Vastu Point

Vastu Point

Share

Vastupoint is one place for all your vastu related queries and questions. Vastupoint is know for growth, power, energy and success

06/03/2026

समुद्र मंथन : देव–असुर आणि आपल्या कुंडलिनीचे गूढ
समुद्र मंथनाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले आणि त्यातून विष आणि रत्न प्रकट झाले.
पण अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर ही कथा बाहेर घडलेली घटना नसून मानवी चेतनेतील एक अंतर्गत प्रक्रिया आहे.
देव आणि असुर म्हणजे काय?
पुराणांतील देव आणि असुर प्रत्यक्षात आपल्या मनातील गुण आणि अवगुण आहेत.
देव (गुण)
प्रेम
दया
संयम
सत्य
करुणा
विवेक
असुर (अवगुण)
राग
लोभ
मत्सर
अहंकार
वासना
भीती
हे दोन्ही आपल्या मनात एकत्र असतात.
जीवन म्हणजेच या दोन शक्तींचे सतत चालणारे मंथन.
समुद्र म्हणजे मन
समुद्र हा मानवी मन आणि चेतनेचा अथांग सागर आहे.
या समुद्रात:
विचार
भावना
इच्छा
संस्कार
हे सर्व लपलेले असतात.
जेव्हा जीवनातील अनुभव, संघर्ष आणि साधना सुरू होते तेव्हा मनाचा मंथन सुरू होते.
वासुकी नाग म्हणजे कुंडलिनी ऊर्जा
समुद्र मंथनात वासुकी नाग दोरी म्हणून वापरला गेला.
योगशास्त्रानुसार नाग म्हणजे कुंडलिनी शक्ती.
ही ऊर्जा मेरुदंडाच्या तळाशी (मूलाधार चक्रात) सुप्त अवस्थेत असते.
जेव्हा साधना, प्राणायाम किंवा जीवनातील तीव्र अनुभव होतात तेव्हा ही ऊर्जा जागृत होऊ लागते.
हीच ऊर्जा मनातील गुण आणि अवगुणांना सक्रिय करते.
विष आणि रत्न कसे प्रकट होतात?
समुद्र मंथनात सर्वप्रथम हलाहल विष बाहेर आले.
याचा अर्थ: जेव्हा कुंडलिनी ऊर्जा हलू लागते तेव्हा सर्वप्रथम मनातील नकारात्मक प्रवृत्ती वर येतात.
उदा:
राग
भीती
असुरक्षितता
अहंकार
हे विष बाहेर येणे हीच आत्मिक शुद्धीची पहिली पायरी आहे.
यानंतर हळूहळू रत्ने प्रकट होतात.
रत्न म्हणजे अंतर्गत शक्ती
समुद्र मंथनातून आलेली रत्न प्रत्यक्षात मानवी चेतनेतील जागृत शक्ती आहेत.
उदा:
लक्ष्मी – समृद्धी आणि संतुलन
ऐरावत – स्थैर्य आणि सामर्थ्य
उच्चैश्रवा – ध्येयाकडे धावणारी ऊर्जा
कल्पवृक्ष – सर्जनशील मन
कौस्तुभ मणी – आत्मज्ञान
कामधेनू – पोषण आणि करुणा
ही सर्व रत्ने मानवी चेतनेत आधीपासूनच असतात, पण ती जागृत होण्यासाठी मंथन आवश्यक असते.
समुद्र मंथनाचा खरा संदेश
समुद्र मंथन आपल्याला सांगते की:
मनात देव आणि असुर दोन्ही असतात
कुंडलिनी ऊर्जा दोघांनाही शक्ती देते
त्यामुळे मंथनातून विषही येते आणि रत्नही
जो माणूस जागरूकतेने जीवन जगतो
तो विषाला ओळखून त्याचे रूपांतर करतो
आणि मग त्याच्या जीवनात रत्ने प्रकट होतात.
आध्यात्मिक सत्य
समुद्र मंथन बाहेर घडलेली घटना नाही.
ते प्रत्येक माणसाच्या मन, शरीर आणि कुंडलिनी ऊर्जेत सतत घडत असते.
आपणच तो समुद्र आहोत,
आपणच देव आणि असुर आहोत,
आणि आपल्याच आत विष आणि अमृत दोन्ही लपलेले आहेत.
🙏ज्योती मयेकर

