Gharat Ravi
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gharat Ravi, Politician, Thane.
03/06/2026
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #श्रीगणेश
02/06/2026
महाराष्ट्र माझा... मराठी माझी संवाद भाषा..!
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा संवाद कौशल्य अभियान राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने आज प्रभागातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकविण्याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी आणि मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ उपाध्यक्ष प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ, कोकण मराठी साहित्य परिषद सचिव प्रा.दीपा ठाणेकर, आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालय प्राचार्य डॉ. हर्षला लिखिते, शिवसेना विभाग समन्वयक श्री. महेश करकेरा, उपविभाग प्रमुख श्री. शिवाजी शिंदे, शाखाप्रमुख श्री. गिरधर कांबळे, श्री. सचिन जोईजोडे तसेच अनेक रिक्षा चालक बांधव उपस्थित होते.
मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. प्रत्येक नागरिक आणि सेवाक्षेत्राशी निगडित घटकांनी मराठीचा अभिमान बाळगत तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करावा, ही विनंती.
28/05/2026
पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #क्रांतीसूर्य
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615