Mehta Multi-Stores
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mehta Multi-Stores, Electronics, Mehta Multi-Stores, Rajatadri Complex, Below Sakaal Paper Office, Near Badhiye Petrol Pump, Shivaji Circle, Rahimatpur Road, Powai Naka, Satara.
27/01/2026
मेहता मल्टी-स्टोअर्स में गणतंत्र दिवस समारोह
विनोद कुलकर्णी के हाथों ध्वजारोहण
सातारा | 26 जनवरी 2026
पोवई नाका स्थित मेहता मल्टी-स्टोअर्स में गणतंत्र दिवस का ध्वजारोहण समारोह बड़े उत्साह और देशभक्ति के वातावरण में संपन्न हुआ। मेहता परिवार एवं पोवई नाका व्यापारी मित्र मंडल द्वारा आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल के कोषाध्यक्ष तथा 99 वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन की आयोजन समिति के कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित रहे।
विनोद कुलकर्णी सातारा जिले में पत्रकारिता, सहकार क्षेत्र और मराठी साहित्य आंदोलन से सक्रिय रूप से जुड़े एक प्रख्यात व्यक्तित्व हैं। मराठी साहित्य को व्यापक मंच उपलब्ध कराने, युवा पीढ़ी तक उसकी विरासत पहुँचाने, सांस्कृतिक गतिविधियों को प्रोत्साहन देने तथा मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिलाने के लिए जागरूकता और वैचारिक संवाद के माध्यम से उन्होंने महत्वपूर्ण योगदान दिया है।
अपने संबोधन में उन्होंने कहा कि गणतंत्र दिवस केवल एक उत्सव नहीं, बल्कि संविधान, लोकतांत्रिक मूल्यों और समानता की भावना को सुदृढ़ करने का अवसर है, और राष्ट्र निर्माण के साथ-साथ भाषा व संस्कृति के संरक्षण की जिम्मेदारी भी हम सभी की है।
इस अवसर पर आयोजित सम्मान समारोह में सर्वप्रिय शंकरराव माळवदे का स्वीकृत नगरसेवक के रूप में नियुक्ति के उपलक्ष्य में सम्मान किया गया। साथ ही नवनिर्वाचित नगरसेवक विश्वतेज बालगुडे एवं युवा नगरसेवक अक्षय जाधव को भी सम्मानित कर उनके भावी सामाजिक एवं विकासात्मक कार्यों के लिए शुभकामनाएँ दी गईं।
कार्यक्रम के सफल आयोजन के लिए सभी आयोजकों का उपस्थितजनों द्वारा हार्दिक अभिनंदन किया गया।
27/01/2026
मेहता मल्टी-स्टोअर्स प्रजासत्ताक दिन सोहळा;
विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण
सातारा: २६ जानेवारी २०२६ रोजी पोवई नाका येथील मेहता मल्टी-स्टोअर्समध्ये प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यंदा या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष तसेच ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मेहता परिवार आणि पोवई नाका व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विनोद कुलकर्णी हे सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता, सहकार क्षेत्र आणि मराठी साहित्य चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. साताऱ्यात आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. सातार्यात साहित्य चळवळीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, नव्या पिढीपर्यंत मराठी साहित्याचा वारसा पोहोचावा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, या दृष्टीने त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनजागृती, वैचारिक मांडणी आणि साहित्यिक संवादाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून, मराठी भाषेच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वावर भर देणारे कार्य त्यांनी केले आहे.
आपल्या मनोगतात विनोद कुलकर्णी म्हणाले, “प्रजासत्ताक दिन हा केवळ सण नाही, तर संविधान, लोकशाही मूल्ये आणि समानतेची जाणीव अधिक दृढ करणारा दिवस आहे. देशासाठी योगदान देताना आपण आपल्या भाषा-संस्कृतीचे संवर्धनही तितक्याच निष्ठेने केले पाहिजे.”
यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात सर्वांचे लाडके शंकरराव माळवदे यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले नवनिर्वाचित नगरसेवक विश्वतेज बालगुडे आणि तरुण नगरसेवक अक्षय जाधव यांचाही गौरव करून त्यांच्या भावी सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
15/08/2025
मेहता मल्टी-स्टोअर्स स्वातंत्र्यदिन सोहळा;
ॲड. वर्षा देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सातारा: १५ ऑगस्ट २०२५ रोजी पोवई नाका येथील मेहता मल्टी-स्टोअर्समध्ये स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून दलित महिला विकास मंडळाच्या सचिव व प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या मा. ॲड. वर्षा देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मेहता परिवार आणि पोवई नाका व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
वर्षा देशपांडे: महिलांसाठी प्रेरणादायी लढा
वर्षा देशपांडे यांनी ३५+ वर्षांपासून महिलांच्या हक्कांसाठी, स्त्री-भ्रूणहत्या विरोधात, बालविवाह प्रतिबंधासाठी आणि ग्रामीण महिलांच्या मालमत्ता हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे. ‘लक्ष्मी मुक्ती’ मोहिमेद्वारे शेतजमिनीत पती-पत्नीचे संयुक्त मालकी हक्क प्रोत्साहन, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आणि लिंगभेद कमी करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
२०२५ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार (UN Population Award) मिळाला असून, हा सन्मान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या – यापूर्वी फक्त इंदिरा गांधी आणि जे.आर.डी. टाटा यांना हा पुरस्कार मिळाला होता.
आपल्या मनोगतात देशपांडे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझा नाही, तर महिलांच्या सन्मानासाठी, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आपण सर्वांनी मिळून समानतेचे समाजव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करायला हवे.”
