MarathiRang

MarathiRang

Share

MarathiRang

Photos from Being Marathi's post 21/02/2019

रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.

त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.

वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.

आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.

मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?

किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.

चहाची टपरी चालवतेय. पोरगी खरंच जिगरबाज आहे.

:- प्रा. हरी नरके,

52 श्लोकी गुरुचरित्र..! 30/11/2017

52 श्लोकी गुरुचरित्र..!

52 श्लोकी गुरुचरित्र..!
श्री गुरुदेव दत्त...!!!
Like : Shri Dattaguru (श्री दत्तगुरू)

13/10/2017

आज पुण्याच्या पंक्चर स्कॅम ची बातमी बघण्यात आली. न झालेल्या पंक्चरच्या भीती चा बागुलबुवा मानगुटीवर बसवून साडे तीन - चार हजार रुपये उकळणारी टोळी कार्यरत आहे म्हणे तिथं. अर्थात प्रामाणिकपणे सेवा देणारे अनेक जण आहेत. काही दोन-पाच दुष्प्रवृत्तीनमुळं सगळेच बदनाम होतात.
आणि हा माझ्या कोल्हापुरातील राजू पंक्चरवाला. माझ्याच गाडीचं नवीन टायर तीन साडेतीन इंच फाटलं. ज्यांच्याकडे घेतलं, त्यांनी सांगितलं... नवीन घ्या. ह्याला काहीही करता येत नाही.
मी अमोल ला फोन केला.
तो म्हणाला, "पाच मिनिट थांब".
त्याचा परत फोन आला, "टायर घिऊन ये माझ्याकडं. मी राजू ला फोन केलाय. त्यो ईल पाच मिनिटात".
मी तिथं गेलो तेव्हा राजू येऊन थांबला होता.
टायर बघून त्यानं सांगितलं, देतो की करून. संध्याकाळी ६ पर्यंत या.
संध्याकाळी राजू च्या पडळकर मार्केट च्या दुकानात गेलो. माझी नवी कोरी टायर तयार होती.
घराच्या दारातच दुकान. राजुच्या आईने झक्कास चहा करून दिला. गप्पा-टप्पा झाल्या.
राजुने थोडेच पैसे घेतले; माझे खूप पैसे वाचवले.
राजू फोन केला की कोल्हापुरात जिथे असाल तिथे येऊन पंक्चर काढून देतो. दिवसा, रात्री... कधीही. आणि हो; मोजकेच पैसे घेतो.
आपल्या झालेल्या सोयीची जाण न ठेवण्याइतके आपण अजाण नाही. परंतु आपण देऊ केलेले जास्तीचे पैसे तो नम्रपणे नाकारतो.
राजू मुजावर : ९८९०८६२०२९.

Source: Mandar Vaidya

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune