Naresh Mhaske

Naresh Mhaske

Share

• संसदरत्न
• खासदार - ठाणे लोकसभा मतदारसंघ,
• प्रवक्ता, शिवसेना
• ठाणे - कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख
• शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख
• मा. महापौर, ठाणे

28/06/2026

रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी नामवंत दैनिक "मिड डे" यांच्या वतीने मुंबईतील सहारा स्टार येथे आयोजित करण्यात आलेल्या "मिड डे रियल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर आयकॉन 2026" पुरस्कार सोहळ्यात माझी कन्या अपूर्वा नरेश म्हस्के हिच्या कार्याची दखल घेत तिला "Best Mandate Sales Agency of the Year" ( सर्वोत्तम वार्षिक अधिकृत विक्री प्रतिनिधी संस्था) हा सन्मान राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात अपूर्वाने प्रत्येक अडचणीला सामोरे जात आपल्या कार्यक्षमतेने, सकारात्मक विचारांनी आणि ग्राहकांशी जपलेल्या विश्वासाच्या नात्याने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक उत्तम उद्योजिका बनली आहे. तिच्या या प्रवासात तिची मेहनत, चिकाटी आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे.

माझ्या लेकीला स्वतःच्या पायावर उभं राहताना आणि यशस्वी होताना पाहण्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येणार नाही. तिचा मला कायमच अभिमान राहिला आहे आणि ती वारंवार आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करत आली आहे.

अपूर्वाने यापुढेही अशीच मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास कायम ठेवत यशाची नवी शिखरं गाठावीत, हीच सदिच्छा.
Mangal Prabhat Lodha Amruta Fadnavis

28/06/2026

नामवंत दैनिक "मिड डे" यांच्या वतीने मुंबईतील सहारा इंटरनॅशनल येथे आयोजित करण्यात आलेल्या "मिड डे रियल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर आयकॉन 2026" पुरस्कार सोहळ्यामध्ये रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि सौ.अमृता फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी सुपुत्र आशुतोष नरेश म्हस्के यांना "Iconic Emerging Real Estate Developer of the Year" ( वार्षिक उदयोन्मुख प्रतिष्ठित रिअल इस्टेट विकासक पुरस्कार) हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. त्यांची कंपनी "AM ड्रीम रिऍलिटी"च्या माध्यमातून त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात केलेल्या गुणवत्तापूर्ण आणि प्रामाणिक कामाची ही पोचपावती आहे.

राजकीय क्षेत्रात काम करत असतानाच स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर उद्योग क्षेत्रातही त्याने एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. बांधकाम क्षेत्र हे नेहमीच अनेक चर्चांचा आणि टीकेचा विषय राहिला आहे, पण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच खरी ताकद असते. आशुतोषने याच मूल्यांच्या आधारावर या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. जबाबदाऱ्या कितीही असल्या तरी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणाने काम करण्याची त्याची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि आशुतोष माझा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान आहे.

यापुढेही त्याने प्रामाणिकपणे, गुणवत्तापूर्ण काम करत या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठावी आणि आपला व कुटुंबाचा गौरव वाढवत राहावा, हीच सदिच्छा.

27/06/2026

माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आज महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. कामगारांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सविस्तर संवाद साधला. नवीन कायद्यानुसार युनियनची निवडणूक घेणं प्रशासनासाठी कायदेशीर बंधनकारक आहे, पण या प्रक्रियेमध्ये होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर लेबर ऑफिसर्स तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

युनियनची निवडणूक ही कामगारांच्या लोकशाही हक्काचा भाग असून ती लवकरात लवकर पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, असे निर्देश यावेळी दिले. तसेच कामगारांच्या दैनंदिन अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्यांबाबतही प्रशासनाशी सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी माझ्यासह बार्गेनिंग कौन्सिल सदस्य उपाध्यक्ष समीर चव्हाण, कार्याध्यक्ष सचिन जाधव, संघटक सिद्धार्थ घोडके, खजिनदार किरण जाधव, सहखजिनदार चेतन रसाळ आणि ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव उपस्थित होते.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615