Ambedkarite Action Committee

Ambedkarite Action Committee

Share

Ambedkarite Action Committee has been form for justice for Rohith Veluma & for Students rights by youths of Maharashtra.

16/11/2019

ाग_होत_आहे

--- महेंद्र अशोक पंडागळे MSW.

प्रस्तावना :
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यात लागलेली राष्ट्रपती राजवट आज पुन्हा एकदा राज्यातल्या रुग्णांच्या मुळावर बसली आहे,
मुख्यमंत्री सहायता निधी बंद झालाय,
त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कम जी रुग्णांना उशिरा का होईना मिळत होती ती आता मिळणे बंद झालय,
त्याच मुद्द्यावर मी लिहिलेला लेख पुन्हा एकदा पाठवतोय,

जेणेकरून येणार सरकार बजेटमध्ये प्रवधान करून मुख्यमंत्री सहायता निधीला बळकट करून जीवघेण्या आजारासाठी रुग्णांना 15 दिवसाच्या आत मदत करेल.

लेख वाचून प्रतिक्रिया अवश्य द्या.
आणि हा लेख यातील माहिती शक्य होईल त्याने पुढे पाठवा.
अधिक माहितीकरिता संपर्क नक्की कराच.

ाग_होत_आहे

मुख्यमंत्री सहायता निधी पैश्याविना असाह्य पण भांडवलदारांना मात्र साह्यच सहाय्य !!!

मागच्या वेळी केरळ मध्ये आलेल्या पुराला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने 200 कोटी रुपये दिले होते असे म्हणतात माहीत नाही पण तेंव्हापासूनच या निधी कक्षाला काय झालंय काही कळत नाहीये.

गेली वर्षभरात कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगाचे रुग्ण ज्या स्पीड ने वाढत आहेत, तरुण लहान मुले पटापट मृत्युमुखी पडत असताना राज्याच्या खात्यातून आणि इतर कोणत्याही ट्रस्ट कडून हवी तशी काहीही मदत मिळताना दिसत नाहीये. इतकंच काय तर Tata Trust सारखी इतकी मोठी ट्रस्ट सुद्धा कमी पडायला लागली आहे अशी भयानक परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्य आहे.

नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 2014 ला सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणाऱ्या Ngo आणि Trust यांचा FCRA बंद करून बाहेरून येणारी हजारो कोटींची मदत रोखून धरली आणि त्यामुळेच राज्यात 12AA, 80G आणि FCRA असलेल्या हजारो सामाजिक संस्था आज जागेवर बसून आहेत.

याउलट राज्यातले जे भक्त आणि भाविक आहेत जे गणपती आणि साईबाबा यांना भक्ती भावाने पूजतात आणि सिद्धिविनायक मंदिर, लालबागच्या राज्याला, हाजीअली दर्गा, गुरुद्वारे, महालक्ष्मी मंदिर, तसेच शिर्डी संस्थानांत जातात तिथे केवळ पाया पडून घरी येत नाहीत तिथे सोने, नाणे, हिरे, दागिने आणि पैसे दान करून येतात आणि हीच संस्थाने गरजेच्या वेळी हिंदू, मुस्लिम समाजातील गरीब रुग्णांच्या मदतीला येत नाहीत हे सत्य किती दिवस लपवून ठेवल पाहिजे असा प्रश्न निर्माण होतोय ???

याच संस्थानातील अध्यक्ष, सचिव, ट्रस्टी रुग्णांच्या नातेवाईकांना कश्या प्रकारची वागणूक देतात याची प्रचिती हजारो लोकांना आजवर आली आहे,
इतकंच काय तर शिर्डीच्या साईबाबांच्या नावाने भक्ती करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या भक्तांना मी इथे सांगू इच्छितो की,
साईबाबा ट्रस्ट एकाही ट्रस्ट, खाजगी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या कोणत्याच रूग्णांना कवडीचीही मदत करत नाही, इतकंच काय तर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या लोकांना केवळ 2 ते 5 हजार रुपड्यांची मदत करते.

