Daily Sanchar
It was founded in 1961.3 T 's truth,transparency and treatment.
श्रीनगर (जम्मू-कश्मीर) – काश्मीर खोऱ्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा गुरुवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. विशेषतः गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गुरुवारी दगड कोसळल्यामुळे एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, बुधवारी याच मार्गावर झालेल्या भूस्खलनात तीन भाविक जखमी झाले आहेत. आपत्तीनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या टीम्स घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या आणि मदतकार्य हाती घेतले. जम्मूतील पहिल्यांदाच यात्रा थांबवण्यात आली आहे. ३ जुलैपासून सुरू झालेली यात्रा, यावर्षी आतापर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी पूर्ण केली आहे. बालटाल मार्गावरील चिखलाच्या प्रवाहाचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये दोन भाविक प्रवाहात वाहून जाताना दिसतात, मात्र इतर यात्रेकरूंच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. काही भाविकांनी रेलिंगला घट्ट धरून स्वतःचा जीव वाचवला. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (BRO) बालटाल मार्गाची दुरुस्ती सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे दुरुस्ती कार्य पूर्ण होईपर्यंत यात्रा स्थगितच राहील.
ही यात्रा दोन मार्गांद्वारे पार पडते —
1. नुनवान-पहलगाम मार्ग (48 किमी) – पारंपरिक आणि तुलनेने सुरक्षित
2. बालटाल मार्ग (१४ किमी) – कमी अंतराचा, पण अधिक खडतर
३,88० मीटर उंचीवरील अमरनाथ गुंफेत पोहोचण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यंदा यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्याने यावर्षी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सैन्य, निमलष्करी व पोलीस दलाच्या हजारो जवानांची तैनाती करण्यात आली आहे.. . ........
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा चिघळले आहेत. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस आणि दक्षिण सीरियातील लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला चढवला. या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य सीरियाचे संरक्षण मंत्रालय असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांना जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले. हल्ल्यानंतर इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला की, “जर सीरियाच्या सैन्याने ड्रुझ समुदायावर हल्ले थांबवले नाहीत, तर आम्ही त्यांना नष्ट करू.” दक्षिण सीरियातील सुवेदा शहरात सध्या ड्रुझ लढाऊ गट आणि सरकारी सैन्यात प्रचंड संघर्ष सुरू आहे. ड्रुझ नेत्यांच्या मते, सीरियन सैन्य अल्पसंख्याक ड्रुझ लोकांना निर्दयपणे मारत आहे. यामुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. सीरियन सरकारचा दावा आहे की हा संघर्ष गुन्हेगारी टोळ्यांमुळे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि अहवाल या दाव्यांकडे संशयाने पाहत आहेत.
ड्रुझ समुदाय कोण आहे?
ड्रुझ हे अरब वंशाचे एक धार्मिक अल्पसंख्यांक गट आहे, जो ना पारंपरिक इस्लाम ना यहुदी धर्म पाळतो. त्यांचा धर्म हिंदू, बौद्ध आणि गुप्त धार्मिक तत्त्वांचा समावेश असलेला आहे. सीरियात सुमारे ७ लाख, इस्रायलमध्ये १.५ लाख आणि लेबनॉन, जॉर्डन व गोलान हाइट्समध्येही त्यांची लक्षणीय संख्या आहे. विशेष बाब म्हणजे इस्रायलमधील ड्रुझ नागरिक सैन्यात सेवा देतात.
अमेरिकेचा निषेध
स्वेदा शहरातील हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे विशेष दूत टॉम बॅरक म्हणाले, “नागरिकांवरील हल्ले पूर्णपणे अमानवी आहेत. सर्व पक्षांनी युद्धबंदी जाहीर करून अर्थपूर्ण संवाद साधावा.” अमेरिका अल्पसंख्यांकांचे रक्षण आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाईचे आवाहन करत आहे.
UNSCची आपत्कालीन बैठक
सीरियावरील हवाई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) १७ जुलै २०२५ रोजी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सीरियाच्या मिशनने ही बैठक बोलावली असून, अल्जेरिया यास पाठिंबा देत आहे. इस्रायलचे UN मधील राजदूत डॅनन यांनी, “सीरिया सरकार निर्दोष नागरिकांवर अत्याचार करत आहे,” असा आरोप करत UNSCकडून कारवाईची मागणी केली आहे. #मध्यपूर्वतणाव
#इस्रायलहल्ला
#सीरिया_हवाईहल्ला
#ड्रुझविरोधातहिंसाचार
#सुवेदालढाई
सोलापूर प्रतिनिधी:
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी १३ महत्त्वाच्या कामांची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता दिली असून सोलापूरकरांसाठी दिलासादायक घोषणा केल्या. बुधवारी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांच्या बैठकीत सोलापूरच्या विकासावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कोठे यांनी आयटी पार्क सुरु करणे, पूर्व भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ६० मीटरचा डीपी रोड, भटक्या विमुक्त जातींसाठी ४० हजार घरकुल योजना, मुंबई व तिरुपतीसाठी विमानसेवा, ८५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ, १०० इलेक्ट्रिक बसेस, सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, झोपडपट्टी पुनर्विकास योजना यासह अन्य कामांची मागणी केली.
विशेष मागण्या:
सिद्धरामेश्वर संस्थानाच्या परिसराचा विकास
वस्त्रोद्योगासाठी सबसिडी व सवलती
म. गांधी प्राणी संग्रहालयासाठी २० कोटींचा निधी
धर्मवीर संभाजी महाराज तलावाचा ६० कोटींचा प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की सोलापूरच्या विकासासाठी तातडीने अंमलबजावणी केली जाईल कोट:
"सोलापूरचा विकास आता थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल सोलापुरातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो."
— आमदार देवेंद्र कोठे
या बैठकीस सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदार उपस्थित होते......... #सोलापूरविकास
#सोलापूरनवदिशा
#विकासाचीवाटचाल
#सोलापूरपाणीपुरवठा
#सोलापूरविमानसेवा
सोलापूर :
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान एकेरी बोलण्यावरून अचानक वाद पेटला आणि काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि हाणामारी सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या या गोंधळामुळे काही काळ उपस्थितांना काहीच समजले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी शासकीय विश्रामगृह परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा समाज बैठक, संभाजी ब्रिगेड, प्रवीण गायकवाड, शाईफेक हल्ला, सोलापूर हाणामारी, मराठा आंदोलन
#मराठा समाज #संभाजीब्रिगेड #प्रवीणगायकवाड #सोलापूर बातमी #मराठा बैठक
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Hotgi Road
Solapur
413002