18/10/2025

धनतेरस २०२५ – तेरा दिव्यांचा प्रकाश आणि आत्म्याचा जागर 🌟
आज धनतेरस आहे, आणि या दिवशी तेरा दिवे लावण्याची परंपरा आहे.
धनतेरस म्हणजे “तेरा दिव्यांची आरस” –
एक अंक सूर्याचा प्रतीक आहे – आपल्या आतल्या आत्म्याचा प्रकाश.
तीन अंक गुरुचे प्रतीक आहेत – ज्ञान, मार्गदर्शन आणि चेतनेचा प्रकाश.
हे तेरा दिवे तुमच्या घरात योग्य ठिकाणी लावल्यास, तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रकाशमान निर्माण होते.
💡 दिवे लावण्याचे ठिकाण
1. एक दिवा – तुळशीच्या कडे लावा.
2. दोन दिवे – मुख्य गेट किंवा इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावा.
3. एक दिवा – पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली लावा (जर आसपास असेल तर). किंवा तुमच्या नक्षत्राप्रमाणे जे झाड येतं त्या झाडाखाली नक्की दिवा लावा
4. एक दिवा – पाणी ठेवण्याच्या जागी लावा.
5. एक दिवा – गुरूंसाठी लावा वेस्ट पश्चिम दिशेला लावा.
6. दोन दिवे – मुख्य दरवाजावर लावा.
7. एक दिवा – देवघरात लावा. तुपाचा दिवा
8. एक दिवा – उत्तर दिशेला कुबेरासाठी
9. एक दिवा – अग्नेय दिशेला लावा.
10. एक दिवा – गॅस किंवा स्टोव्हच्या जागी लावा.
11. एक दिवा – साउथ-वेस्ट दिशेला, पित्रांसाठी. राईच्या तेलाचा
असे तेरा दिवे आज नक्की लावा आणि तुमच आत्मबळ वाढवा जगात जगण्यासाठी!या तेरा दिव्यांनी तुमच्या घरातील सगळ्या चेतन अवस्थेला जागृत करून आत्म्याला दिव्य ज्ञान देईल.
✨ संध्याकाळी –
एक दिवा पिठाचा करून राईचे तेल भरून दक्षिण दिशेला (यमासाठी) लावा. अपघाती मृत्यू येऊ नये आणि मी ज्या कर्मासाठी इथे आलो किंवा आली आहे ते कर्म माझ्याकडून पूर्ण होऊ दे! यासाठी यमाला प्रसन्न करा!
आजच धनतेरस साजरा करा आणि आयुष्यात प्रकाशमान उर्जा भरा!
ज्योती मयेकर 🙏