अश्या माजोरड्या ट्रस्टच्या लोकांना तुमचा देव शिक्षा का करत नसावा बरं ????

हीच परिस्थिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ची आहे.
शिवसेनेचे लाडके आदेश भावजी इथे अध्यक्ष आहेत,
पण हे भावोजी एकाही वहिनीला किंवा ताईला 25 हजार रुपयांच्या वर मदत करत नाही (ते ही दुनियाभरचे कागदपत्र आणि नसत्या चौकश्या).
हाजीअली आणि महालक्ष्मी मंदिराची परिस्थिती याहून वेगळी नाहीच.

त्यातल्या त्यात टाटा ट्रस्ट लोकांना मदत करते, पण त्यात ही अतिशय किचकट पद्धतीने, चौकशीचा ससेमिरा, पोलीस स्टेशन Type investigation, varification या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर, हृदरोग, किडनी आणि इतर आजाराने त्रस्त असलेला लोकांना या ट्रस्ट छळत आहेत.

आरोग्यव्यवस्थेवर उपाय म्हणून काँग्रेस सरकारने नागपुरच्या कस्तुचंद पार्क मध्ये राजीव गांधी यांच्या नावाने "राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना" आणली होती, त्यात 972 आजार बरे करण्यासाठी 3 लाखांपर्यंत पैश्याची व्यवस्था केली होती.

फडणविस सरकार आल्यापासून त्यांनी राजीव गांधींच्या नवाऐवजी "महात्मा फुले" यांच्या नावाने हीच योजना पुढे सुरू ठेवली.

नेमकं झालं असं की,
कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी या आजारांसाठी आज ही योजना बिनकामाची आहे, यात केमोथेरपी किंवा अँजिओप्लास्टी सुद्धा होत नाही, आधी यात अंजिओग्राफी आणि प्लास्टी (2 स्टेंट) करून मिळायचे त्यावर 60,000 रुपये रुग्णाला द्यावे लागायचे आज परिस्थिती अशी आहे की, अंजिओग्राफी फुकट नाही पण प्लास्टी 2 स्टेंट पर्यंत करून मिळते, हीच परिस्थिती कॅन्सर बद्दल आहे, केमोथेरपी केली की रेडिएशन करून मिळत नाही, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप सारी गुंतागुंत आहे, किडनी ट्रान्सप्लांट ची परिस्थिती तर अजूनच भीषण आहे.
वर ज्या रुग्णांनी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय त्याना मुख्यमंत्री सहायता निधी कडून काहीही मदत मिळत नाही.

या नेमक्या कोंडीमुळे झालय अस की, पेशंट आणि नातेवाईक अश्या विचारात असतात की,
पुढचं पुढं बघू आधी थोडी तरी ट्रिटमेंट करून घेऊयात आणि लोक नेमके इथे फसतात ट्रीटमेंट होते पण पुढे मग काही केल्या गोष्टी सरकत नाहीत.
आणि रुग्ण हळू हळू मरनाकडे मात्र सरकतो.....
आणि नातेवाईक रडत मजबुरीने रुग्णाच्या मरणाची अप्रत्यक्ष पणे वाट बघत बसतात
कारण,
हा मेला की किमान ह्याच्यावर होणारा खर्च आमच्या पोराबाळांच्या शिक्षणावर, खाण्यापिण्यावर करता येईल, घरभाडे देता येईल वैगेरे वगैरे........

कविवर्य आणि जेष्ठ साहित्यीक दिवंगत बाबुराव बागुल यांनी फार वर्षांपूर्वी "मरण स्वस्त होत आहे" अशी कथा लिहिली होती आज मी आबांची माफी मागून अस म्हणेल की, "मरण महाग होत आहे" .........

