Pustak Katta

Pustak Katta

Share

We create e-books to be sold on amazon kindle. We publish books, promote. We act as a link between books and the readers.

रामायणाचा माग काढणारी युरोपियन बाई | हटके भटके | निरंजन घाटे 17/11/2023

नमस्कार मंडळी, मी The Bookhopper या नावानं एक पुस्तक परिचय देणारं चॅनल सुरू केलं आहे. किंबहुना पूर्वीच सुरू केलं होतं. ते पुनरुज्जीवित केलं आहे. नक्की पाहा आणि अभिप्राय कळवा.

रामायणाचा माग काढणारी युरोपियन बाई | हटके भटके | निरंजन घाटे Welcome to The BookHopperनिरंजन घाटे लिखित हटके भटके या पुस्तकात अशा भटक्यांचे वर्णन आहे, ज्यांनी एखादा ध्यास घेऊन भ्रमंती केली .....

25/08/2020

पुस्तक कट्टा तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पावणेदोन पायांचा माणूस या कादंबरीचे लेखक श्रीकांत बोजेवार म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचे तंबी दुराई यांच्या लेखणीतून उतरलेलं हे रिमिक्स व्हर्जन

आज कविवर्य विंदा करंदीकर यांचा जन्मदिन. तंबी दुराई यांनी केलेले विंदांच्या कवितेचे बहारदार विडंबन. त्याचबरोबर मूळ कविताही देत आहोत.

सब घोडे बारा टक्के- रीमिक्स

देशाची सूत्रे कोणी सांभाळावी याबाबत आपली आग्रही राजकीय मते असतात आणि आपण त्यानुसारच मतदान करतो. परंतु राजकीय विचार असणे, राजकीय मत असणे, याचा अर्थ देशात आकाराला आलेल्या सार्वत्रिक,सर्वपक्षीय राजकीय संस्कृतीला दुजोरा देणे नसते. ही विचारसरणी काळाच्या ओघात जन्माला आलेली आहे असे आपल्याला उगाचच वाटत असते. प्रत्यक्षात ती कायमच होती, अन्यथा विंदांनी १९५० च्या सुमारास ‘ सब घोडे बारा टक्के’ ही कविता केली नसती आणि ती एवढी वर्षे टिकली नसती. विंदांच्या जन्मदिनानिमित्त त्या कवितेचे स्मरण आणि तिच्याबद्दचा आदर त्याच कवितेचा मुखडा उसना घेऊन आणि त्याच साच्यात करण्याचा हा प्रयत्न खास बहुविधच्या वाचकांसाठी-

तंबी दुराई

जितकी खोकी तितकी मते
जितकी झाडे तितकी भूते
कोणी मूळचा, कोणी आलेला
कोणी शुद्धीत, कोणी प्यालेला
कोणी ट्रोलर, कोणी झोलर
कोणी दाता, कोणी बेगर
देती बुक्के, खाती धक्के
सब घोडे बारा टक्के!

रोज रोज नव्या थापा
याला ठेचा, त्याला कापा
कोणी एजेड, कोणी यंगं
कोणी शेपूट, कोणी शिंगं
ते तरी काय करणार?
हे तरी काय करणार?
त्याच त्याच बटनावर
पुन्हा पुन्हा तेच बोट
तेच आरोप, तेच ठपके
सब घोडे बारा टक्के

इकडे मेव्हणा, तिकडे साळी
इकडे बाळ्या, तिकडे बाळी
ज्याची सत्ता, त्याला हप्ता
इकडे शर्मा, तिकडे गुप्ता
तीच पाठ, तोच मार
तोच सुरा, तीच धार
तेच पाणी, तेच हबके
सब घोडे बारा टक्के

सब घोडे, स्वार कमी
जखमा खूप, मार कमी
खोक्यावरचे झाकण तरी
उघडून दाखव, माझ्या हरी
कोणी तरी, खरे बोला
भले सांगून, हाणा टोला
भ्रमापेक्षा सत्य बरे
श्रमापेक्षा हाल बरे
कोणी गुडगुड्या, कोणी हुक्के
सब घोडे, बारा टक्के

-----तंबी दुराई-----

मूळ कविता- (संदर्भासाठी)

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!

विंदा करंदीकर

Want your business to be the top-listed Shop in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Thane
400604

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm