६७, सोमवार पेठ, नरपतगिरी चौक, शिवम सोसायटी, पुणे-११) यांनी ५० ब्लँकेट्सची देणगी देऊन मोलाचे योगदान दिले आहे.

ही देणगी जान्हवी फौंडेशन संचलित दिवस-रात्र निवारा प्रकल्प, पुणे स्टेशन येथे स्वीकारण्यात आली.
प्रकल्पाच्या काळजीवाहक रेखा बोरकर मॅडम यांच्या विनंतीवरून आणि सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत श्री. आडेसरा यांनी ही मदत पुढाकाराने दिली.

त्यांच्या या उदात्त कृतीमुळे अनेक बेघर आणि निराश्रित नागरिकांना हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळेल आणि त्यांना मानवतेची ऊब लाभेल.

जान्हवी फौंडेशन तर्फे श्री. राजेंद्र आडेसरा यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.
त्यांच्या या मानवतावादी योगदानामुळे समाजात दयाभाव आणि परस्पर सहाय्याची भावना अधिक दृढ होईल.

— जान्हवी फौंडेशन तर्फे मनःपूर्वक धन्यवाद! 🌸

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


482/A Shripal Apartment Bajirao Road, Shaniwar Peth
Pune
411030