आज मुख्यमंत्री निधी असेल किंवा धार्मिक ट्रस्ट असतील किंवा इतर ट्रस्ट असतील आज कोणीही सलग कोणालाच मदत करताना दिसत नाहीये,
या सगळ्या ट्रस्ट वर नियंत्रण असलेले धर्मादाय आयुक्त आणि त्यांची गॅंग आज काहीही Co-ordination करताना दिसत नाहीये पण अशाही परिस्थितीत गुजराती रुग्णांना, काठेवाडी रुग्णांना, जैनांना, राजस्थानी लोकांना त्यांच्या ट्रस्ट कडून भरभरून मदत केली जातेय याची आठवण स्वतःला मराठी, मराठा, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख समजणाऱ्या बांधवांनी ठेवावी इतकंच....

गेल्या कित्येक वर्षांपासून एक msg व्हाट्सअप्प वर फिरतो तो असा की,
मुख्यमंत्री निधी मधले ओमप्रकाश शेट्टे आणि सलमान खान यांच्या वतीने लहान मुले आणि इतर रुग्णांना मदत केली जाईल असे भंकस, खोटारडे आणि फालतू msg पाठवणाऱ्या डिजिटल अंगुठा बहाद्दरानो, खुनाच्या केस मध्ये बरी झालेला सलमान मुंबई बाहेरच्या एकही व्यक्तीला मदत करत नाही जोवर त्याला एखादी स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटेल त्यात climax असेल अश्याच केसेसला तो मदत करतो त्यामुळे सलमानला उरावर घेऊन नाचणाऱ्या भक्त औलादिनो अजून थेटर मध्ये जाऊन त्याचे सिनेमे बघा जरा म्हणजे लहान मुलांना अजून मदत मिळेल.....

मागच्याच आठवड्यात राज्याचा 2700 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सुधीर मानगुटीवर यांनी सादर केला मानगुटीवर हे ज्या विधानसभा क्षेत्रातील आहेत आणि ज्या जिल्ह्यातील आहेत त्यांनी किमान 500 कोटी मुख्यमंत्री निधीत घुसवले असते तर काय झालं असत ओ ???
फडणवीस तुमच्या मानगुटीवर बसले असते का ????

मुख्यमंत्री निधीतून आज कधी नव्हे अशी 10 हजार, 25 हजार अशी तुटपुंजी रक्कम 5 ते 10 ते 35 लाखांपर्यंत cost estimate असलेल्या रुग्णांना दिली जाते यावर त्या रुग्णांनी कराव तरी काय ???
आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदार यांच्यावर खैरात वाटली जात आहे, जमिनी, पाणी, वीजबिल सगळं सगळं माफ केले जातंय आणि सामान्यांना केळं दिल जातंय....

ज्या टाटा, बिर्ला, अंबानी, मित्तल, गोदरेज याना हजारो एकर जमीन फुकट दिल्या, त्यांच्याच मेडीकल ट्रस्ट ह्या आज जनतेला ठेंगा दाखवत आहेत.
CSR च्या नावाखाली 2% खर्च करायचा म्हणून ह्याच भांडवलदारी आणि नेहरू प्रणित कारखानदारांनी देशाला लक्ख लुटून खाल्यय आणि 2 टक्क्यांचा डकार पण ह्यांना आपल्याच संस्थेत द्यायचा आहे.

आणि ही भयानक कोंडी फोडायची कशी या विचारात असताना याहून भयंकर गोष्ट ही आहे की, राज्यात विरोधी पक्ष शिल्लकच राहिला नाहीये,
RTI वाले मांडवली बहाद्दर मूग गिळून गप्प आहेत,
सामाजिक कार्यकर्ते यांना हा आरोग्याचा प्रश्नच कळला नाहीये आणि त्याहून ही होशियार असलेले माझ्यासारखे आणि माझ्याकसकट सगळे MSW जे कित्येक वर्षांपासून वैधकीय क्षेत्रात काम करत आहेत ते ही यावर मूग गिळून गप्प का आहेत ????

2014 च्या नंतर रोजगाराचा प्रश्न आणखी भीषण झालेला असताना, राज्यात दुष्काळ असताना, नोटबंदीमध्ये नोकऱ्या गमावलेल्या अवस्थेत असताना, घरातल्या कमावत्या माणसावर किंवा त्याच्या तान्ह्या बाळावर एकाएकी कॅन्सरने झडप घालावी आणि त्याच्या कुटुंबाचं जमीन, पाणी, शेती, घर आणि पैसा त्याच्यासकट कॅन्सर ने घशात घालावा आणि आपण त्यांच्या मयताचे खान्देकरी व्हावं यासाठीच हा लेख लिहिलाय कृपया प्रत्येक समाजातील खान्देकरी बनणाऱ्यानी पुढे पाठवावा ही विनंती....

