Atish Ananda Barne

Atish Ananda Barne

Share

समाज सेवा हीच ओळख, साधेपणा हाच स्वभाव ! 🤝
अतिश आनंदा बारणे

21/07/2026

“दादा... उद्या तुमची जयंती आहे, पण तुम्ही आमच्यात नाही... हे सत्य आजही मन स्वीकारायला तयार नाही.”

काळ पुढे सरकत आहे... दिवस, महिने उलटत आहेत... पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिकच जाणवत आहे. आजही सकाळचे सात वाजले की नकळत मन म्हणतं, “दादांचा फोन येईल... आज कोणत्या कामाची विचारपूस करतील?” पण लगेच वास्तव समोर उभं राहतं... आणि डोळे नकळत पाणावतात.

माझ्यासाठी अजितदादा पवार हे फक्त पक्षाचे नेते नव्हते. माझी ओळखच महाराष्ट्रात “अजितदादांचा निष्ठावंत कार्यकर्ता” अशी होती आणि आजही आहे. ही ओळख माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा सन्मान आहे.

दादा म्हणजे निर्णयक्षमता... दादा म्हणजे विकास... दादा म्हणजे शब्दाला जागणारे नेतृत्व... आणि दादा म्हणजे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आधारवड.

पिंपरी-चिंचवड शहराचा आजचा आधुनिक चेहरा घडविण्यामागे तुमची दूरदृष्टी, धाडसी निर्णय आणि विकासाची अखंड तळमळ होती. म्हणूनच तु

17/07/2026

राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्व. अजित अनंतराव पवार (दादा) यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, यामुळे दादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.
​स्व. अजित दादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यांमुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.

Ajit Pawar NCPSpeaks_Official Parth Ajit Pawar

Want your public figure to be the top-listed Public Figure in Moshi?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Dear D-Mart, Dehu-Alandi Road
Moshi
412105