ध्वजारोहण सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. शंकर माळवदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
14/08/2024
26/01/2024
🏆 'शिवछत्रपती पुरस्कार विजेती' प्रतीक्षा मोरेच्या हस्ते ध्वजारोहण 🎉
📍 मल्लखांबामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आणि 'शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या' कु. प्रतीक्षा लक्ष्मण मोरे हिच्या हस्ते, मेहता मल्टी-स्टोअर्स, पोवई नाका येथे 26 जानेवारी 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे, भारताच्या प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. 🇮🇳
🎙️ यावेळी प्रतिक्षाने आपले मनोगत सांगताना, माझे शिक्षण बी.ए. अर्थशास्त्र झाले असून, आई-वडील शेतकरी आहेत असे सांगितले. मी समर्थ 'मल्लखांब संघ' कारी या संस्थेची खेळाडू आहे. मला प्रशिक्षक म्हणून 'शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या' माया मोहिते आणि विश्वतेज मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले. 🌟
🌍 मी पहिली जागतिक 'मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा' 2018-19 साली खेळली. आत्तापर्यंत मी वैयक्तिक 3 रोप्य पदके व 1 सांघिक सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 6 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, यामध्ये 7 सुवर्णपदके व 4 रोप्यपदके पटकावली आहेत. 🥇🥈
🇮🇳 यावेळी तिने 'प्रजासत्ताक दिन' निमित्त ध्वजवंदनासाठी निमंत्रित केले याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास आवर्जून राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू पल्लवी मोरे उपस्थित होती. 🙌
💐 प्रारंभी प्रतीक्षा मोरे हिचे विवेक मेहता व पोवई नाका व्यापारी मित्र यांनी, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले आणि प्रतीक्षा व पल्लवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 🌟
🙏 श्री. शंकर माळवदे यांनी प्रास्ताविक आणि आभार व्यक्त केले.
15/08/2023
‘पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट अपूर्वा अलाटकर हिच्या हस्ते ध्वजारोहण’
पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट आणि साताऱ्याची कन्या कु. अपूर्वा अलाटकर हिच्या हस्ते, मेहता सेल्युलर पोवई नाका येथे 15 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे, भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला.
पुणे मेट्रोचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाल्यानंतर, अपूर्वा ही पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला ठरली होती. अपूर्वाने मेट्रोची 'मास्क ऑन की' च्या साथीने आणि सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण करीत रेल्वे क्षेत्रात साताऱ्याची मान उंचावली.
कु. अपूर्वा हिने आपल्या मनोगतामध्ये, मी मेट्रो चालवण्याचे ध्येय गाठण्यासाठी खाजगी नोकरीचा त्याग करून पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि निवडीस पात्र ठरले असे सांगितले. त्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्यासाठीचे, 45 दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पोवई नाका व्यापारी मित्र आणि मेहता परिवार यांनी, अपूर्वाचा आणि तिला घडविणाऱ्या आई सौ. उज्वला आणि वडील श्री. प्रमोद यांचा सत्कार केला आणि अपूर्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
26/01/2023
‘जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्या हस्ते ध्वजारोहण’
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यपूर्व काळातील जेष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपतराव मोहिते, श्री. बाळासाहेब नावंधर यांच्या हस्ते, मेहता सेल्युलर पोवई नाका येथे 26 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे, भारताच्या प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला.
मान्यवरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, साताऱ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये व्यवसाय सुरू करून आपल्या संस्था नावारूपास आणल्या व आजही या वयात कष्ट करत सामाजिक सेवेची बांधिलकी जपत आहेत.
मान्यवरांनी आपले अनुभव व्यक्त करताना, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकांनी किती हालअपेष्टा सोसल्या व आज आपण प्रजेच्या राज्याचा आनंद घेत असताना या मातृभूमीसाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानींनी व भारतीय सेनेने जे योगदान दिले आहे ते आपण विसरता कामा नये, आपली राज्यघटना ही जगातील इतत्र देशांपेक्षा श्रेष्ठ असून प्रत्येकाने संविधानाचा आदर ठेवला पाहिजे असे सांगितले.
श्री. शंकर माळवदे यांनी प्रास्ताविक केले, श्री. विवेक मेहता, श्री. विजय येवले आणि श्री. राजतीलक अरोरा यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
15/08/2022
*'राष्ट्रीय बॉक्सिंग सुवर्णपदक विजेती आर्या बारटक्के च्या हस्ते ध्वजारोहण'*
राष्ट्रीय युथ बॉस्किंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या कु. आर्या बारटक्के हिच्या हस्ते, मेहता सेल्युलर पोवई नाका येथे 15 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे, भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला.
नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत, आर्या देवेंद्र बारटक्के हिने, 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले आहे. या खेळातील सातारा जिल्ह्याचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
यावेळी आर्याने आपले अनुभव सांगताना बॉक्सिंग खेळात सुवर्णपदक जिंकण्यासाठी भरपूर कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते तसेच या प्रकारच्या खेळामध्ये मुलींनीसुद्धा भरपूर प्रमाणात सहभाग घ्यावा कारण या क्षेत्रालासुद्धा उज्वल भवितव्य आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पोवई नाका व्यापारी मित्र आणि मेहता परिवार यांनी, आर्याला भारताचे नेतृत्व करण्यासाठी तयारी करून, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी आणि आपल्या साताऱ्याचा अभिमान जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mehta Multi-Stores, Rajatadri Complex, Below Sakaal Paper Office, Near Badhiye Petrol Pump, Shivaji Circle, Rahimatpur Road, Powai Naka
Satara
415001
Opening Hours
| Monday | 10am - 8:30pm |
| Tuesday | 10am - 8:30pm |
| Wednesday | 10am - 8:30pm |
| Thursday | 10am - 8:30pm |
| Friday | 10am - 8:30pm |
| Saturday | 10am - 8:30pm |
| Sunday | 10am - 8:30pm |