टीप :
१.अस असलं तरी बोललं पाहिजे, नाही बोललं तर लिहिलं पाहिजे, नाही लिहिलं तर वाचलं पाहिजे, नाही वाचलं तर जो कोणी यावर बोलतोय, लिहितोय, काम करतोय त्याला साथ सहयोग दिला पाहिजे........

२. अस असलं तरीही आपापल्या पालकमंत्री आणि मंत्र्यांना धरा त्यांच्याकडून शिफारस पत्र घ्या त्यांच्या PA ला सळो की पळो करा पण आपल्या रुग्णाला मदत मिळवून द्याच हीच अपेक्षा.

जास्तीत जास्त Share करा भले स्वतःच्या नावाने Share करा पण share करा....

आपलाच,

महेंद्र अशोक पंडागळे
Msw
07678044677

Photos from Ambedkarite Action Committee's post 12/11/2019

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पण अपडेटेड कृतिशील नेतृत्व आदरणीय श्यामदादा गायकवाड यांच्या बद्दल थोड लिहिलंय जे मध्ये जन्मलेल्या #नवं_आंबेडकरवादी तरुणांसाठी आहे.

"The Political leader must recognize the problem before it's become an Emergency"
हा वाक्प्रचार ज्यांना तंतोतंत लागू होतो असे जेष्ठ वैचारिक रिपब्लिकन नेते, लढाऊपँथर, दबंग योद्धा अर्थात मा. श्यामदादा गायकवाड !

दादांबद्दल काय आणि किती लिहावं दादा दादा आहेत आज गेली 4 दशकांहून अधिक काळ ज्यांनी आंबेडकरी चळवळीस दिला, त्याला तोड नाही इतकं करून पण दादा नेहमी म्हणतात की मी जे काही करतोय ते कोणावर उपकार करत नाही हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी जीवातजीव असेपर्यंत करतच राहणार.

दादांबरोबर ज्यांनी थोडा वेळ जरी चर्चा केली असेल किंवा काही काळ त्यांच्या सानिध्यात घालवला असेल त्यांच्याच लक्षात येईल की दादा काय आहेत ते!

आंबेडकरी नेत्यांमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके नेते मी पाहिलेत जे इतक्या सूक्ष्म पद्धतीने समाजाचं आणि व्यक्तींचं निरीक्षण आणि अभ्यास करत असावेत इतकं करून दादा थांबत नाहीत तर त्या व्यक्ती बद्दलच अचूक, मार्मिक, विश्लेषण फक्त दादाच करू शकतात त्यांची शैली आणि विडंबन किती परफेक्ट आहे याबद्दल बोलायची गरजच नाही ते आजही सर्वश्रुत आहे. अश्या असंख्य गोष्टी दादांबद्दल कधीही सांगता येतील.

त्यांचा 40 वर्षापेक्षा अधिकचा काळ चळवळीत गेला असला तरीही आमच्या सारखे नवे आणि आमच्याहून हि नवखे अश्या कार्यकर्त्यांची नावे दादांना नेहमी पाठ असतात.
दादांसाठी आमची हि तिसरी पिढी पण, या तिसऱ्या पिढीबरोबरची दादांची आणि आमची नाळ अजूनही तितकीच घट्ट जुळलेली आहे आणि ती सदैव कायम असेल या बाबतीत माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाहीच.

अभ्यासात नेहमी अव्वल असलेले दादा CHM कॉलेज ते सिद्धार्थ कॉलेज व्ह्या या Law कॉलेज अश्या मेरिट मधून प्रवास करत पुन्हा आपल्या ठाणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या सर्व लहान मोठ्या गावात त्यातील छोटे, मोठे रस्ते, पायवाटा इतके फिरलेत आणि इतके लोकांमध्ये परिचित आहेत की, आजच्या स्वतःला अध्यक्ष म्हणून घेणाऱ्या चमकेश नेत्याला त्यातले 20% गाव आणि त्याचे रस्ते पण माहित नसतील.

