Filmy Utsav

Filmy Utsav

Share

We are creative Film makers, Video Creator. Video Production right from Script writing to Cinematography
and Post production on Adobe Premiere.

Photos from Filmy Utsav's post 08/11/2020

YouTube live for Presicion Guppa 2020

29/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - सातवा गणपती - मश्रुम गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या उत्तरेस तुळजापूर रोडवरील हिप्परगा तलावाच्या शेजारी स्थापन केलेल्या या गणपतीचे मंदीर आहे. या गणपतीचे नाव देखील कन्नडमिश्रित उच्चारानेयुक्त मश्रुम गणपती असे आहे. कन्नडमध्ये मश्रुम याचा भावार्थ 'मसरू' म्हणजे 'दही', 'उम्म' म्हणजे 'खा' किंवा 'जेव' असा होतो. या दोन्ही शब्दांचा जोडशब्द दही खाणारा गणपती असा होतो. याच शब्दांचा अपभ्रंश होऊन कालांतराने मश्रुम गणपती असे एकेरी नाव रूढ झाले. सोलापुरातून या गणपतीला पायी चालत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.त्याचबरोबर हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर असल्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/wgzqmuFjto3Q9BHD8 (Google Maps)

Costume :Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

27/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - पाचवा गणपती - वीरकर गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पश्‍चिम दिशेला सम्राट चौकाच्या अगोदर असलेल्या बसवंती मंगल कार्यालयाच्या अलीकडच्या बोळातून या वीरकर गणपतीचे मंदीर आहे. संस्कृत भाषेत वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला बलदंड हाताचा असा होता. श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेतील मानकरी देशमुख यांच्या मळ्यामध्ये असलेल्या या गणपतीच्या मंदीरातच सिध्दरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगापैकी ३१ वे पशुपतीय लिंगदेखील आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://maps.app.goo.gl/PtXPHsaSjgqEPLbBA (Google Maps)

Costume : Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


744, Kamlaksa Complex, South Kasaba, Near Kali Masjid
Solapur
413007