31/07/2023

नक्की वाचा ....
देव हा प्रत्येकात आहे फक्त त्याला जाग ठेवा त्याला विष दिल तर तो तांडव करेल ना !
आज मी तुम्हांला एक असा अनुभव सांगते आहे की जर तुम्ही या सिचूऐशन मधून जात असाल तर तुम्ही स्वतः वर थोडं काम करा! नक्कीच मार्ग मिळेल! विश्वास ठेवा !
कारण तुमच्या आयुष्याचे तुम्ही स्वतः शिल्पकार आहात आणि तुमचे विचार आणि कृती या माध्यमातून च तुम्ही तुमचं शिल्प तयार कराल !
तर .... अनुभव असा आहे कि माझ्याकडे फेब २०२३ च्या सुमारास एक फिमेल क्लायंट आली होती तिच्या नवऱ्याची कुंडली घेऊन. मी तीला विचारलं काय जाणून घ्याचं आहे म्हणाली , माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे काय? मी थोडा विचार केला आणि कुडंली मागितली. कुंडली चेक केली आणि मी म्हणाली कि असं का वाटत तुम्हाला कि तुमच्या नवरोबाचं बाहेर लफडं चालू आहे? मनातलं सगळं अगदी बिनधास्त सांगा त्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. बर मी जर सांगितलं कि बाहेर लफडं आहे तर तुम्ही काय कराल तेही सांगा. ती म्हणाली घटस्फोट देईन. आणि काय कराल आणि काय जॉब करेन माझ्या मुलाला घेऊन मला मॅडम सहा वर्षाचा मुलगा आहे. मी थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली. हा एकच मार्ग आहे काय तुमच्याकडे ती म्हणाली हो मी म्हटलं दुसरा मार्ग आहे जर मी सांगितलं तर कराल काय ?ती म्हणाली तुम्हाला काय वाटत मॅडम अगदी सगळं मला खरं खरं सांगा ! त्याच वागणं पूर्वी सारखं नाही राहील तो शरीरानं असतो माझ्या कडे पण मनानं कुठं तरी दुसरी कंड असतो! माझ्याशी नीट बोलत नाही , काही सांगत नाही , जेव्हा त्याला माझी शारीरिक गरज असते तेव्हा तो बोलायला येतो मग जरा माग ढुंकूनहि बघत नाही तुम्ही च सांगा असं कि ती दिवस मी अड्जस्ट करू माझ्या मनात खूप काही गोंधळ चालू आहे. म्हणून मी म्हटलं कि आता घटस्फोट घेऊन वेगळं व्हायचं आपलं जीवन ह्या माणसं साठी वाया का घालवायचे ? मी
चांगली शिकलेली आहे आणि लग्ना आधी आणि नंतर जॉब करत होते सगळं सांमभाळून गरोदर पणात मी जॉब सोडला पण त्याने मला त्यासाठी कधी बोलून दाखवले नाही ह उलट तो तेंव्हा मला खूप कॉ ऑप रेट करत होता. माझ्याशी बोलत होता सगळं सांगत होता पण आता असं काही नाही आहे. तुमचा दुसरा पर्याय मला पटला तर तोही करून बघेल कि! मला कुठे त्याला सोडायचं आहे त्याच्या अशा वागण्यामुळे मला निर्णय घ्यावा लागतो आहे. मी तिला सांगितले त्याची पत्रिका तर ठीक आहे तसं कुठे माझ्या अभ्यासात मला आढळुन नाही आले आहे . त्याच लव्ह मॅरेज असावं तर ती म्हणाली हो आमचं लव्ह कम अरेंज आहे. तिला म्हटलं तुझी पत्रिका आणली आहेस का ? हो म्हणाली ती बघितली आणि तिला काही प्रश्न विचारले मी. त्याची उत्तरे तीन दिली. ग्रह स्थिती सद्या तिच्या पत्रिकेत बिघडलेली होती. तिची मानसिक परिस्थिती त्यामुळंच बिघडलेली होती. तिला म्हटलं तुझ्या मनातलं विष तुझ्या नवर्यात प्रवेश करत आहे हळू हळू. म्हणाली ते कस मी म्हणाली रोगी तू आहेस आणि तुझ्या संपर्कात तुझा नवरा मानसिक आणि शारीरिक रित्याआहे तुमच्यात ऊर्जा आदान प्रदान होते कि नाही. ती म्हणाली हो ! इन शॉर्ट तुला जो आजार झाला आहे ना त्यांची लक्षणं तुला तुझ्या नवरोबात दिसतात आहे. आपण उपचार केले तर बरे होतील ,तुझी चॉइस ठरव आणि कळव मला . तीन कॉल केला आणि मी तिच्या वर काम करायला सुरुवात केली. तिला मी ठराविक वेळ दिला होता त्यांत मला सगळ्या प्रकारे तिच्यावर काम करावं लागलं आणि ती पूर्ण बरी झाली. येत्या साडे चार महिन्यात तिची ग्रह दशा बदलली आणि तिचे निर्णय हि बदलले. एक दिवस फोन करून ती नवऱ्याला घेऊन आली आणि म्हणाली आज मी तुझ्या बरोबर आहे कारण का तर माझ्यावर मी उपचार योग्य वेळी केलें मि मुर्खा सारखं तुझ्याशी भांडायची आणि तुला सोडायचा निर्णय कितीतरी वेळा आतून घ्यायची, पण मॅडम ने मला सांगितलं होत काही झालं तरी सोडू नको तुझ्यातला देव विष पिऊन तांडव करत आहे त्याच विष आपण काढूया आणि खरंच विष हळू हळू संपलं आता कळलं कि समुद्र मंथन कुठे होत कधी होत आणि का होत आणि ते विष आपल्याला किती बाधत ते त्याचे परिणाम किती तरी आपल्या जवळच्या लोकांना होतात. पण मी त्यातूनचं खूप काही शिकली नाती कशी सांभाळायची. खरंच तुमची आभारी आहे मॅडम !
ते गेल्यानंतर मी विचार केला कीती बरं होईल जर प्रत्यकाने त्याच्या आत मंथंन होऊन झालेलं विष वेळीच बाहेर काढलं तर किती तरी घर मंदिर होतील शिव आणि शक्ती तिथेच आपल्याला बघायला मिळतील. आपल्यातला माणूस जागा ठेवण्यासाठी थोडा प्रयन्त प्रत्येकानं केला पाहिजे !नक्की करा .....
आपल्या नात्याचं भान ठेवा त्याचा आदर करा आणि जगा आनंदी !
ज्योती चंद्रकांत मयेकर

Want your business to be the top-listed Business in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Miraroad
Thane
401107