ठाणे जिल्हा तर दादांचाच आहे परंतु मुंबई मध्ये आजही दादांचा वयक्तिक, सामाजिक आणि नैतिक असा जबरदस्त दबदबा आहे आणि त्यांचं ते "दादापन" त्यांनी अतिशय मेहनतीने, नितीमत्तेने आणि धाडसाने जपलंय आजही मुंबईतील चळवळ आणि त्यांची समीकरणे दादांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत.

माता रमाई नगर मधील हत्याकांडा नंतर कोणाचीच तिथे जाण्याची हिम्मत नव्हती अश्या वेळेस दादा तिथे गेले लोकांना भेटले आणि आजतागायत ती केस दादा लढत आहेत. आज घराणेशाही आणि वारसा सांगणार्यानी किती Actrocity च्या केसेस लढल्यात आणि इतकी वर्षे चिवटपणे झुंज दिली असे उदाहरण दाखवा. (रोहिथ वेमुला केस मध्ये अजून एकही साधी अटक नाही).

इतकेच नाही तर जवखेड, सोनई, खर्डा आणि अजून कित्येक केसेस आजही दादा लढत आहेत.
हे एका बाजूला असतांना स्वतःच्या दोन्ही भावांच्या खुनाच्या केस मध्ये दादांनी खुन्याना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं आहे स्वतःवर असेलेल्या 30 च्या वर केसेस मध्ये दादा निर्दोष सुटलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेत तुरुंगवास भोगलेले दादा, केस जिंकलेले दादा, दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा देणारे दादा सगळ्यांपेक्षा (तथाकथित नेत्यांपेक्षा)नक्कीच वेगळे आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या नामांकित वकिलाला लाजवेल असा युक्तिवाद, धाडस, चिकाटी आणि आत्मविश्वास आज दादांच्या नावावर आहेत.

हे सर्व तर आहेच पण दुसऱ्या बाजूला गेली 32 वर्ष अविरतपणे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक वसा घेऊन आणि वेगवेगळे Secular प्रयोग करून ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पण दादांचीच कल्पना आणि 35 वर्षांपासून परिवर्तनाचा अखंड वसा चालवणारे दादाच !

मूळचा लेखनाचा, चित्रकलेचा, नाटके लिहून दिग्दर्शित करण्याचा आणि राज्य नाट्य स्पर्धेत जिंकण्याचा आणि हरवण्याचा पिंड असणाऱ्या दादांच्या वाचनाबद्दल काय बोलावं ??
दादा मराठी, हिंदी वाचतात पण इंग्रजीची जाडजूड पुस्तक वाचतात आज आपले किती नेते इंग्रजी पुस्तके वाचतात ?
दादा ज्या लेखकांची नावे सांगतात त्यांची नावे आपल्या कोणत्या नेत्यांनी किमान ऐकली असतील अशी मला तरी शंका आहे.

दादांचा जागतिक पातळीवरचा सामाजिक, सांस्कृतिक राजकीय अभ्यास आमच्या सारख्या तरुणांना थक्क करतो.
एका बाजूला चीन अमेरिकेवरची पुस्तके वाचतांना समोर स्वामीनगर च्या झोपडपट्टीतून तक्रार घेऊनआलेले तामिळ कुटुंब त्यांच्या भाषेत बोलतांना व त्यांचे प्रश्न त्यांच्याच भाषेत सोडवनारे दादा खरच मला तरी ग्लोबल वाटतात.

नामांतराच्या लढ्यातील दादांचे योगदान सर्वश्रुत आहेच पण,

माजी प्रधानमंत्री व्ही.पि.सिंग यांच्या बरोबर दादांनी केलेलं वरळी सि लिंक च मच्छीमारांचे आंदोलन असो,
1992 ला बाबरी मशीद पाडल्याच्या विरोधात ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये "धर्मांधता विरोधी मंचाची" उभारणी करून दहा हजार समर्थकांना घेऊन केलेलं जेलभरो आंदोलन असो,
झोपडपट्टीत राहणार्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी काचेरीवर काढलेला महामोर्चा असो, खैरलांजी झाल्यावर उल्हासनगर येथे झालेल्या डेक्कन क्वीन जाळीत प्रकरणात आपल्या निरपराध पोरांना सोडवण्यासाठी केलेली धडपड असो किंवा मग आताच्या एक मराठा लाख मराठा या घोषणेने कधी नव्हे इतकी जातीय तेढ भावना राज्यात तयार होत असतांना आजिबात न डगमगता "एक भारतीय 125 कोटी भारतीय " अशी हाक देऊन ठाण्याचा लाखोंच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे दादा खऱ्या अर्थाने आमच्या नजरेत Angry Young dynamic Militant आहेत.

आजवर दादांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल पाहता बरेच चढ उतार असले तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मला नव्हे तर प्रत्येकाला दादांबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार यात कोणालाही शंका नाहीच. दादांची परखड वृत्ती सर्वांना माहीत असूनही दादांचे भाषण म्हणजे शाब्दिक, बौद्धिक, विनोद आणि गंभीरता अशी मिक्स पर्वणीच त्यामुळे दादा बोलणार आहेत आणि दादा आज भाषणात आम्हाला हि बोलतील हे माहित असूनही दादांचे भाषण चुकवलेला व्यक्ती दुसराच कोणीतरी असावा. दादांच्या पक्षात आपण नाही आपण दादांबरोबर राहून शिकून दुसऱ्या पक्षात जातो तरीही "दादा मी त्या पक्षात जातोय काही मदत लागली की येईन आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा आणि लक्ष असुद्या" असे म्हणणारे हजारो आहेत पण त्यांच्याहुन मोठे दादा आहेत जे त्यांना सदैव मदत करतात आणि इथून पुढे हि करतील इतक्या दिलदार मनाचा हा खराखुरा नेता कुठेच सापडणार नाही.

दादा खूप वर्षांपासून कामगार संघटना चालवतात त्यांच्या युनियन बऱ्याच ठिकाणी आहेत आणि ते हे किचकट काम पण मन लावून करतात आजही रिक्षा, फेरीवाले यांच्या पासून ते कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेपर्यंत त्याचा पसारा आहे असे असूनही आजही नाका कामगार असो, फेरीवाला असो, रिक्षावाला असो, सफाई कामगार असो की पालिका आयुक्त असो दादा आजही सर्वाना वेळ देतात सर्वांचं म्हणणं ऐकतात आणि त्यावर काम करतात हे सगळं असूनही आणि या वयातही दादांची मेमरी अफलातून आहे त्यांना कधी, कोणाला कुठे भेटलो होतो, काय संदर्भ होता सगळं लक्षात राहत आमच्या सारख्यांचे जन्मवर्ष सुद्धा लक्षात राहतात याच मला आजही कोड आहे.

परंतु या सर्वात दादाच मोठेपण मावणार नाहीच नाका कामगार आणि सफाई कामगार आणि इतर सर्व कष्टकरी जनतेची नस नस ओळखणारे दादा ज्योतिबांची आणि बाबासाहेबांची चळवळ या सर्व कष्टकरी लोकांना बसवून आणि नीट समजावून सांगतात आपण फक्त आंबेडकरी चळवळीवर तासनतास गप्पा मारतो हा असा तो तसा पण आजवर आपण तरी कुठे बसलोय नाका कामगारा बरोबर ? फेरीवाल्या बरोबर, आपल्या तामिळ बांधवाबरोबर, रिक्षावाल्याबरोबर !
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण बसलोय 10Mb चा स्पीड असलेला Wifi घेऊन आणि 25 हजाराचा 4G फोन घेऊन चालू आहे चळवळ फेसबुक वरून नाका तोंडातून फेस येऊस्तोवर whatsapp वर खटा खटा बटन दाबून धमक्या, फुसकी आवताने, असं करू, तस करू, सीना नही फौलाद है आंबेडकर कि औलाद है !!!

आज दुश्मन दारावर उभा ठाकलेला असतांना माणसांशी समोर बसून त्यांना समजावून सांगून क्रांतीलढा उभा करण्याची वेळ आलेली असतांना आपण कोणते यान, कोणते सेटलाईट कोणत्या हवेत उडवतोय ?
याचे नेमके भान नेहमी दादांकडे गेल्यावर होते तुम्ही कितीही update असा हा अवलिया तुमच्या आणि त्यांच्याही कुंडल्या खिशात घेऊन बसलाय आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला
"पुढचे धोके ओळखा !
वेळीच सावध व्हा !!!"
आणि लढा असं सांगतोय आपण सर्वांनी या यौध्याच्या अनुभवाचा, लढण्याचा, चिकाटीचा, शौर्याचा, बुद्धीचा उपयोग चळवळ अधिक बळकट करण्यासाठी करून घेऊया आणि ताकदीने येणाऱ्या काळात शत्रूंशी दोन हाथ करूयात याच आशवादासह माझं दादांबद्दलच्या मनोगतास तात्पुरता स्वल्पविराम देतो आणि तूर्तास येथे थांबतो.
जयभीम । जयभारत ।

टीप : #भीमा_कोरेगाव ची केस आदरणीय श्यामदादा आणि त्यांचीच टीम लढत आहे हे सांगायचं राहील.
तसेच आताच झालेली खर्ड्यातली बाळू पवार ची केस आणि संबंधित बरच काम दादा, Keshav Waghmare, लक्ष्मण गायकवाड आणि इतर मंडळी लढत आहेत.

बाकी सविस्तरपणे लवकरच.....

महेंद्र अशोक पंडागळे
07678044677.

11/08/2019

प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
सातारा, महाराष्ट्र राज्य.

मा. महोदय,

आम्ही लोक जे आपणास मदत करू इच्छितो त्यांना मदत करायची आहे त्याना काही महत्वाची माहिती हवी आहे आणि ती माहिती केवळ आपणच देऊ शकता त्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडत आहे.

१. जिल्हाधिकारी यांनी सगळ्यात आधी हे जाहीर करावं की, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी किती तालुक्यात, किती गावात आणि किती शहरात पूरपरिस्थिती आहे ???

२. ज्या ज्या गावात आणि शहरात पूरपरिस्थिती आहे तिथे मदत पोहोचली की नाही ???

३. कोणत्या गावांमध्ये आजवर मदत पोहोचली नाही त्या गावांची यादी द्यावी.

४. ज्या गावांमध्ये मदत पोहोचली नाही त्या गावात येण्यासाठी कोणकोणते रस्ते आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी कोणकोणते सरकारी अधिकारी, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांचे संपर्क द्यावेत.

५. पुराची व्याप्ती लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी पुरातील शेवटचे गाव आणि त्याची Boundary जाहीर करावी जेणेकरून आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यांना काम करणे सोपे होईल.

६. गेल्या 4 दिवसात जे जे काम झाले असेल त्या व्यतिरिक्त आता कोणत्या भागात काम वाढवणे गरजेचे आहे हे जाहीर करावे म्हणजे बाहेरून मदत देणाऱ्या व्यक्तींना मदत करणे आणखी सोपं होईल.

७. आतापर्यंत बऱ्याच ठिकानावावरून जेवण कपडे वगैरे गेलेले आहेत त्याच वाटप सगळ्यांना कस होईल यासाठी सरकारी, गैरसरकारी लोकांची टीम असेल तर तशी माहिती प्रसिद्ध करावी.

८. आतापर्यंत जी काही मदत आली आहे ती मदत साठवून ठेवण्यासाठी काही व्यवस्था केली असेल तर त्याचे पत्ते आणि संपर्क जाहीर करने जेणेकरून अजून 2 किंवा 3 दिवसांनी ज्यांना मदत मिळाली नाही अश्याना त्यातून मदत करता येईल.

९. जिल्हाधिकारी यांनी official फेसबुक किंवा WhatsApp किंवा इतर कोणत्याही official portal वरून माहिती जाहीर करावी ही विनंती.

आपलाच,

महेंद्र अशोक पंडागळे
07678044677

TU HINDU BANEGA NA MUSALMAAN BANEGA INSAAN KI AULAD HAI INSAAN BANEGA 05/08/2019

1959 मध्ये आलेला #धुलकाफुल हा सिनेमा आणि 2019 ला 303 लोकसभेच्या जागा Evm च्या माध्यमातून जिंकलेला #एकहीभूलकमलकाफुल हा राजकीय सिनेमा आणि ह्या भाजप वाल्यानी जम्मू-काश्मीर मधल्या एकाही नागरिकाला, सामाजिक कार्यकर्त्याला, पत्रकाराला, सामाजिक संस्थेला, सामाजिक संघटनेला, किमान भाजपच्या आमदाराला (जो बीफ खात नसेल), देशाच्या तीनही दलांच्या प्रमुखांना, आख्या जम्मू काश्मीर विधानसभेला न विचारता आणि इतकच काय तर पाशवी बहुमताच्या बळावर #370 आणि रद्द करून सार्वभौमतवाच्या मोठं मोठ्या लोकशाहीवादी गप्पा आणि #अखंडहिंदुस्थान झाल्याने जो जल्लोष करत आहेत त्यांना इतकंच सांगणं आहे की,
येणारा काळच ठरवेल की काश्मीर खोऱ्यात किती शांतता, समृद्धी नांदेल.......

पण,
इतकं मात्र नक्की की तुमच्या या निर्णयामुळे लोक देशातली बेरोजगारी, आर्थिक मंदी, बलात्कार, विकास, दुष्काळ, जगण्या मरण्याचे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हे आंदोलन विसरणार नाहीतच....

आणि म्हणूनच यश चोप्रा दिग्दर्शित साहिर लुधियानवी यांनी 1959 मध्ये लिहिलेलं हे गाणं आजही फॅसिस्ट शक्तीचा देशातून समूळ नायनाट करण्यासाठी आणि खरा खुरा माणूस घडवण्यासाठी पुरेस आहे कृपया गाण्यातील एक एक शब्दांत काय ताकद आहे ते वाचल्यावरच कळेल कारण आता वाचलं तरच वाचाल....

तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा ।

अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है
तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है
जिस इल्म ने इंसान को तकसीम किया है
उस इल्म का तुझ पर कोई इलज़ाम नहीं है
तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा ।

मालिक ने हर इंसान को इंसान बनाया
हमने उसे हिन्दू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया
जो तोड़ दे हर बंध वो तूफ़ान बनेगा ।

नफरत जो सिखाये वो धरम तेरा नहीं है
इन्सां को जो रौंदे वो कदम तेरा नहीं है
कुरआन न हो जिसमे वो मंदिर नहीं तेरा
गीता न हो जिसमे वो हरम तेरा नहीं है
तू अम्न का और सुलह का अरमान बनेगा ।

ये दीन के ताजिर ये वतन बेचने वाले
इंसानों की लाशों के कफ़न बेचने वाले
ये महलों में बैठे हुए ये कातिल ये लुटेरे
काँटों के एवज़ रूह-ए-चमन बेचने वाले
तू इनके लिये मौत का ऐलान बनेगा !!!

https://youtu.be/wMGo5UkPpko
महेंद्र अशोक पंडागळे
07678044677

TU HINDU BANEGA NA MUSALMAAN BANEGA INSAAN KI AULAD HAI INSAAN BANEGA DEAR BROTHERS, SISTERS, FRIENDS - WE ALL ARE SON AND DAUGHTERS OF ONE UNIVERSAL LIGHT !! DO NOT FIGHT !! WORK FOR BETTER FUTURE OF MANKIND !!

Want your school to be the top-listed School/college in Ulhasnagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Ulhasnagar
421004